नांदेड, 19 ऑगस्ट – नांदेड जिल्ह्यात मुसळधार पावसामुळे मोठे नुकसान झाले असून मुखेड तालुक्यात पाच जणांचा मृत्यू झाल्याची प्राथमिक माहिती समोर आली आहे. आतापर्यंत १५० जनावरांचा बळी गेला असल्याचे सांगितले जात आहे.
हसनाळ येथे अनेक घरे उद्ध्वस्त झाली असून घरगुती साहित्य पाण्यासोबत वाहून गेले आहे. ग्रामस्थांना उघड्यावर राहण्याची वेळ आली असून अन्नधान्याच्या अभावामुळे उपासमारीची परिस्थिती निर्माण झाली आहे. स्थानिकांच्या मते, हसनाळ येथे पाच जणांचा मृत्यू झाला आहे.
दरम्यान, परिस्थिती गंभीर होत असल्याने हसनाळ गावात आर्मीच्या जवानांकडून बचावकार्य सुरू करण्यात आले आहे.