बियाणे आणि मिश्र खतांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ६० ते २५० रुपयांची दरवाढ
अमरावती, 28 मे (हिं.स.)
ऐन खरिपाच्या तोंडावर शेतकऱ्यांना पेरणीसाठी लागणाऱ्या बियाणे आणि मिश्र खतांमध्ये गतवर्षीच्या तुलनेत ६० ते २५० रुपयांची दरवाढ झाली असल्याने शेतकऱ्यांना या महागाईचा फटका बसणार आहे.
खरीप हंगामात प्रामुख्याने मका, सोयाबीन, कापूस, उडीद, तूर, बाजरी व मूग या पिकांची पेरणी केली जाते. यावर्षी खरीप हंगामासाठी बियाणे बाजारपेठेत उपलब्ध झाले असून काही कंपन्यांचे मका बियाणे हे १०० ते २०० रुपयांनी महागले आहे मकाचे ४ किलो बियाणे पाकीट ८०० ते २२५० रुपयांपर्यंत आहेत तर कपाशीचे बियाणे पाकीट ४० रुपयांनी महाग झाले आहे. गतवर्षीच्या तुलनेत डीएपी वगळता अन्य खतांच्या बॅगमध्ये १८० ते २८० रुपयांची वाढ झाली आहे यामध्ये १२:३२:१६ या ग्रेडमध्ये वाढ झाली आहे. १०:२६:२६, १५:१५:१५, २०:२०:०:१३,यामुळे खरिप पेरणीचे बजेट वाढणार आहे.