Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : जागेचे आमिष दाखवून 37 लाखाची फसवणूक, कंबर तलावात कारागीराची आत्महत्या
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर : जागेचे आमिष दाखवून 37 लाखाची फसवणूक, कंबर तलावात कारागीराची आत्महत्या

Surajya Digital
Last updated: 2021/07/23 at 10:17 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर  :  जागा खरेदी देऊन त्यावर बांधकाम करून देण्याचे आमिष दाखवून 37 लाखांची फसवणूक करण्यात आलीय.  ही घटना 2014  सालापासून ते आजपर्यंतच्या काळात घडली. यात पोलिसात गुन्हा दाखल झाला आहे. तर आणखी एक घटना दुर्दैवी घडलीय. कंबर तलावात एका तरुणाने आत्महत्या केलीय.

37 लाखांच्याषफसवणुकीबाबत संजय कुमार बाबुराव कांबळे  (वय 54 रा. रेल्वे बिल्डींग सोलापूर) यांनी फिर्याद दिली त्यावरून स्वप्निल मोहन घोरपडे ( रा. अमरोलीवाला अपार्टमेंट, लष्कर, सोलापूर) व सुहास गुरप्पा हुंबरवाडी, (बेळगाव) विरुद्ध विजापूर नाका पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीने संगणमत करून फिर्यादीला जागा तसेच त्यावर बांधकाम करून देण्याचे आमिष दाखविले. त्याच बरोबर दुसरी जागा ही खरेदी देण्याचे मान्य केले. सन 2014  मध्ये संशयित आरोपींनी जागा तसेच बांधकामाकरिता फिर्यादीकडून पैसे घेतले त्यानंतर वेळोवेळी फिर्यादीकडून पैसे घेतले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हद्दवाढ भागातील सर्वे नंबर 130 पैकी 90 हजार चौ.मी.जागेतील दोन हजार चौ.फूट जागा, तसेच त्यावर बांधकाम करण्याचे कबूल केले होते तसेच प्लॉट नंबर 18 खरेदी देण्याचेही मान्य केले होते. परंतु 37 लाख रुपये संशयित आरोपींनी घेतले. मात्र, ठरल्याप्रमाणे जागा खरेदी न देता तसेच बांधकाम करून देण्याचे टाळून फसवणूक केली. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बनकर करीत आहेत.

* कंबर तलावात तरुणाची  आत्महत्या

–  कंबर तलावातील पाण्यात आज शुक्रवारी दुपारी तरुणाचा मृतदेह आढळून आला. त्या तरुणाची ओळख पटली असून तीन दिवसांपासून तो घरातून निघून गेला होता, अशी माहिती पोलिसांनी दिली.

मुकेश कारासिंग सतारवाले ( वय 35, रा. बापूजी नगर, सोलापूर) असे त्या तरुणाचे नाव आहे. मुकेश फरशी बसविण्याचे काम करीत होता.  तो एक उत्तम कारागीर बुधवार सकाळीच तो घरातून निघून गेला होता. त्यानंतर तो घरी परतला नसल्याने नातेवाईकांनी पोलिसात नोंद केली होती.

दरम्यान आज शुक्रवारी दुपारी कंबर तलावातील पाण्यात त्याचा मृतदेह आढळून आला. सदर बाजार पोलिसांनी त्याच्या नातेवाईकांना मृतदेह दाखविला. नातेवाईकांनी तो बेपत्ता मुकेशचा मृतदेह असल्याची खात्री दिली. त्याच्या हातावर गोंदलेले मुकेश हे नाव त्याच्या ओळखीसाठी उपयोगी पडले असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #37लाख #फसवणूक #सोलापूर #कारागीर #आत्महत्या, #Fraud #37Lakh #sucide #property #
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article केंद्रीय मंत्र्यांचे विधान, ‘हे शेतकरी नाहीत तर मवाली आहेत’, आंदोलकांनीही दिले उत्तर
Next Article कोल्हापूर – सांगलीत परिस्थिती गंभीर, पुराचा धोका वाढला

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?