Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Snake bite सोलापुरात सर्पदंशाने बालक ठार, जिवंत धामिणीचे तुकडे केल्याने पाचजणांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

Snake bite सोलापुरात सर्पदंशाने बालक ठार, जिवंत धामिणीचे तुकडे केल्याने पाचजणांना अटक

Surajya Digital
Last updated: 2022/06/04 at 6:55 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ जिवंत धामिणीचे तुकडे; सहा जणांना अटक; वनविभागाची कारवाईस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

सोलापूर : दक्षिण सोलापूर तालुक्यातील विंचूर येथे एक लहान बालकास आपल्या घरासमोर खेळत होता. त्यावेळेस त्याला अचानक विषारी जातीच्या सापाने त्याच्या पायाचा चावा घेतला. यात त्या बालकाचा मृत्यू झाला. Snake bite kills child in Solapur, five arrested for chopping live arteries

शैलू नागनाथ नागणसूर (वय 8, विंचूर, ता. दक्षिण सोलापूर ) असे मृत बालकाचे नाव आहे. तत्काळ या घटनेची माहिती दक्षिण तालुक्यातील सर्पमित्र मधुकर राठोड यांना फोनवरून याची माहिती दिली. मधुकर राठोड यांनी त्यांना पुढील उपचारासाठी सिव्हिल हॉस्पिटल येथे जाण्यासाठी सांगितले. नागणसूर यांनी त्या बालकास मंद्रूप येथील हॉस्पिटल येथे घेऊन गेले परंतु उपचारापूर्वीच त्या बालकाचा मृत्यू झाला होता.

वेळेवर उपचार न झाल्यामुळे या बालकाचा मृत्यू झाला. या घटनेमुळे संपूर्ण विंचूर गावावर शोककळा पसरली आहे शेलु हा आई वडीलास एकुलता एक पोरगा होता.

 

□ जिवंत धामिणीचे तुकडे; सहा जणांना अटक; वनविभागाची कारवाई

सोलापूर : जिवंत धामिणी पकडून त्याचे तुकडे करणारा व्हिडिओ सोशल मीडियावर टाकणाऱ्या सहाजणांना वनविभागाने अटक केली. यामुळे खळबळ उडाली आहे.

 

२४ मे रोजी उमरगा तालुक्यातील बेटजवळगा येथील सहा मित्र शिवारात फिरत असताना त्यांना धामण जातीचा साप दिसला. त्या धामण सापास त्यांनी पकडले आणि ऊस तोडायच्या कोयत्याने जिवंतच कापून सहा तुकडे केले. यानंतरही सापाची तडफड सुरूच होती. कोयत्याने तोंडाचे तुकडे करताना धडापासून वेगळी झालेली शेपूट वळवळ करत असल्याचे व्हिडिओत स्पष्ट दिसते. व्हिडिओमधील सर्व मुले हसत हसत सापाची अवहेलना करताना दिसत होते. अशा या माथेफिरू क्रूर कृत्याचा व्हिडिओ त्यातील एकाने आपल्या मोबाईलमध्ये काढला आणि सोशल मीडियावर टाकला. असा हा अंगावर शहारे आणणारा व्हिडिओ सोशल मीडियावर वाऱ्याच्या वेगाने पसरला.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

 

हा व्हिडिओ सोलापूरचे सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांच्या हाती लागताच त्यांनी हा व्हिडिओ व अन्य गुप्त माहिती महाराष्ट्राचे प्रधान मुख्य वनसंरक्षक सुनील लिमये व बसवराज होसगौडर वकिलांना पाठवला. सुनील लिमये यांनी लवकरात लवकर सर्वांना अटक करू, असा शब्द दिला. तर बसवराज वकिलांनी दिलेल्या माहितीच्या आधारे त्या सहा जणांवर गुन्हा दाखल केला. महाराष्ट्रातील असंख्य सपप्रेमींकडून घटनेचा निषेध करत निवेदने देण्यात आली.

गुन्हा दाखल होताच उस्मानाबाद वनविभागाची टीम घटनास्थळी पोहोचली पण तोपर्यंत आरोपी फरार झाले होते. ३१ मे रोजी वनविभागाला सर्व आरोपींना पकडण्यात यश आले. या गुन्ह्याचा तपास करून बुधवारी (दि.१) श्रीकांत जयानंद जाधव (वय २१, रा. येणेगुर, ता. उमरगा). अशिष संजय माने (वय २१, रा. माडज, ता. उमरगा), महादेव दिगंबर कांबळे (वय १९, रा. नाईचाकूर, ता. उमरगा) यांच्यासह अन्य तीन अल्पवयीन आरोपींना ताब्यात घेतले. तुकडे करताना धडापासून वेगळी सर्वांना अटक करू, असा शब्द दिला.

त्यांच्यावर भारतीय वन अधिनियम १९७२ चे कलम ९ व ५१ अन्वये प्रथम वनगुन्हा नोंदविण्यात आला. सहाय्यक वनसंरक्षक व वन परिक्षेत्र अधिकारी श्रीमती व्ही. बी. तांबे यांच्या मार्गदर्शनाखाली वनरक्षक टी. ए. डिगोळे, एन. बी. कोकाटे व जी. एल. दांडगे यांनी तपास करून आरोपींना अटक केली. त्यांची वनकोठडीत रवानगी करण्यात आली. साप मारणे, त्याला इजा पोहोचवणे, त्याचे प्रदर्शन करणे, जवळ बाळगणे हा वन्यजीव अधिनियम १९७२ अन्वये गुन्हा असून असे कोणी करत असल्याचे दिसताच वनविभागाच्या १९२६ या टोल फ्री क्रमांकावर संपर्क साधावा, असे आवाहन सर्प अभ्यासक राहुल शिंदे यांनी केले.

 

 

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Snake #bite #kills #child #Solapur #five #arrested #chopping #live #arteries #umraga, #सोलापूर #सर्पदंश #बालक #ठार #जिवंत #धामिणी #तुकडे #उमरगा #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ऑक्सिजन टाकीचा स्फोट होवून पाच लाखांचे नुकसान, जीवितहानी नाही
Next Article Alumni Commitment माजी विद्यार्थ्याची बांधिलकी : सोलापूर सिव्हिल हॉस्पिटलसाठी २० लाखांची लॅप्रोस्कोपिक मशीन दान

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?