अहिल्यानगर दि. 20 एप्रिल (हिं.स.) :- नगर तालुक्यातील आदर्शगाव हिवरेबाजार येथील डोंगराला दुपारी अचानक वाजता आग लागली. पद्मश्री पोपटराव पवार यांच्या मार्गदर्शनाखाली हिवरे बाजारमध्ये ग्रामसुरक्षा यंत्रणा कार्यन्वित असल्याने तरुण व ग्रामस्थ घटनास्थळी हजर झाले.ग्रामस्थ व तरुण मंडळ तसेच ग्रामवन समितीचे सदस्य यांच्या अथक प्रयत्ना तून आग तब्बल ५ तासांच्या प्रयत्ना नंतर नियंत्रणात आली.
गेल्या महिनाभरात हिवरे बाजारच्या डोंगराला वणवा लागण्याची हि तिसरी वेळ असून शेजारील गावातील शेतकऱ्यांनी शेताचा बांध पेटवून दिल्यामुळे डोंगरा ला आग लागली.सन २०१८ पासून आतापर्यंत जवळपास २३ वेळा हिवरे बाजारचे ग्रामस्थांनी डोंगराची आग विझवली आहे.