Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर । सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्यास 10 वर्षाची सक्तमजुरी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर । सुनेवर अत्याचार करणाऱ्या सासऱ्यास 10 वर्षाची सक्तमजुरी

Surajya Digital
Last updated: 2022/12/15 at 3:37 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ पंढरपुरात मतिमंद महिलेवर बलात्कार

पंढरपूर : पंढरपूर तालुक्यातील एका गावामध्ये सुनेवर बलात्कार करणाऱ्या सासऱ्याविरुद्ध दहा वर्षे सत्ता मजुरीची शिक्षा जिल्हा न्यायालयाने ठोठावली आहे. Solapur. 10 years forced labor rape to father-in-law who abused daughter-in-law Pandharpur 

 

पंढरपूर तालुक्यातील महादेव दाजी बनसोडे यास शिक्षा सुनावण्यात आली आहे. आरोपी बनसोडे याने 16 एप्रिल 2021 ते 24 जुलै 2021 या कालावधीमध्ये नातेसंबंधाचा गैरफायदा घेऊन सुनेवर बलात्कार केला. हा प्रकार वारंवार होत असल्यामुळे पीडित महिलेने पंढरपूर तालुका पोलीस ठाण्यामध्ये याबाबत गुन्हा दाखल केला होता.

 

न्यायालयात सदर खटला सुरू झाल्यानंतर सात साक्षीदारांच्या साक्षी नोंदविण्यात आल्या. त्यामध्ये पीडित महिला, तिचे वडील, वैद्यकीय अधिकारी डॉ. प्रदीप केचे, डॉ. स्वाती बोधले, हवालदार शिवाप्पा बिराजदार व पोलीस तपास अधिकारी प्रकाश मोरे यांचा समावेश आहे. आरोपीच्या वतीने सदर मुद्दे खोडून काढण्यात आले. मात्र सक्षम पुरावे व महत्त्वाच्या साक्षी यामुळे आरोपी महादेव बनसोडे यास दहा वर्षे सक्त मजुरी व दंड सुनावण्यात आला.

 

आरोपी 5 ऑगस्ट 2021 पासून अटकेत असून त्यास अद्याप जामीन मिळाला नाही. या खटल्यात सरकारच्या वतीने ॲड. सारंग वांगीकर यांनी काम पाहिले.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ पंढरपुरात मतिमंद महिलेवर बलात्कार

पंढरपूर शहरात एक 40 वर्षीय अविवाहित मतीमंद महिलेवर गायीच्या गोठ्यात बलात्कार करून गर्भवती केलाच धक्कादायक प्रकार घडला आहे. या घटनेमुळे पंढरपूर शहरात खळबळ उडाली आहे. अर्जुन सूर्यकांत कदम याला याप्रकरणी अटक करण्यात आली आहे.

गेल्या सहा-सात महिन्यापासून पीडितेवर घरात कोणी नसताना तसेच गायीच्या गोठ्यात बोलावून मतिमंद असल्याचा फायदा घेऊन अर्जुन कदम याने अनेक वेळा बलात्कार केला आहे. ज्यावेळी पीडिता गोठ्यात जाण्यास नकार देत होती, त्यावेळी तिला दम देऊन, शिवीगाळ करून मारहाण करायचा तसेच जीव मारण्याची धमकी द्यायाचा. त्यामुळे घाबरून पीडिता त्याच्यासोबत गोट्यात जायची आणि तो तिच्यावर बलात्कार करायचा, अशी फिर्याद पिडीतेच्या बहिणीने पंढरपूर शहर पोलिसात दिली आहे.

 

पीडितेच्या पोटात दुखू लागल्याने फिर्यादीला काहीतरी वेगळे घडल्याचा संशय आल्याने पीडितेला विश्वासात घेऊन विचारणा केल्यानंतर हा सगळा प्रकार समोर आला. अर्जुन कदम याला पोलिसांनी अटक केली असून त्याला 6 दिवसाची पोलीस कोठडी सुनावली आहे. पुढील तपास पोलीस उपनिरीक्षक प्रशांत भागवत करत आहेत.

You Might Also Like

सोलापूर : टुर्स बुकिंगच्या आमिषातून ३१ लाखांची फसवणूक

जयकुमार गोरे यांच्या हस्ते बार्शी तालुक्यातील विकासकामांचे उद्घाटन

डॉ. वळसंगकर आत्महत्या : डॉ. शोनाली, डॉ. जोशींच्या सहीचे निवेदन व्हायरल

सोलापूर मनपा, नऊ नगर परिषदा, 11 पंचायत समित्यांच्या निवडणुकांचा मार्ग मोकळा

यशवंत पंचायत राजमध्ये सोलापूर जिल्हा परिषद तृतीय

TAGGED: #Solapur #10years #forcedlabor #rape #father-in-law #abused #daughter-in-law #Pandharpur, #सोलापूर #सुनेवर #अत्याचार #पंढरपूर #सासरा #10वर्ष #सक्तमजुरी #बलात्कार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article अतिरिक्त आयुक्तपदी संदिप कारंजे यांची नियुक्ती; कनिष्ठ अभियंता ते अतिरिक्त आयुक्त प्रवास
Next Article सोलापूर । प्रांताधिकारी हेमंत निकम यांच्या भ्रष्ट कामाची चौकशी स्थगित

Latest News

उरीच्या सीमावर्ती गावांमधील लोकांना स्थानांतरित केले
देश - विदेश May 9, 2025
दिल्लीतील ऐतिहासिक वास्तूंची सुरक्षा वाढवली
देश - विदेश May 9, 2025
पुणे विमानतळावरील १३ उड्डाणे रद्द
महाराष्ट्र May 9, 2025
भारताला प्रत्युत्तर देण्याचा अधिकार, पाकिस्तानने व्हिक्टिम कार्ड खेळू नये – निकी हॅले
देश - विदेश May 9, 2025
भारताच्या आयएनएस विक्रांतचा पाकिस्तानवर मोठा हल्ला
देश - विदेश May 9, 2025
पाकिस्तानातील अमेरिकन नागरिकांना लाहोर सोडण्याच्या सूचना
देश - विदेश May 9, 2025
भारत- पाकिस्तानातील वाढत्या तणावामुळे आयपीएलचा चालू हंगाम स्थगित
देश - विदेश May 9, 2025
चंद्रकांत पाटील यांनी ‍नवजात शिशू चोरी प्रकरणाची प्रत्यक्ष रूग्णालयात भेट देऊन केली विचारपूस
Top News May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?