Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अकलूजमध्ये बापाने केली गळा दाबून मुलाची हत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

अकलूजमध्ये बापाने केली गळा दाबून मुलाची हत्या

Surajya Digital
Last updated: 2021/11/30 at 3:01 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

अकलूज : लहान वयातच गुटखा खातो, व्यसन करतो, चोऱ्या करतो म्हणून बापानेच अल्पवयीन मुलाची गळा दाबून हत्या केल्याची घटना माळशिरस तालुक्यातील अकलूज येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर चौकात घडली आहे. यात आश्चर्य म्हणजे मृताच्या आईने, आरोपीच्या पत्नीनेच फिर्याद दिली.

याची अकलूज पोलीसात गुन्हा नोंद झाला आहे. घटनेतील आरोपी प्रशांत सावंत यास पोलीसांनी अटक केली आहे. याबाबत पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार येथील आंबेडकर चौकात राहणाऱ्या प्रशांत अर्जुन सावंत याचा मुलगा आलोक प्रशांत सावंत (वय १२ वर्षे) हा अल्पवयातच गुटखा खाऊ लागला व इतर व्यसन करु लागला. यातच त्याला चोरीची सवय लागली होती. यापूर्वी मयत आलोकने दोन वेळा चोऱ्या केल्या होत्या. त्याची भरपाई वडील प्रशांतने केली होती.

मुलाच्या सततच्या गैरकृत्याने आपली सतत बदनामी होत असल्याने बाप पुरता वैतागला होता. अशातच आलोकने नुकतीच आंबेडकर चौकातीलच धाईंजे यांच्या घरी चोरी केली होती. ही चोरी पकडली गेल्याने व चोरी केल्याची आलोकने कबुली दिल्याने झालेल्या बदनामीमुळे वडील प्रशांत अधिकच संतापला होता.

मुलगा लहान वयातच व्यसन करतोय, चोऱ्या करतोय, अनेकदा सांगितलं तरी ऐकत नाही. यामुळे आपली नाहक बदनामी होत आहे, याची वडील प्रशांतच्या डोक्यात अधिकच चिड निर्माण झाली. आता मुलाचा कायमचाच बंदोबस्त करायचा, असा निश्चय मनात करुन बापाने मुलगा अलोक यास गोड बोलुन चल तुला खाऊ देतो, असे अमिष दाखवून श्रीराम थियटर जवळली कठड्यात नेले. त्या ठिकाणी मोका साधून सख्या मुलाचा गळा दाबून खून केला.

मयत मुलाची आई व आरोपीची पत्नी भारती प्रशांत सावंत (वय 29 वर्षे ) हिने सदर गुन्ह्याची फिर्याद अकलुज पोलीस ठाण्यात दिली आहे. या फिर्यादेवरुन अकलूज पोलीस ठाण्यात गु. र. नं. 836/2021 भा द वि 302 अन्वये गुन्हा नोंद झाला आहे. घटनेतील आरोपी प्रशांत अर्जुन सावंत (वय 34) यास पोलीसांनी अटक केली आहे. घटनेचा पुढील तपास पो नि अरुण सुगावकर यांच्या नेतृत्वाखाली सपोनी मारकड करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* बनावट एटीएम कार्डद्वारे ग्राहकांचा डाटा चोरी करण्याचा प्रयत्न
सोलापूर : बनावट एटीएम कार्डद्वारे ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढून घेण्याचा व ग्राहकांचा डाटा चोरी करण्याचा प्रयत्न करण्याची घटना दि.१९ ते २७ नोव्हेंबर दरम्यान बँक ऑफ इंडिया रेल्वे लाईन सोलापूर येथे घडली.याप्रकरणी रवि नारायण इंजामुरी (वय-३२,रा.कुचन नगर,शहर पोलीस हेडकॉटर सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,कोणीतरी अज्ञात चोरट्याने बँक ऑफ इंडिया या एटीएम मध्ये ग्राहकांचे कार्ड मधील डाटा रिडींग करण्यासाठी डिवाइस व ग्राहकांचे टाईप केलेले पिन नंबर रेकॉर्ड करण्यासाठी दुसरे डिवाइस तयार केले.त्यानंतर त्या बनावट एटीएम कार्ड द्वारे ग्राहकांच्या खात्यातील पैसे काढून घेण्याचा व ग्राहकांचा डाटा चोरी करण्याचा प्रयत्न केला आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोसई शिरसागर हे करीत आहेत.
* दुचाकी व सायकलची धडक ; एकावर गुन्हा
सोलापूर : दुचाकीने सायकलला धडक देऊन एकास गंभीर जखमी केल्याची घटना दि.२ नोव्हेंबर रोजी रात्री आठ वाजण्याच्या सुमारास दादाश्री रिक्षा स्टॉप जवळ सोलापूर येथे घडली.या प्रकरणी इरफान इसाक शेख (वय-३६, रा. मुरारजी पेठ, सोलापूर) यांनी सदर बाजार पोलिस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून अंजन जगले (रा.कोणापुरे चाळ,सोलापूर) यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
याबाबत अधिक माहिती अशी की,वरील संशयित आरोपीने त्याच्या ताब्यातील मोटारसायकल क्रमांक एम.एच.१३.डी. ०४३४ हे वाहन अती वेगाने व भरधाव वेगात चालून फिर्यादी यांच्या वडिलांच्या सायकलला पाठीमागील बाजूस धडक देऊन वडिलांना गंभीर जखमी करून सायकलच्या नुकसान करण्यास कारणीभूत ठरला आहे.असे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेची नोंद सदर बाजार पोलीस ठाण्यात झाली असून,या घटनेचा पुढील तपास पोलिस नाईक लोंढे हे करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Father #kills #son #bystrangling #Akluj, #अकलूज #बापाने #गळा #दाबून #मुलाची #हत्या
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article वैराग नगरपंचायत : भूमकर गट राष्ट्रवादीच्या तर राऊत गट भाजपच्या चिन्हावर निवडणूक लढविणार  
Next Article तुळजापुरात डान्सबारवर छापा; नृत्यांगना, ग्राहकांसह ९२ जण ताब्यात

Latest News

crime
मोर्शीत चाकूच्या धाकावर फायनान्स कर्मचाऱ्यांना लुटले
देश - विदेश June 26, 2025
देशाचे सरन्यायाधीश भूषण गवई यांचा हृदय सत्कार
देश - विदेश June 26, 2025
उत्तराखंड : प्रवाशांनी भरलेली बस नदीत कोसळली, एकाचा मृत्यू तर अनेक जण बेपत्ता, बचावकार्य सुरु
देश - विदेश June 26, 2025
मेक्सिको : धार्मिक उत्सवादरम्यान गोळीबार,१२ जणांचा मृत्यू तर २० जखमी
देश - विदेश June 26, 2025
अमली पदार्थास नकार, भावी पिढीस आकार
महाराष्ट्र June 26, 2025
दहशतवादाचे समर्थन करणाऱ्यांना परिणाम भोगावे लागतील – राजनाथ सिंह
देश - विदेश June 26, 2025
छत्रपती शाहू महाराज जयंतीनिमित्त विविध मान्यवरांकडून विनम्र अभिवादन
महाराष्ट्र June 26, 2025
अहिल्यानगर : सारडा विद्यालयात विद्यार्थ्याने केली हत्या
महाराष्ट्र June 26, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?