नांदेड, 12 सप्टेंबर।
मराठा आरक्षणासाठी प्राण गमावणाऱ्या आज नांदेड विधानसभा मतदारसंघाचे शिवसेना आमदार आनंद बोंढारकर मतदारसंघातील वाडीपुयड गावातील कै.जयवंत माधव कदम या मराठा समाज बांधवाच्या कुटुंबाला आज राज्य सरकारच्या वतीने दहा लाख रुपयांची आर्थिक मदत देण्यात आली.
संघर्षयोद्धा मनोज दादा जरांगे यांच्या 29 ऑगस्ट रोजी मुंबईत झालेल्या आंदोलनाच्या यशामुळे अखेर हा निधी उपलब्ध झाला.
यावेळी तहसीलदार सुरेश वाडकर,स्वाभिमानी संभाजी ब्रिगेड संस्थापक अध्यक्ष माधवराव पाटील देवसरकर,शिवसेना तालुकाप्रमुख उद्धव पाटील शिंदे,पै.बाळु पाटील मोरे, युवासेना तालुकाप्रमुख बालाजी पाटील सपुरे यांच्यासह गावातील ज्येष्ठ व प्रतिष्ठित नागरिक उपस्थित होते.