सोलापूर (प्रतिनिधी ) सीना नदीतून अवैधपणे
वाळूची चोरी करून वाहनात भरताना चौघे आढळून आले. या घटनेची नोंद सोलापूर तालुका पोलिस ठाण्यात १७ मार्च २०२५ रोजी रात्री साडेआठ वाजता झाली आहे. या कारवाईत पोलिसांनी १० लाख १३ हजाराचा मुद्देमाल जप्त केला आहे. पोलिस कॉन्स्टेबल सदाशिव
दामोदर केंद्रे (वय ३५) यांनी दिलेल्या फिर्यादीवरून करण बिरू गायकवाड (वय २५, रा. डोणगाव), दत्तात्रय बाबूराव भारती (वय ३२), निखिल बालाजी चव्हाण (वय २४) या तिघांविरोधात भारतीय न्याय संहिता बीएनएस ३ (५), ३०३ (२) नुसार गुन्हा दाखल करण्यात आला आहे. याबाबत पोलिसांनी सांगितले की, तेलगाव सिना (ता.उ.सोलापूर) शिवारात तेलगाव सिना -अकोले मंद्रुप बंधाऱ्याच्याजवळ सिना नदीच्या पात्रातून वाळू चोरी करताना चौघांवर कारवाई करण्यात आली. या घटनेत पोलिसांनी ८ लाख १२ हजाराचा ट्रॉलीसह ट्रॅक्टर दोन व वाळू, २ लाखाचा सहा चाकी टेम्पो, १ हजाराचे प्लास्टिकचे टोपले, दोन लोखंडी खोऱ्या असा एक
१० लाख १३ हजाराचा मुद्देमाल पोलिसांनी जप्त केला. या घटनेत अद्याप कोणालाही अटक करण्यात आली नाही. या घटनेचा अधिक तपास हेड कॉन्स्टेबल कोणदे हे करीत आहेत. तेलगाव सीना (तालुका उत्तर सोलापूर) शिवारात तेलगाव सिना-अकोले मंद्रूप बंधारा जवळील वाळू उपसा होत असल्याची माहिती मंडळ अधिकारी तलाठी यांना नसेल का? असा प्रश्न निर्माण झाला असून सिना नदीच्या पात्रातून अवैध होणाऱ्या वाळू उपसा ला नेमका कोणाचा आशीर्वाद? असाही प्रश्न निर्माण होत असून राज्य सरकार च्या स्वस्तात वाळू उपलब्ध करून देण्याच्या धोरणाला हरताळ फासला जातोय एकंदरीत महसूल प्रशासना च्या कार्यपद्धतीवर आता प्रश्न चिन्ह निर्माण होऊ लागले आहेत.
वाळू चोरी प्रकरणातील कारवाया वाढल्या
मागील काही दिवसापासून मंद्रूप वळसंग सोलापूर तालुका पोलीस ठाण्याचे हद्दीत पोलिसांनी थेट धाड टाकून कारवाई केली आहे अवैध वाळू चोरीला पोलिसांनी लगाम लावला असून अनेकांवर गुन्हे दाखल करून मुद्दे माल जप्त केल्याचे पोलीस निरीक्षक राहुल देशपांडे यांनी सांगितले.