छत्रपती संभाजीनगर, 9 सप्टेंबर : कैलास पाटील माजी आमदार, गंगापूर-रत्नपूर विधानसभा मतदारसंघ यांनी संत एकनाथ रंगमंदिर, छत्रपती संभाजीनगर येथे शिवसेना मुख्य नेते व महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री.श्री. एकनाथराव शिंदे यांच्या हस्ते तसेच छत्रपती संभाजीनगर जिल्ह्याचे पालकमंत्री श्री. संजय शिरसाट यांच्या प्रमुख उपस्थितीत असंख्य कार्यकर्त्यांसह शिवसेना पक्षात जाहीर प्रवेश केला.
कैलास पाटील यांना सन 1986 साली शिवसेना पक्षाकडून गंगापूर तालुका प्रमुख म्हणून नेमणूक मिळाली आणि 1989 मध्ये शिवसेनेच्या पाठबळावर गंगापूर विधानसभा मतदारसंघातून आमदार म्हणून निवडून आले. त्यानंतर काही काळ काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये राजकीय प्रवास केला.
शिवसैनिक म्हणून लढलेले ते कठीण दिवस आजही मनात ताजे आहेत. उपमुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या कार्यशैलीने, जनसामान्यांप्रती असलेल्या बांधिलकीने व शिवसेनेच्या विचारधारेवरील त्यांचा निष्ठावान विश्वास पाहून पुन्हा माझ्या मातृसंस्थेत, माझ्या पक्षात परत आलो आहे.
उपमुख्यमंत्री श्री. एकनाथरावजी शिंदे यांच्या नेतृत्वाखाली मराठा आरक्षणासाठी सुरू असलेले आंदोलन यशस्वीपणे हाती घेण्यात आले आणि सरकारकडून मराठा आरक्षणाचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला. हा निर्णय मराठा समाजाच्या भविष्यासाठी अत्यंत मोलाचा आहे. अशा जनतेच्या प्रश्नांवर ठामपणे उभे राहणारे नेतृत्व पाहून मी पुन्हा माझ्या मातृसंस्थेत, माझ्या पक्षात परत आलो आहे.असे ते म्हणाले माझ्या उर्वरित राजकीय आयुष्याचे प्रत्येक क्षण शिवसेना पक्ष आणि जनतेच्या सेवेसाठी समर्पित करणार आहे. शिवसेनेच्या बळावर पुन्हा एकदा गंगापूर आणि छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील जनतेची सेवा करण्याचा निश्चय करतो. असे ते म्हणाले.