Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: वाहतूक पोलिसाला फरफटत नेले; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

वाहतूक पोलिसाला फरफटत नेले; तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/11/29 at 1:20 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : येथील भैया चौकातील बसथांब्याजवळ वाहतूक शाखेच्या पोलिसाला फरफटत नेऊन त्याचा हात फ्रॅक्चर करण्यास कारणीभूत ठरल्याबद्दल तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत पोलीस शिपाई अमोल सुरेश बेगमपुरे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून नागनाथ बाळू कोकरे (वय २७, रा. साठे पाटील वस्ती, दमाणीनगर) याच्याविरुद्ध फौजदार चावडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. फिर्यादी हे भैया चौकात वाहतूक नियमनाचे काम करीत होते. त्यावेळी आरोपी हा विनानंबरप्लेटच्या मोटरसायकलवरून मरीआई चौकातून भैया चौकाकडे जात होता. फिर्यादीने त्यास थांबण्याचा इशारा केला असता, त्याने मोटारसायकल थांबवली नाही.

पोलिसाने मोटारसायकलच्या पाठीमागील बाजूस बारला धरले असता दुचाकी न थांबवता त्यांना तसेच फरफटत नेले. त्यामुळे पोलिसाच्या उजव्या हाताचे हाड फ्रॅक्चर झाले आहे. फिर्यादीस जखमी करून शासकीय कामात अडथळा आणल्याबद्दल कोकरेविरुध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. अधिक तपास सहायक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करीत आहेत.

* तिर्‍हे येथे अपघातात दुचाकीवरील मजूर ठार

सोलापूर – तिर्‍हे येथील सिद्धनाथ साखर कारखान्याजवळ अनोळखी वाहनाच्या धडकेने दुचाकीवरील सुनील सिद्राम माळी ( वय ३२ रा. हिरज ता. उत्तर सोलापूर) हा मजूर गंभीर जखमी होऊन मरण पावला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हा अपघात शनिवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास घडला. सुनील माळी हा कारखान्यात मजुरी करीत होता. काल रात्री तो दुचाकीवरून कारखान्याकडे निघाला होता. तिर्हे ते सोलापूर रोड वरील अनोळखी वाहनाच्या धडकेने तो गंभीर जखमी झाला होता. त्याला तालुक्याच्या पोलिसांनी शासकीय रुग्णालयात दाखल केले असता तो उपचारापूर्वीच मयत झाला.

या अपघाताची नोंद तालुका पोलिसात झाली. ट्रॅक्टरच्या धडकेने अपघात झाल्याचा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला. हवालदार सय्यद पुढील तपास करीत आहेत .

* रेल्वेखाली सापडून तरुण ठार

सोलापूर – विजापूर रोडवरील संभाजी तलावाजवळ धावत्या रेल्वे खाली सापडल्याने शंकर सिद्धाराम  आळगुंडगी (वय ३२ रा.किसाननगर, देवी मंदिराजवळ अक्कलकोट रोड) हा तरुण मयत झाला. ही घटना शनिवारी (ता. २७) रात्रीच्या सुमारास उघडकीस आली.

शंकर आळगुंडगी हा अविवाहित असून तो टॉवेल कारखान्यात कारखान्यात मजुरी करीत होता. बऱ्याच दिवसापासून त्याला काम नसल्याने तो निराश होता.  घटनेच्या एक दिवसापूर्वी तो कामाला जातो म्हणून घरारन गेला होता. काल त्याचा मृतदेह रेल्वे रुळाजवळ आढळला. खिशातील आधार कार्ड वरून त्याची ओळख पटली.

या घटनेची नोंद विजापूर नाका पोलीस ठाण्यात झाली. असून हवालदार हार पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी

सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश

सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

TAGGED: #Took #traffic #police #rampage #crime #youth, #वाहतूक #पोलिस #फरफटत #तरुणाविरुद्ध #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कर्नाटकातील अपघातात सोलापूरच्या माजी सरपंचासह चार ठार, घातपाताचा संशय
Next Article कृषी कायदे मागे घेण्याचे विधेयक मंजूर; गोंधळ घातल्याने बारा खासदारांचे निलंबन

Latest News

बच्चू कडूंना हटवण्यामागे काँग्रेससोबत राज्य शासनाची छुपी युती?
Top News June 25, 2025
‘माळेगावा’त शरद पवारांना धक्का
महाराष्ट्र June 25, 2025
स्वबळावर सत्ता आणण्याची दक्षता; मुख्यमंत्र्यांचे पुण्याकडे विशेष लक्ष
महाराष्ट्र June 25, 2025
सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा
सोलापूर June 25, 2025
आषाढी वारीत वारकर्‍यांना आवश्यक सुविधांसाठी  15 कोटी रुपयांचा निधी
सोलापूर June 25, 2025
सोलापूर पालिका आयुक्त डॉ. ओम्बासे यांच्या ओबीसी प्रमाणपत्राच्या चौकशीचे आदेश
सोलापूर June 25, 2025
पंतप्रधान मोदींकडून शुभांशु शुक्लांना खास शुभेच्छा
देश - विदेश June 25, 2025
भारतीय अंडर-१९ संघाची विजयी सलामी
खेळ June 25, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?