Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माघी वारी : पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना, नगरपालिकेच्या उपबंधाऱ्यातून  चंद्रभागेत सोडले पाणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

माघी वारी : पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना, नगरपालिकेच्या उपबंधाऱ्यातून  चंद्रभागेत सोडले पाणी

Surajya Digital
Last updated: 2022/02/11 at 10:12 AM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

पंढरपूर :  माघी  यात्रेनिमित्त  श्री विठ्ठल-रुक्मिणीच्या दर्शनासाठी लाखो भाविक येतात. या यात्रेत येणाऱ्या भाविकांची  गैरसोय होणार नाही यासाठी प्रशासनाने व मंदीर समितीने  आवश्यकती  तयारी केली असून, यात्रेत भाविकांच्या सोयी, सुविधा, स्वच्छता तसेच सुरक्षितेला प्राधान्य देण्यात आले आहे. भाविकांच्या सुविधेसाठी आपत्ती व्यवस्थापन कक्ष 24 तास कार्यरत राहणार असल्याची माहिती  प्रांताधिकारी तथा मंदीर समितीचे कार्यकारी अधिकारी गजानन गुरव यांनी दिली.

माघी  वारीत येणाऱ्या भाविकांना आवश्यक सोयी-सुविधा तात्काळ मिळाव्यात त्याचबरोबर आरोग्याच्या व सुरक्षिततेच्या दृष्टीने  कोणतेही गैरसोय होऊ नये  यासाठी  पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल – रुक्मिणी मंदीर, नगरपालिका या पाच ठिकाणी आपत्ती व्यवस्थापन कक्षाची स्थापना केली आहे. आपत्ती व्यवस्थापन कक्षात नेमणूक केलेल्या अधिकारी व कर्मचारी यांनी आपली जबाबदारी चोखपणे पार पाडावी, असे निर्देश प्रांताधिकारी गुरव यांनी दिले.

आरोग्य विभागामार्फत यासाठी  पत्राशेड, 65 एकर, चंद्रभागा वाळवंट, विठ्ठल-रुक्मिणी मंदीर येथे प्रथमोपचार केंद्र उभारण्यात आली आहेत. तसेच या ठिकाणी मुबलक प्रमाणात औषधसाठा   उपलब्ध करण्यात आला आहे. सर्व सुविधायुक्त रुग्णवाहिका सज्ज ठेवण्यात आली आहे. Maghi Wari: Disaster Management Cells Established at Five Places, Water Released to Lunar Region

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

तसेच नगरपरिषदेकडून दर्शन रांग, पत्राशेड, चंद्रभागा वाळवंट, 65 एकर व मंदीर परिसर येथे वेळोवेळी स्वच्छता करण्यात येत आहे. आवश्यक ठिकाणी बॅरेगेटींगची व्यवस्था करण्यात आली आहे. त्याचबरोबर प्रदक्षिणामार्गावरील खड्डे बुजविण्यात आले असून,  दर्शन रांगेत स्वच्छ पिण्याच्या पाण्याची व्यवस्था, दिशा दर्शक फलक आदी व्यवस्था करण्यात आली आहे.

65 एकर परिसरात मुबलक प्रमाणात पाणी व्यवस्था, अखंडीत व सुरक्षित विद्युत पुरवठा, अग्निशमन व्यवस्थेसह फिरते आरोग्य पथकांची  नेमणूक करण्यात आली आहे. नदीपात्रात स्वच्छता व पुरेसा प्रकाश राहील याची दक्षता घेवून,  शहरात कोविड-19 संसर्ग रोगप्रतिबंधक औषधाची  फवारणी,  शहरात वाहतुक व्यवस्था सुरळीत रहावी, वाहतुकीस कोणतेही अडचण येवू नये यासाठी शहराबाहेर मोकळया जागेवर वाहन  पार्किग व्यवस्था करण्यात आली आहे. तसेच भाविकांच्या सुरक्षिततेसाठी पोलीस प्रशासनाकडून आवश्यकतो बंदोबस्त तैनात करण्यात आला असल्याचेही प्रांताधिकारी गुरव यांनी सांगितले.

□ नगरपालिकेच्या उपबंधाऱ्यातून  चंद्रभागा नदीत पाणी

माघी यात्रेकरिता आलेल्या भाविकांना चंद्रभागा स्नान करता यावे, म्हणून नगरपालिकेच्या उपबंधाऱ्यातून  पाणी सोडण्यात आले आहे. याकरिता बंधारा अर्धा मीटर उघडण्यात आला आहे. चंद्रभागेमध्ये भाविकांची स्नानाची सोय होणार असून, भाविकांनी कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाने दिलेल्या सूचनांचे पालन करावे असे, आवाहन मुख्याधिकारी अरविंद माळी यांनी केले आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #MaghiWari #Disaster #Management #Established #FivePlaces #Water #Released #Lunar #Region, #माघीवारी #पाचठिकाणी #आपत्ती #व्यवस्थापन #कक्ष #स्थापना #नगरपालिका #उपबंधारा #चंद्रभागा #पाणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article माजी आमदार आडम मास्तरांसह शेकडो कार्यकर्त्यांना घेतले ताब्यात
Next Article मोहोळ परिसरात विष प्राशन केल्याने दोघांचा मृत्यू, पंढरपुरातील अपघातात एक ठार

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?