Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जो पक्ष तिकीट देईल त्यांच्याकडे जाणार, पण लढणार शहर उत्तरमधूनच : महेश कोठे
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

जो पक्ष तिकीट देईल त्यांच्याकडे जाणार, पण लढणार शहर उत्तरमधूनच : महेश कोठे

Surajya Digital
Last updated: 2022/12/27 at 1:00 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
● ज्यांना मी नको त्यांनी पवारांकडे तक्रार करावीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● ज्यांना मी नको त्यांनी पवारांकडे तक्रार करावी

● ज्यांना मी नको त्यांनी पवारांकडे तक्रार करावी

 

सोलापूर : मी राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष सोडला, असे कधीही म्हटले नाही. पण, आमदार व्हायचे ठरवले आहे. त्यामुळे विधानसभेची आगामी निवडणूक मी शहर उत्तर मतदारसंघामधून लढणार आहे. जो पक्ष आमदारकीचे तिकीट देईल; त्या पक्षात राहण्याचा माझा प्रयत्न असणार आहे, अशी भूमिका माजी महापौर महेश कोठे यांनी जाहीर केली. The party that gives the ticket will go to them, but the city will fight North Solapur: Mahesh Kothe Sharad Pawar complaint

गेल्या दोन दिवसांपासून महेश कोठे हे बाळासाहेबांच्या शिवसेनेत म्हणजेच एकनाथ शिंदे गटात प्रवेश करणार, अशी चर्चा सुरू झाली आहे. त्या पार्श्वभूमीवर बोलताना कोठे यांनी ही भूमिका स्पष्ट केली. कोठे म्हणाले की, माझी मागणी आमदारकीची आहे. पण, महेश कोठे आमदार कसे होणार नाहीत, यासाठी सगळ्यांनी आत्तापर्यंत प्रयत्न केले आहेत. पण यंदा आमदारकी घ्यायचीच, असे आम्ही ठरवले आहे.

आमदार काय काम करू शकतो, हे सोलापूरला दाखवायचे आहे. त्यामुळे आम्ही आमच्या ध्येयापासून जराही विचलित होणार नाही. ते म्हणाले की, एका कार्यक्रमात मी सोलापूरच्या निधीबाबत मुख्यमंत्र्यांचे निकटवर्तीय मंगेश चिवटे यांच्याशी बोललो होतो.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

 

महेश कोठे हे शिंदे गटात प्रवेश करत असतील तर निधी दिला जाईल, असे त्यांनी मला सूचित केले होते. मात्र, मी राष्ट्रवादी सोडली, असे कधीही म्हटलेले नाही. काही लोक माझ्याविरोधात कायम बोलत असतात. मात्र त्यांच्याबद्दल मी जास्त बोलू इच्छित नाही. मला मुख्यमंत्री शिंदे यांनीही भेटायला बोलावले होते. पण, मी त्यांना सांगितले की, मी यापुढची निवडणूक शहर उत्तरमधून लढवणार आहे. त्यामुळे जी पार्टी मला शहर उत्तरमधून तिकीट देईल, त्या पार्टीत राहण्याचा माझा प्रयत्न आहे, असेही महेश कोठे यांनी स्पष्ट केले.

 

● ज्यांना मी नको त्यांनी पवारांकडे तक्रार करावी

 

ज्यांना मी राष्ट्रवादीत नको आहे, त्यांनी माझी तक्रार पक्षाचे सर्वेसर्वा शरद पवार यांच्याकडे करावी. पवार यांना वाटले की माझ्यापेक्षा ते सक्षम आहेत, तर ते त्यांच्याकडे नेतृत्व देतील. त्यामुळे हा विषय आपल्या अखत्यारीतील नसल्यामुळे त्यांनी आपली कुवत बघून वागावे. कोणाला नेतृत्व द्यायचे आणि कोणाला द्यायचे नाही, हे पवार यांना माहिती आहे, त्यामुळे पवार यांनी पक्षात कार्यकर्ता म्हणून काम करण्यास सांगितले तरी ते मी करायला तयार आहे, असेही कोठे यांनी स्पष्ट केले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

TAGGED: #party #ticket #gotothem #city #fight #NorthSolapur #MaheshKothe #SharadPawar #complaint, #पक्ष #तिकीट #लढणार #शहरउत्तर #महेशकोठे #सोलापूर #शरदपवार #तक्रार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंढरपूरकरांचा विकास आराखडा शासनास सादर; वारकरी संप्रदाय स्थानिक नागरिकांच्या सूचनांचा समावेश
Next Article सोलापूर । कंटेनरच्या धडकेत माथाडी कामगार जागीच ठार, तीन जखमी

Latest News

Gentle Monster Jennie Kpop Sunglasses Up to 30% Off
Top News December 6, 2025
test
Top News December 5, 2025
Как страх неудачи повышает чувство азарта
Top News December 5, 2025
Gleichwohl dies Markt nv casino stieg erst inoffizieller mitarbeiter fruhen nineteen
Top News December 5, 2025
По какой причине мозг выявляет паттерны даже и в хаосе
Top News December 5, 2025
По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?