छत्रपती संभाजीनगर, १ सप्टेंबर. मराठा आरक्षणाच्या मागणीसाठी मुंबई येथे मनोज जरांगे यांनी उपोषण सुरू केले आहे त्याला पाठिंबा देण्यासाठी सिल्लोड तालुक्यातील मराठा बांधव मुंबई येथे गेले आहेत.
सिल्लोड तालुक्यातील पळशी, वढोद, चाथा, पालोद या गावांमधून आझाद मैदान मुंबईत गेलेल्या मराठा बांधवांसाठी अन्नधान्य पाठवण्यात आले. तिनही गावातून दोन टेम्पो भरून पापडी, ब्लॅंकेट, पाण्याचे बिसलरी, बिस्किट व इतर साहित्य भरून मुंबई येथे पाठवण्यात आले आहे.