Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: Congress solapur गटनेत्याला खूष केले, निष्ठावंताला डावलले; चेतन नरोटे यांनी प्रभाग रचनेमध्ये केली फोडाफोडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsराजकारणसोलापूर

Congress solapur गटनेत्याला खूष केले, निष्ठावंताला डावलले; चेतन नरोटे यांनी प्रभाग रचनेमध्ये केली फोडाफोडी

Surajya Digital
Last updated: 2022/05/23 at 1:28 PM
Surajya Digital
Share
5 Min Read
SHARE

 

Contents
स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…□ १२ आणि २१ मध्ये फटका बसणार ?□ चेतन नरोटे यांनी प्रभाग रचनेमध्ये फोडाफोडी केली : करगुळे

सोलापूर : महापालिकेची अंतिम प्रभाग रचना नुकतीच जाहीर झाली. यामध्ये काही प्रभागात बदल झाले. ही प्रभागरचना राष्ट्रवादीने केल्याचा आरोप होत असताना आमदार प्रणिती शिंदे यांनीही शेवटच्या टप्प्यात यामध्ये लक्ष घातल्याची चर्चा पालिकेत आहे. मात्र लक्ष घालताना गटनेत्याला खुश करण्यासाठी आमदार प्रणिती शिंदे यांनी निष्ठांवत कार्यकर्त्याबरोबरच  मोची समाजाचे नाराजी ओढवून घेतल्याची चर्चा होताना दिसत आहे. Pleasing the group leader, discouraging the loyalists; Chetan Narote was involved in the formation of wards in Solapur Municipal Corporation

राज्यात महा विकास आघाडीची सत्ता आल्यानंतर राष्ट्रवादीने सोलापुरातील मोठ्या नेत्यांना पक्षात घेत महापालिकेवर आपले लक्ष केंद्रित केले. महापालिका ताब्यात घेण्यासाठी राष्ट्रवादीने आपल्या सोयीनुसार प्रभाग रचना केल्याचा आरोप होत आहे. राष्ट्रवादी महाआघाडीत असताना प्रभाग रचना करताना आपल्याला विश्वासात घेतले नाही, याची तक्रार काँग्रेस नेते पूर्वीपासूनच करत होते.

फेब्रुवारीमध्ये प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर ते स्पष्ट झाले. ही प्रभाग रचना जाहीर झाल्यानंतर प्रामुख्याने काँग्रेसचे गटनेते चेतन नरोटे यांना थोडा अवघड प्रभाग आल्याचे दिसून आले. त्यावेळी प्रभाग १२ मध्ये एससी आरक्षण पडणार हे जवळपास निश्चित होते.

एससी आरक्षण जर पुरुष पडले आणि दोन महिला आरक्षण निघाले तर चेतन नरोटे यांना दुसरा मतदार संघ शोधावा लागणार होता. त्यामुळे चेतन नरोटे अस्वस्थ होते, ही तक्रार त्यांनी आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे अनेकदा केली होती. नरोटे यांनी प्रभाग क्रमांक 12 मधील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर हरकत यावेळी घेतली होती.

दरम्यान, प्रणिती शिंदे यांचे निष्ठांवत कार्यकर्ते, माजी युवक अध्यक्ष अंबदास करगुळे यांनी कोनापुरे चाळ संपूर्ण प्रभाग क्रमांक १२ मध्ये घेण्यासाठी हरकत घेतली होती. मात्र चेतन नरोटे अंतिम प्रभाग रचनेवेळी आमदार प्रणिती शिंदे यांना संदर्भात लक्ष घालायला लावले. १० वकील नेमले आणि १२ मधील अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी करून साडेतीन हजारांवर आणली.

यामुळे मात्र आ. प्रणिती शिंदे यांनी गटनेत्याला खुष करण्यासाठी आपल्या निष्ठावंत कार्यकर्त्याला डावलल्याची चर्चा आता महापालिका वर्तुळात सुरू झाली आहे. यामुळे काही मोची समाजही नाराज झाला आहे. ज्या करगुळे यांनी ताईंना मंत्रिपद मिळावे म्हणून मल्लिकार्जुन खर्गेचा पुतळा जाळला, पक्षासाठी ३५ – ४० गुन्हे अंगावर घेतले, स्थायी समिती सभापती निवडीवेळी गैरहजेरी दाखवली त्यांच्यावरच अन्याय कसा केला, असा प्रश्न काँग्रेस कार्यकर्त्यांना पडला आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

□ १२ आणि २१ मध्ये फटका बसणार ?

प्रभाग १२ मध्ये पूर्वीच्या प्रभाग रचनेनुसार एससी आरक्षण पडणे जवळपास निश्चित होते. मात्र चेतन नरोटे यांनी दाखल केलेल्या तक्रारीची दखल घेत आ. प्रणिती शिंदे यांनी प्रभाग १२ मध्ये मोठा फेरबदल केल्याची चर्चा आहे. त्यामुळे प्रभाग १२ मधील एससी आरक्षण निघून प्रभाग २१ मध्ये गेले. त्यामुळे मोची समाज नाराज झाल्याचे बोलले जात आहे. प्रभाग २१ मध्ये मोठ्या प्रमाणात मोदी परिसर जोडला आहे. त्या परिसरात थोड्याफार प्रमाणात भाजपचेही वर्चस्व आहे. त्यामुळे १२ आणि २१ दोन्ही ठिकाणी काँग्रेसला फटका बसण्याची चिन्हे आहेत.

 

□ चेतन नरोटे यांनी प्रभाग रचनेमध्ये फोडाफोडी केली : करगुळे

महापालिकेच्या अंतिम प्रभाग रचनेमध्ये काँग्रेसचे माजी गटनेते चेतन नरोटे यांनी हस्तक्षेप करत फोडाफोडी केली. अनुसूचित जातीच्या एका जागेवर अन्याय केला, असा आरोप करत माजी युवक अध्यक्ष अंबादास करगुळे यांनी आपली खंत व्यक्त केली आहे. याबाबत आपण प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांच्यासह माजी मंत्री सुशीलकुमार शिंदे आणि आमदार प्रणिती शिंदे यांच्याकडे तक्रार करणार असल्याची माहिती त्यांनी काही दिवसापूर्वी घेतलेल्या पत्रकार परिषदेत दिली.

प्रारूप प्रभाग रचना झाल्यानंतर कोनापुरे चाळीचे दोन भाग करण्यात आले होते. ती चाळ संपूर्ण प्रभाग क्रमांक १२ मध्ये घेण्यासाठी करगुळे यांनी हरकत घेतली. दरम्यान माजी गटनेते चेतन नरोटे यांनीसुद्धा प्रभाग क्रमांक १२ मधील अनुसूचित जातीच्या लोकसंख्येवर हरकत यावेळी घेतली होती. दरम्यान आता अंतिम प्रभाग रचना झाल्यानंतर १२ मधील अनुसूचित जातीची लोकसंख्या कमी करून साडेतीन हजारांवर आणण्यात आली.

त्यामुळे प्रभाग क्रमांक १२ मध्ये अनुसूचित जातीचे आरक्षण कमी झाले. ज्या भागामध्ये आम्ही मागील पाच वर्षात अनेक विकास कामे केली तो भाग जाणीवपूर्वक कट करण्यात आला आहे आणि याला संपूर्ण कारणीभूत हे चेतन नरोटे असल्याचा आरोप अंबादास करगुळे यांनी केला होता.

 

You Might Also Like

सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या

भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी

सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग

पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव

सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट

TAGGED: #Pleasing #groupleader #discouraging #loyalists #ChetanNarote #involved #formation #wards #Solapur #Municipal #Corporation, #सोलापूर #गटनेता #खूष #निष्ठावंत #डावलले #चेतननरोटे #प्रभागरचना #फोडाफोडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article Uhani water उजनीसाठी पुणे, नगरच्याही जमिनी बाधित; उजनीचे पाणी पळवणारच
Next Article died of heatstroke महाराष्ट्रात 11 दिवसांत उष्माघाताने 6 जणांचा मृत्यू

Latest News

सांबा सेक्टरमध्ये 7 घुसखोरांना कंठस्नान
देश - विदेश May 9, 2025
संघाकडून भारतीय सैन्याचे अभिनंदन
Top News May 9, 2025
सोलापूरच्या तरुणाची गोव्यात आत्महत्या
सोलापूर May 9, 2025
भारत-पाकिस्तान तणावादरम्यान स्वतंत्र बलुचिस्तानची मागणी
सोलापूर May 9, 2025
सोलापूरात पाणीपातळी २० टक्क्यांवर गेल्याने घटला कॅनॉलचा विसर्ग
सोलापूर May 9, 2025
crime
पंढरपुरात पोलिसांच्या सतर्कतेमुळे उधळला खुनाचा डाव
सोलापूर May 9, 2025
पंजाबमध्ये सर्व शैक्षणिक संस्था बंद, परीक्षा रद्द
देश - विदेश May 9, 2025
सोलापूर तापमानाचा पारा घटला; आठवड्यात ८ अंशांनी घट
सोलापूर May 9, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?