Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर हल्ला, दगड-बिअर बाटल्या भिरकावून केला गोळीबार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

बार्शीत माजी नगरसेवकाच्या घरावर हल्ला, दगड-बिअर बाटल्या भिरकावून केला गोळीबार

Surajya Digital
Last updated: 2021/12/04 at 2:18 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

बार्शी : सोलापूरमध्ये बार्शी-आगळगाव रस्त्यावर वाणी प्लॉट परिसरात राहणाऱ्या माजी नगरसेवक विनोद संजय वाणी यांच्या बंगल्यावर अज्ञातांनी हल्ला केल्याची घटना घडली. बंगल्याच्या गेटवर चढून आवारात दगड आणि बियर बाटल्या फेकल्या. गावठी पिस्तुलातून हवेत दोन वेळा फायरिंग केली. पहाटे अडीचच्या सुमारास घडलेल्या घटनेने एकच खळबळ उडाली आहे.

बार्शीतील माजी नगरसेवक विनोद वाणी यांच्या सुभाषनगर भागातील घरावर चौघाजणांनी बियरच्या बाटल्या फेकत शिवीगाळ, दगडफेक, गोळीबार करुन हल्ला केल्याचा खळबळजनक प्रकार शुक्रवारी रात्री घडला. सदरील हल्ला राजकीय कारणावरुन घडला असल्याचा आरोप वाणी यांनी केला आहे.

नगरपालिका निवडणूकीपूर्वी शहरात दहशत माजविण्याचा प्रयत्न होत असल्यामुळे पोलिस दलाकडून याची गंभीर दखल घेतली गेली आहे. पोलिस अधीक्षक तेजस्वी सातपुते, उपविभागीय पोलिस अधिकारी विशाल हिरे यांनी घटनास्थळी भेट देवून पाहणी केली. याबाबत विशाल संजय वाणी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन सोन्या हाजगुडे , विपुल यादव , नागेश चव्हाण तिघेही (रा.  वाणी प्लॉट, बार्शी), सोमा कदम ( रा. कथले प्लॉट, बार्शी) यांच्याविरोधात शहर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

आज शनिवारी पहाटे पाचच्या सुमारास या घटनेचा पंचनामा करण्यात आला. दरम्यान न उडालेले तेथे पडलेलं एक जिवंत काडतूस आणि हवेत फायरिंग केल्यानंतर आवारात पडलेली पुंगळी पोलिसांनी जप्त केली. पोलिसांच्या चौकशीत आरोपी हे दोन दुचाकीवरून आले होते, अशी माहिती मिळाली. पोलिसांनी या घटनेचा तपास करीत काही संशयितांना ताब्यात घेतले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुभाषनगर भागातील वाणी प्लॉटमध्ये विनोद वाणी यांचा बंगला आहे. रात्रौ 2.30 ते 3 च्या सुमारास घरातील मुख्य हॉलमध्ये त्यांचे बंधू विशाल हे टी.व्ही. पहात बसले होते. यावेळी आरोपी गेटसमोर आले. त्यांनी मोठमोठ्याने वाणी बाहेर ये असा आरडाओरडा करत गेटवरुन बियरच्या बाटल्या फेकत शिवीगाळ करून दगडफेक केली. त्यानंतर गेट वर चढून त्यांनी दरवाजाच्या दिशेने पिस्तुल सारख्या शस्त्राने गोळीबार केला.

त्यांनी एक दार उघडून बघितले असता गेटवर चढलेले आरोपी दिसले. ते घरात शिरतील म्हणून त्यांनी तत्काळ दार बंद करून फोनवरुन पोलिसांशी संपर्क केला. पंधरा मिनिटांत सहाय्यक पोलीस निरीक्षक कर्नेवाढ आणि त्यांचे पथक दाखल होताच आरोपींनी तेथून पळ काढला.

यावेळी वाणी बंधूंनी तत्काळ पोलिसांशी संपर्क केला. पंधरा मिनिटात पोलिस घटनास्थळी पोहचले. मात्र पोलिस येण्याची कुणकुण लागताच हल्लेखोर फरार झाले. घटनास्थळी एक जिवंत काडतूस आणि एक पुंगळी सापडली आहे. मागील झालेल्या भांडणास फिर्यादी जबाबदार आहे. अशा समजुतीतून हा हल्ला झाल्याचे फिर्यादीत नमूद करण्यात आले आहे.

काल शुक्रवारी पोलीस निरीक्षक रामदास शेळके यांनी घटनास्थळी भेट देऊन पाहणी केली. दरम्यान, याबाबत बार्शी शहर पोलिसांत विशाल वाणी यांनी तक्रार दिली आणि रात्री उशिरापर्यंत गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू होती. याबाबत पुढील तपास स.पो.नि. स्वप्नील इज्जपवार करीत आहेत.

* हल्ल्याची पार्श्वभूमी

29 नोव्हेंबर 21 रोजी फिर्यादीचा मित्र विकी जाधव आणि आरोपीव्दय विपुल यादव व नागेश चव्हाण यांची दुपारी 2 वा. हॉटेल अश्वराज येथे तसेच दु. 4 वा. रिंगरोड येथील किरण स्वामी यांचे गॅरेजवर भांडण झाले होते. यातील सर्व संबंधित परिचित असल्याने फिर्यादीने त्यांचे भांडण सोडविले होते. त्यानंतर दुसर्‍या दिवशी 30 नोव्हेंबर 21 रोजी रात्री 11 वा. त्यांची नगरसेवक बापू वाणी यांच्या घराच्या जवळ पुन्हा भांडण झाले. ते भांडण सुध्दा फिर्यादीने मिटविले.
त्यानंतर 2 डिसेंबर 21 रोजी संध्याकाळी 7 वा. विपुल यादव, सोन्या हाजगुडे व इतर दोन ते तीन जणांनी किरण स्वामीचे घरी पंकजनगर येथे जावून तोडफोड केली व किरण स्वामी व त्याचा भाऊ स्वप्निल स्वामी यांना मारणार असल्याची धमकी दिली. त्यामुळे फिर्यादीने किरण स्वामी यास पोलिसांकडे जावून फिर्याद देण्यास सांगितले होते. मात्र भितीमुळे स्वामी पोलिसांकडे गेला नाही. त्यानंतर मध्यस्थी करणार्‍या विशाल वाणी यांच्या घरावरच दहशत बसविण्याच्या उद्देशाने हा हल्ला झाला.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Attack #former #corporator's #house #Barshi #firing #stone-beer #bottles, #बार्शी #माजीनगरसेवक #घरावर #हल्ला #दगड-बिअर #बाटल्या #गोळीबार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डिसेंबर महिन्यात अंतराळप्रेमींना अनुभवता येणार नयनरम्य उल्कावर्षाव
Next Article फवारणी करताना तोंडात विषारी द्रव गेल्याने शेतकऱ्याचा मृत्यू

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?