Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सावकाराने शेतजमीन बळकावली, अक्कलकोटमधील शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सावकाराने शेतजमीन बळकावली, अक्कलकोटमधील शेतकऱ्याचा आत्महत्येचा प्रयत्न

Surajya Digital
Last updated: 2021/12/22 at 10:12 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अक्कलकोट : एका खाजगी सावकाराने दमदाटी करून जबरदस्तीने शेत जमीन खरेदी करून घेतली.याचा धक्का बसल्याने ४८ वर्षीय शेतकऱ्याने विष प्राशन करून आत्महत्या केल्याची घटना बोरी उमरगे (ता. अक्कलकोट) येथे काल मंगळवारी (ता. २१) रात्री नऊच्या सुमारास घडली. श्रीशैल मल्लेशी बिराजदार असे त्या शेतकऱ्याचे नाव आहे.

श्रीशैल बिराजदार यांनी गावातीलच मल्लिनाथ नारायण पाटील यांच्याकडून २०१७ मध्ये कौटुंबिक अडचणी भागविण्यासाठी थोडे – थोडे रुपये करत जवळपास एकूण एक लाख रुपये चार टक्के व्याजाने उसने पैसे घेतले होते. त्यावेळी मल्लिनाथ पाटील याने श्रीशैल बिराजदार यांच्या अज्ञानाचा फायदा घेत साडेतीन एकर जमीन स्वतःच्या नावावर खरेदी करुन घेतली.

त्यापोटी श्रीशैल बिराजदार याला तीन वर्षे मल्लिनाथ नारायण पाटील यांच्या शेतात मोफत काम करायला सांगितले. तीन वर्षे संपल्यानंतर बिराजदार यांच्या लक्षात आल्यानंतर जमीन पुन्हा स्वतःच्या नावावर करुन देण्यासाठी आग्रह केला. परंतु पाटील यांनी दमदाटी करत संपूर्ण व्याजासहित पैसे दे म्हणत जमीन परत देण्यास नकार दिला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

बिराजदार यांनी वारंवार आग्रह करून जमीन मिळवण्याचा प्रयत्न केला, पण त्यात त्यांना यश आले नाही. १६ डिसेंबर २०२१ रोजी श्रीशैल बिराजदार यांना तुझी जमीन तुझ्या नावावर करतो, असा बहाणा करत उर्वरित साडेतीन एकर शेत जमीन स्वतःच्या नावावर खरेदी करून घेतली. गावतील लोकांनी मल्लिनाथ पाटील यांना त्या शेतकऱ्यांची जमीन परत करण्यास सांगितले. मात्र त्यांना दाद न देता उलट मध्यस्थी करणाऱ्यांना आणि बिराजदार यांच्या कुटुंबाला जीवे ठार मारण्याची धमकी दिली.

या भीतीमुळे श्रीशैल बिराजदार यांनी विष प्राशन करून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला असल्याचे श्रीशैल बिराजदार यांचा मुलगा बसवराज श्रीशैल बिराजदार यांनी सांगितले.

सध्या त्यांची प्रकृती चिंताजनक असून अत्यवस्थ असलेल्या बिराजदार यांच्यावर सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. पीडित शेतकऱ्याची पत्नी, बसवराज व स्वामीनाथ ही दोन मुले मोलमजुरी करून उदरनिर्वाह करतात. दोन मुलीची लग्न झाले आहे. त्यांच्या नावावर असलेली जमीन सावकारांनी लुबाडल्याने त्यांच्या उदरनिर्वाहाचा प्रश्न त्यांच्यासमोर उभा ठाकला आहे.

* यापूर्वीही खाल्ली झेलची हवा

यापूर्वीही मल्लिनाथ नारायण पाटील याने एका पीडित व अपंग महिलेच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन तिचेही पैसे लुबाडले आहेत, तसेच त्या महिलेची जमीन स्वतःच्या नावावर करून घेतली आहे. याबाबत अक्कलकोटच्या दक्षिण पोलीस ठाण्यांमध्ये गुन्हा दाखल झाला होता. याप्रकरणी मल्लिनाथ पाटील याला झेलची हवा ही खावी लागली आहे. याबाबत सिव्हिल पोलिस चौकीमध्ये नोंद झाली आहे. अक्कलकोट दक्षिण पोलीस ठाण्याचे अधिकारी पुढील चौकशी करत आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Lender #seizes #farmland #attempts #suicide #Akkalkot, #सावकार #शेतजमीन #बळकावली #अक्कलकोट #शेतकरी #आत्महत्या #प्रयत्न
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अभिनंदन ! हॉकीमध्ये भारताने पाकिस्तानला हरवले…
Next Article हिवाळी अधिवेशनात आमदार संजयमामांचा दबदबा; डिकसळ पुलासाठी 55 कोटी मंजूर

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?