ठाणे : ठाण्याच्या मुंब्रा येथील प्राईम रुग्णालयाला मध्यरात्री 3 वाजता आग लागली. या आगीत 4 जणांचा मृत्यू झाल्याची माहिती देण्यात आली आहे. मदत कार्य चालू असून आग आटोक्यात आली, अशी माहिती मंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांनी दिली. दरम्यान, मृत्यूमुखी झालेल्याच्या कुटुंबाला 5 लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मध्यरात्रीच जाहीर केली. जखमींना 1 लाख देण्यात येणार आहे.
ठाणे- मुंब्रा येथील प्राईम क्रिटीकेअर रुग्णालयाला रात्री लागलेल्या भीषण आगीच्या चौकशीचे आदेश देण्यात आले आहेत. मृतांच्या कुटुंबियांना 5 लाखांची मदत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी जाहीर केली आहे. तसेच जखमींना 1 लाख रुपये दिले जाणार आहेत. या आगीतील मृतांचा आकडा 4 वर पोहोचला आहे. तर काही रुग्ण गंभीर आहेत. या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यातील 6 जण आयसीयूमध्ये होते.
https://twitter.com/Awhadspeaks/status/1387196379437613064?s=19
ठाण्यातील मुंब्रा येथील प्राईम क्रिटिकेअर रुग्णालयाला मध्यरात्रीच्या सुमारास भीषण आग लागली. यामध्ये एकूण 4 जण दगावल्याची माहिती, पोलिसांनी दिली आहे. या रुग्णालयात एकूण 26 रुग्ण होते. यामध्ये 6 रुग्णांवर आयसीयूमध्ये उपचार सुरु होते. ठाण्याच्या मुंब्रा कौसा भागात प्राईम क्रिटिकेयर रुग्णालयात पहाटे चारच्या सुमारास भीषण आग लागली.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
घटनेची माहिती मिळताच अग्निशमन दलाच्या चार गाड्या घटनास्थळी दाखल झाल्या. या रुग्णालयाच्या पहिल्या मजल्यावर आग लागल्याची प्राथमिक माहिती मिळत आहे. आग लागली तेव्हा अनेक रुग्ण रुग्णालयात होते, त्यांना बाहेर काढण्यात आलं आहे. आगीवर नियंत्रण मिळवण्यात अग्निशमन दलाला यश आलं असून यामध्ये चार जणांचा मृत्यू झाला असल्याची माहिती मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी दिली आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1387224622064562177?s=19
पहाटेच्या सुमारास ठाण्यातील या रुग्णालयाला आग लागली. पहिल्या मजल्यावरील एका मीटरमध्ये ही आग लागली आणि त्यानंतर ही आग संपूर्ण रुग्णालयात पसरली.
काही वेळातचं आगीनं रौद्ररुप धारण केलं. आगीमुळे रुग्णालयात धुराचे लोळ उसळत होते. ही आग आयसीयूपर्यंत गेली होती. आगीमुळे पसरलेल्या धुरामुळे आयसीयूमधील रुग्णांना श्वास घेण्यास त्रास झाला. तसेच रुग्णांना इतर रुग्णालयामध्ये शिफ्ट करत असताना चार रुग्ण दगावल्याची माहितीही यावेळी अधिकाऱ्यांनी दिली. दरम्यान, रुग्णालयात एकूण 26 रुग्णांवर उपचार सुरु होते. आग लागल्यानंतर रुग्णांना ठाण्यातील इतर रुग्णालयात स्थलांतरीत करण्यात आलं आहे.
https://twitter.com/SurajyaDigital/status/1387085807803002881?s=19