Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मनोधैर्य योजनेंतर्गत फसवणूक प्रकरणात वकिलाला सुनावली कोठडी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

मनोधैर्य योजनेंतर्गत फसवणूक प्रकरणात वकिलाला सुनावली कोठडी

Surajya Digital
Last updated: 2021/10/27 at 4:57 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

अक्कलकोट – अट्रासिटी प्रकरणातील पिडीत कुटुंबाला शासकीय मदत मिळवून देण्याची थाप मारून मनोधैर्य योजनेतून मिळालेला मदत निधी धनादेशाद्वारे स्वतःच्या खात्यावर वळवणा-या वकिलाच्या वाढीव पोलीस कोठडी संपल्यानंतर मंगळवारी कोर्टासमोर हजर केले असता, न्यायालयीन कोठडी सुनावली आहे.

दरम्यान या अटकेतील वकिलांनी पोलीसांना तपासकामात अजिबात सहकार्य केले नसल्याने कुठल्याही प्रकारची रक्कम व कागदपत्रे हस्तगत करु शकलो नसल्याचे माहिती वळसंग पोलिस ठाण्याचे सहायक पोलिस निरीक्षक अतुल भोसले यांनी दिली. या प्रकरणातील दुसरा वकिलांचे सोलापूर शहर व इतरत्र ठिकाणी पोलिसांनी शोधाशोध करून देखील अद्यापही पोलिसांच्या हाती लागला नाही.

अॅड. विवेक शाक्य असे न्यायालयीन कोठडी मिळालेल्या वकिलाचे नांव असून यापूर्वी मंजूर झालेल्या दोन टप्प्यातील पोलीस कोठडीची मुदत संपत असल्याने मंगळवारी (ता. २६) त्याला वळसंग पोलिसांनी न्यायालयात हजर केले. याप्रकरणातील दुसरा आरोपी अॅड. तानाजी शिंदे हा अद्यापही फरार असून त्याचा पोलिसांनी सोलापूर शहर व इतरत्र ठिकाणी शोध घेऊन देखील त्याचा ठावठिकाणा लागला नाही.

* बनावट गायछाप तंबाखू तयार करणाऱ्या दोघांना अटक

सोलापूर : बनावट गायछाप तंबाखू तयार करून त्याची विक्री करून कंपनीची फसवणूक केल्याप्रकरणी स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी उत्तर प्रदेश आणि गोंदिया येथील दोघांना अटक करून ३ लाख २५ हजाराचा माल जप्त केला. अटकेतील दोघा आरोपींना मोहोळच्या न्यायालयाने तीन दिवसाची पोलिस कोठडी सुनावली.

हिमांशू गुप्ता (वय २८ रा.आग्रा, उत्तर प्रदेश) आणि रमेश वासुदेव गुप्ता (वय५५ राहणार गड्डा टोळी, गोंदिया) असे अटकेतील आरोपींची नावे आहेत
गेल्या महिन्यात कुरूल (ता.मोहोळ) येथील एका किराणा दुकानात बनावट गायछाप तंबाखूची विक्री केली जात असल्याचे आढळून आले होते. या प्रकरणी मालपाणी ग्रुपचे व्यवस्थापक कैलास सोमानी यांनी कामती पोलिसात फसवणुकीची फिर्याद दाखल केली होती.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे शाखेत कडून करण्यात आला. बनावट तंबाखूची विक्री करणारा हा आग्रा येथे राहत असल्याची माहिती पोलिसांना मिळाली. त्याप्रमाणे पोलिसांनी आग्रा (उत्तर प्रदेश) येथे जाऊन हिमांशू गुप्ता गुप्ता याला ताब्यात घेतले. त्याने बनावट तंबाखू गोंदिया येथील रमेश गुप्ता यांच्याकडून घेत असल्याचे सांगतिले. त्याप्रमाणे पोलीसांनी गोंदिया येथे जाऊन रमेश गुप्ता याला अटक केली. तेव्हा त्याच्या गोदामात बनावट तंबाखू आणि विविध बनावट विडीचे बॉक्स लेबल आणि इतर साहित्य आढळले.

ही कामगिरी पोलीस अधीक्षक तेजस्वी सातपुते, पोलीस निरीक्षक सर्जेराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक निरीक्षक रवींद्र मांजरे, सहाय्यक फौजदार खाजा मुजावर, हवालदार गोलेकर, सलीम बागवान, रवी माने आणि समीर शेख यांनी केली.

* ८० हजाराचे डिझेल चोरले ,झारखंडच्या आरोपीवर गुन्हा

सोलापूर : पापरी (ता.मोहोळ) येथे ८० हजाराचे डिझेल चोरल्याप्रकरणी या  पोकलेनच्या ऑपरेटर विरुद्ध पोलिसांनी गुन्हा दाखल केला. ही घटना रविवारी (ता. २४) रात्रीच्या सुमारास घडली. कवलेश्वर तुलसी रविदास (रा.शहापूर, झारखंड) असे आरोपीचे नाव आहे. तो गणेश पाटील (रा. मंगळवेढा) यांच्या पोकलेन यंत्रावर ऑपरेटर म्हणून काम करीत होता. त्याने रविवारी रात्री दोन बॅरेलमधील मधील ७७६ लिटर डिझेलची चोरी केली, अशी नोंद मोहोळ पोलिसात झाली. हवालदार ढावरे पुढील तपास करीत आहेत.

You Might Also Like

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

मिनिटाला साठ भाविकांना मिळणार विठुरायाचे दर्शन

सोलापूर – उड्डाणपुलांसाठी 821 कोटींची निविदा

TAGGED: #lawyer #remanded #custody #fraud #case #Manodhairya #scheme, #मनोधैर्य #योजनेंतर्गत #फसवणूक #प्रकरणात #वकिल #सुनावली #कोठडी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कॅनडाच्या संरक्षण मंत्रीपदी भारतीय वंशाच्या अनिता आनंद
Next Article मराठा समाजाला न्याय न मिळाल्यास लाँग मार्च काढणार – छत्रपती संभाजीराजे

Latest News

तेलंगणा : भाजप नेते राजा सिंह यांचा राजीनामा
महाराष्ट्र June 30, 2025
राजेश कुमार मीना महाराष्ट्राचे नवे मुख्य सचिव
Top News June 30, 2025
crime
सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल
सोलापूर June 30, 2025
पाण्याचा विसर्ग राहिल्यास वारकऱ्यांना चंद्रभागेच्या वाळवंटात थांबता येणार नाही
देश - विदेश June 30, 2025
crime
सोलापूर : सव्वासात लाखांच्या दुचाकी जप्त
Top News June 30, 2025
ललित मोदींना सर्वोच्च न्यायालयाचा झटका
देश - विदेश June 30, 2025
पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर
सोलापूर June 30, 2025
मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या
सोलापूर June 30, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?