Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: करमाळयाचे माजी आमदार जयवंत जगताप शिवसेनेत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

करमाळयाचे माजी आमदार जयवंत जगताप शिवसेनेत

admin
Last updated: 2025/06/11 at 4:09 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 11 जून, (हिं.स.)। करमाळा तालुक्याचे माजी आमदार जयवंत जगताप यांनी राजकीय धक्कातंत्र वापरत मुंबई येथील “मुक्तागिरी “निवासस्थानी उप मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेत प्रवेश केला . यावेळी सांगोल्याचे माजी आमदार शहाजी (बापू) पाटील , शिवसेना वैद्यकीय कक्षाचे कक्ष प्रमुख आणि श्री. शिंदे यांचे विश्वासू सहकारी मंगेश चिवटे, शिवसेनेचे करमाळा – माढा विभागाचे जिल्हाप्रमुख महेश चिवटे ,सांगलीचे विठ्ठल पाटील ,सिंदखेडराजा जि.बुलढाण्याचे माजी आमदार डॉ. शशिकांत खेडकर यांची प्रमुख उपस्थिती होती . माजी आमदार जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे सोलापूर जिल्ह्याच्या राजकारणात एकच खळबळ उडाली आहे .

जयवंत जगताप दोन वेळा करमाळ्याचे आमदार होते . 1990 साली अपक्ष तर 2004 साली शिवसेनेच्या धनुष्यबाण चिन्हा वरती आमदार झाले होते . 2019 साली विधान सभेला संजय (मामा) शिंदे यांना विजयी करण्यात व 2024 साली नारायण (आबा) पाटील यांना विजयी करण्यात जयवंत जगताप यांचा सिंहाचा वाटा आहे.माजी आमदार जगताप यांचे वडील स्वातंत्र्यसैनिक देशभक्त स्व. नामदेवराव जगताप चार वेळा व चूलते स्व.अण्णासाहेब जगताप एक वेळेस आमदार होते .जगताप यांच्या शिवसेना प्रवेशामुळे आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीत शिवसेनेला फार मोठा लाभ होणार आहे. लवकरच करमाळा येथे उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवसेनेचा भव्य मेळावा होणार असल्याचे समजते.

एकनाथ शिंदे विकासाचा दृष्टिकोन असलेले नेतृत्व असून त्यांच्याच नेतृत्वाखाली धनुष्यबाण चिंन्हावर करमाळा नगरपालिकेवर, पंचायत समितीवर आणि येणाऱ्या सर्व स्थानिक स्वराज संस्थाच्या निवडणुकीत भगवा फडकविणार असल्याचा निर्धार माजी आमदार जयवंत जगताप यांनी व्यक्त केला.

You Might Also Like

भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत

विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील

वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात

संत ज्ञानेश्वर आणि तुकाराम महाराजांच्या पालख्या पुण्यातून मार्गस्थ

एकनाथ शिंदे यांनी साधला स्थानिक काश्मीरी नागरिकांशी संवाद

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंतप्रधान मोदींची भेट घेण्यापूर्वी मंत्र्यांना आरटी-पीसीआर टेस्ट अनिवार्य
Next Article पश्चिम रेल्वेवर तांत्रिक बिघाड; चाकरमान्यांचे हाल

Latest News

इस्रायल- इराण युद्धाचा परिणाम भारताच्या एलपीजी गॅसवर होणार
देश - विदेश June 23, 2025
सीरियाच्या दमास्कस चर्चमध्ये बॉम्बस्फोटात २२ जणांचा मृत्यू
देश - विदेश June 23, 2025
इराणवरील हल्ल्यावरून रशिया, चीनची अमेरिकेवर टिका
देश - विदेश June 23, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड लीड्स कसोटी रंगतदार अवस्थेत
महाराष्ट्र June 23, 2025
सासवड पालिकेतर्फे पालखीचे जोरदार स्वागत
Top News June 23, 2025
विद्यार्थिनींकडून कोणतेही शुल्क घेऊ नका – चंद्रकांत पाटील
महाराष्ट्र June 22, 2025
सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले
सोलापूर June 22, 2025
वारकऱ्यांच्या सुरक्षेसाठी उजनी धरणातून पाणी सोडण्यास सुरुवात
महाराष्ट्र June 22, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?