Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील दोन अपघातात चारजण ठार, पहाट ठरली काळरात्र
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापुरातील दोन अपघातात चारजण ठार, पहाट ठरली काळरात्र

Surajya Digital
Last updated: 2021/12/19 at 10:50 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : आज सोलापुरात पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे येथे आणि सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी अशा अपघाताच्या दोन दुर्दैवी घटना घडल्या यात चारजण ठार तर दोनजण जखमी झाले आहेत. हे दोन्ही अपघात पहाटे झाले आहेत. ही पहाट त्यांच्यासाठी काळरात्रच ठरली.

ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीला कारने मागून धडक दिल्याने झालेल्या अपघातात दोनजण ठार तर चारजण जखमी झाले. हा अपघात पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे (ता.पंढरपूर) येथील श्री विठ्ठल सहकारी साखर कारखान्याजवळ आज रविवारी पहाटे साडेपाच वाजण्याच्या सुमारास झाला.

दुसऱ्या अपघातात रस्त्याच्या कडेला थांबलेल्या मालट्रकला भरधाव जाणाऱ्या कारने मागून धडक देऊन झालेल्या अपघातात दोन जणांचा मृत्यू झाला, तर अन्य दोघे जखमी झाले. हा अपघात सोलापूर-पुणे राष्ट्रीय महामार्गावरील वडाचीवाडी शिवारातील एका हॉटेल समोर आज पहाटे साडेसहा वाजता झाला.
गुरसाळेजवळील अपघातातील  मयत आणि जखमी हे नाशिक जिल्ह्यातील निफाड आणि सिन्नर येथील आहेत.

या अघातातील फिर्यादी किशोर संपत लोखंडे (वय २७, रा. चादोरी, ता. निफाड, जि. नाशिक) हे त्यांची पत्नी रेश्‍मा लोखंडे, मामा त्रिंबक मारुती आव्हाड, वेदांत मारुती आव्हाड, सुरज भीमराव ठोंबरे (रा. वडजेरीगाव, ता. सिन्नर) यांच्यासह एमएच ४६/डब्ल्यू ८९०३  या क्रमांकाच्या ओमनी गाडीतून देवदर्शनासाठी पंढरपूरकडे येत होते. पंढरपूर-टेंभुर्णी रस्त्यावर गुरसाळे गावाच्या हद्दीत त्यांची गाडी आली असताना पुढे रिफ्लेक्‍टर नसलेला ट्रॅक्‍टर ट्रॉलीसह ऊस घेऊन निघाला होता.

ओमनीचा चालक सौरभ प्रभाकर घोडके (रा. वडजेरीगाव, ता. सिन्नर) यास रिफ्लेक्‍टर नसलेली ट्रॉली न दिसल्याने भरधाव वेगात ओमनी गाडी ट्रॅक्‍टरच्या ट्रॉलीला मागून धडकून अपघात झाला. अपघातात ओमनी कारमधील संजीवनी मारुती आव्हाड (वय ३५, रा. निफाड), सूरज भीमराव ठोंबरे (वय २१) या दोघांचा मृत्यू झाला. गाडीतील किशोर संपत लोखंडे, रेश्‍मा लोखंडे, त्रिंबक मारुती आव्हाड, वेदांत मारुती आव्हाड यांना पंढरपूर येथील खासगी रुग्णालयात उपचारासाठी दाखल करण्यात आले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या अपघातप्रकरणी किशोर लोखंडे यांनी दिलेल्या फिर्यादीवरून ओमनीचा चालक सौरभ घोडके याच्याविरुद्ध पंढरपूर तालुका पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

वडाचीवाडी अपघाताबाबत मोहोळ पोलिसांनी दिलेल्या अधिक माहितीनुसार, इको कार (क्र. एमएच ०४ डीके १११३) मधून देवदर्शनासाठी मुंबई येथून तुळजापूरकडे दिपक दगडू उबाळे, यासह यांचा मुलगा राहुल दिपक उबाळे (दोघेही रा. चेंबूर, मुंबई), अमोल दिपक पवार (रा. मरळ, मुंबई) व सुखदेव गजानन शिंदे (रा. आंबेवाडी ठाणे) असे चार जण निघाले होते.

दरम्यान, त्यांची इको कार मोहोळ तालुक्यातील वडाचीवाडी हद्दीत आली असता निलकमल हॉटेल समोर रस्त्यावर उभ्या असलेल्या मालट्रक (एमएच ११ एएल ७१४९) ला पाठीमागून जाऊन जोरात धडकली. यामध्ये दीपक दगडू उबाळे (वय ५०) यांचा जागीच मृत्यू झाला. तर त्यांचा मुलगा राहुल दीपक उबाळे (वय २६) यांचा उपचारादरम्यान सोलापूर येथील शासकीय रुग्णालयात मृत्यू झाला. त्यांच्यासोबत असलेल्या अमोल दिपक पवार (वय २६) यांची प्रकृती चिंताजनक असून, चालक शिंदे हेही जखमी आहेत.

अपघाताची माहिती मिळताच सावळेश्वर टोल नाक्याच्या पेट्रोलिंग पथकाने जखमींना तात्काळ उपचारासाठी रुग्णवाहिकेतून सोलापूर येथे पाठवले. देवदर्शनासाठी निघालेल्या उबाळे पिता-पुत्रांच्या या अपघातामध्ये दुर्दैवी मृत्यू झालेल्या या अपघाताची खबर सावळेश्वर टोल नाक्याच्या पथकाचे अमर डोंबे यांनी मोहोळ पोलिसात दिली असून, अधिक तपास सहाय्यक पोलीस फौजदार अविनाश शिंदे करीत आहेत.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #Four #killed #two #accidents #Solapur #blacknight, #सोलापूर #दोन #अपघातात #चारजण #ठार #पहाट #काळरात्र
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ठाकरे सरकारने पेट्रोल-डिझेल स्वस्त करण्याऐवजी दारू स्वस्त केली – अमित शाह
Next Article कम्युनिस्टांचं झुंजार नेतृत्व हरपलं, कॉ. रतन बुधर यांचे निधन

Latest News

पालखी सोहळ्यासाठी ३५०० पोलिसांचा बंदोबस्त, साध्या आणि वारकऱ्यांच्या वेशातही पोलीस
महाराष्ट्र June 18, 2025
काश्मीर मुद्द्यावर कोणाचीही मध्यस्थी स्वीकारली जाणार नाही – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
वारकरी भक्तीयोग’कार्यक्रम यशस्वी करण्याकरीता सर्वांनी पुढाकार घ्यावा – चंद्रकांतदादा पाटील
Top News June 18, 2025
अमेरिकेने पाठवली ३० लढाऊ विमाने, इराणकडून इस्राइल विरोधात युद्धाची घोषणा
देश - विदेश June 18, 2025
‘जारण’ ने १२ दिवसांत कमावले ३.५ कोटी
महाराष्ट्र June 18, 2025
कोणताही देश दहशतवादाला पाठिंबा देत असेल तर त्याला त्याची किंमत मोजावी लागेल – पंतप्रधान मोदी
देश - विदेश June 18, 2025
भारत-कॅनडा करणार उच्चायुक्तांची पुनर्स्थापना
देश - विदेश June 18, 2025
ट्रम्प यांच्या पोस्टमुळे तेहरानमध्ये भीतीचं वातावरण, लोकांनी सोडले शहर
देश - विदेश June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?