Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे निधन

admin
Last updated: 2025/06/24 at 3:30 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 24 जून (हिं.स.) : भारताचे माजी फिरकीपटू दिलीप दोशी यांचे सोमवारी रात्री लंडन येथे निधन झाले. मृत्यूसमयी ते 77 वर्षांचे होते. उत्कृष्ट फिरकी गोलंदाज आणि यशस्वी हिंदी क्रिकेट समालोचक म्हणून ते लोकप्रिय होते.

डावखुरे फिरकी गोलंदाज दोशी यांचे निधन हृदयविकारामुळे झाले. ईएसपीएनक्रिकइन्फोच्या मते, दोशी गेल्या अनेक वर्षांपासून लंडनमध्येच राहत होते. त्यांच्या पश्चात पत्नी कालिंदी, मुलगा नयन आणि मुलगी विशाखा असा परिवार आहे. त्यांचा मुलगा नयन इंग्लंडच्या कौंटी क्रिकेटमध्ये सरे आणि महाराष्ट्राच्या सौराष्ट्र संघाकडून खेळला आहे.प्रथम श्रेणी क्रिकेटमध्ये 898 बळी घेणाऱ्या दिलीप दोशी यांनी 238 प्रथम श्रेणी सामन्यांमध्ये 43 वेळा 5 बळी घेतले. एका सामन्यात 6 वेळा 10 बळी घेण्याचा विक्रम केला होता. भारतासाठी खेळण्याव्यतिरिक्त, दोशी यांनी देशांतर्गत क्रिकेटमध्येही आपले कौशल्य दाखवले. त्यांनी सौराष्ट्र आणि बंगाल संघाकडूनही क्रिकेट खेळले. याशिवाय, परदेशी कौंटी क्रिकेटमध्ये दोशी यांनी वॉर्विकशायर आणि नॉटिंगहॅमशायरसाठी प्रथम श्रेणी क्रिकेट खेळले होते. अलीकडेच बीसीसीआयने एका समारंभात दोशी यांचा सन्मानही केला होता. या महिन्याच्या सुरुवातीला लॉर्ड्स क्रिकेट मैदानावर झालेल्या वर्ल्ड टेस्ट चॅम्पियनशिपच्या अंतिम सामन्यातही ते उपस्थित होते. दोशी यांनी वयाच्या 32 व्या वर्षी क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या दिलीप दोशी यांची आंतरराष्ट्रीय कारकीर्द फार मोठी नव्हती. त्यांनी 1980 च्या दशकात आंतरराष्ट्रीय क्रिकेटला अलविदा म्हटले. दोशी यांनी आपल्या ‘स्पिन पंच’ या आत्मचरित्रात आपल्या क्रिकेट कारकिर्दीबद्दल सविस्तर लिहिले आहे.

दोशी यांच्या निधनावर भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (बीसीसीआय) दोशी यांच्या फोटोसह सोशल मिडीयात त्यांच्या निधनाची बातमी शेअर करत श्रद्धांजली अर्पण केली आहे. यासोबतच सौराष्ट्र क्रिकेट असोसिएशनने देखील दोशी यांच्या निधनावर शोक व्यक्त केलाय. तसेच फिरकीपटू अनिल कुंबळे आणि मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकरने देखील ट्विटरवर (एक्स) संदेश जारी करत दोशी यांच्या कारकिर्दीचे स्मरण करत श्रद्धांजली दिली आहे.

You Might Also Like

शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण

महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल

पुणे-सिंगापूर विमानसेवा १५ जुलैपर्यंत बंद

पुणे रेल्वे स्टेशनला थोरल्या बाजीराव पेशव्यांचं नाव द्या – खासदार मेधा कुलकर्णीं

लंडनहून मुंबईला येणाऱ्या एअर इंडियाच्या विमानात ५ प्रवासी आणि २ क्रू मेंबर्सची प्रकृती बिघडली

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article त्रिभाषा सूत्रावर सर्व संबंधितांशी बोलूनच अंतिम निर्णय – मुख्यमंत्री
Next Article मुंबई मराठी पत्रकार संघाचे प्रतिष्ठेचे पुरस्कार प्रदान

Latest News

इस्रायलने शस्त्रसंधीचे उल्लंघन केल्याने ट्रम्प प्रचंड नाराज
देश - विदेश June 24, 2025
शिवभोजन थाळीचे सहा महिन्यांपासून अनुदान थकले; केंद्र चालविणे झाले कठीण
महाराष्ट्र June 24, 2025
फडणवीसांच्या मतदारसंघात 8 टक्के मतदार वाढले- राहुल गांधी
राजकारण June 24, 2025
महाराष्ट्र विधिमंडळाचा इतिहास प्रेरणादायी – राज्यपाल
महाराष्ट्र June 24, 2025
नीरज चोप्रा ऑस्ट्रावा गोल्डन स्पाइक स्पर्धेत विजयासाठी प्रमुख दावेदार
देश - विदेश June 24, 2025
दाक्षिणात्य अभिनेता श्रीकांतला अंमली पदार्थ प्रकरणी अटक
देश - विदेश June 24, 2025
भारतीयांचे रक्त सांडणाऱ्यांना माफ केले जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 24, 2025
crime
सोलापूर : देखरेख करणाऱ्यानेच परस्पर विकले फ्लॅट; महिलेची ४७ लाखांची फसवणूक
सोलापूर June 24, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?