Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापूर : हद्द झाली… डॉक्टरानी ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसतानाही सव्वा लाखाची फसवणूक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोलापूर : हद्द झाली… डॉक्टरानी ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसतानाही सव्वा लाखाची फसवणूक

Surajya Digital
Last updated: 2022/08/02 at 9:42 PM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

Contents
□ विशेष म्हणजे ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसताना फसवणूकस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ तू इथे बस का थांबवली असे म्हणत बसचालकाला मारहाण□ थांबलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने दिली जोरात धडक□ ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दागिन्यांची चोरी

 

□ विशेष म्हणजे ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसताना फसवणूक

सोलापूर : दिवसेंदिवस सोलापूर शहरात अज्ञात व्यक्तीकडून एखाद्या खातेदाराची माहिती घेऊन,त्याची बँक अकाउंट ची माहिती घेत,ओटीपी नंबर विचारात क्षणात त्यांच्या अकाउंट मधून पैसे काढण्याचे प्रकार वाढत आहेत. विशेष म्हणजे आलेल्या कॉल ला प्रतिसाद म्हणून कोणताही ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसताना सुद्धा एका डॉक्टरला लाख रुपयाची फसवणूक झालीय.  Solapur: The limit has been reached… Fraud of half a lakh even when the doctor has not given OTP and confirmation

 

सोलापुरातील प्रख्यात डॉ. सत्यश्याम श्रीराम तोष्णीवाल (रा.रेल्वे लाईन्स) यांना १९ जून रोजी दुपारच्या सुमारास अज्ञात इसमांकडून त्यांच्या मोबाईलवर मेसेज आला. त्यावर त्यांचे आधार कार्ड,मिलिटरी कार्ड व पॅन कार्डचा फोटो पाठवला. ते कार्ड पाहिले असता त्याच्यावर सतीश बलवीर सिंग असे नाव होते. ते कार्ड वरून इसम हा मिलिटरी मध्ये नोकरीस आहे अशी फिर्यादीची खात्री झाली. त्यानंतर मी एक्स सर्विस मॅन बोलत आहे. मला आमच्या पन्नास लोकांच्या हृदयाची तपासणी करावयाची आहे, असे सांगून त्याकरिता किती खर्च येईल असे हिंदी मधून विचारणा केली.

डॉक्टरांनी सर्व माहिती त्यांना सांगत असतानाच त्यांनी आम्हाला तुमच्या खात्यात पैसे जमा करावयाचे आहेत. त्याकरता तुमचा फोन पे नंबर आहे का? असल्यास व्हिडिओ कॉल करण्यास सांगितले. फिर्यादीने कॉल केला तेव्हा फिर्यादीस तो इसम समोर दिसत नव्हता. याबाबत फिर्यादीने विचारणा केल्यास त्यांनी फोन पे अकाउंट ओपन करण्यास सांगितले. त्याप्रमाणे व्हिडिओ कॉल चालू असताना त्याने फिर्यादीस लॉगिन करण्यास सांगितले. लॉगिन केल्यानंतर फिर्यादीस शंभर रुपये ट्रान्सफर करण्यास सांगितले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या आयसीआय बँक खात्यावर दोनशे रुपये जमा झाले असल्याबाबत तपासण्या सांगितले.

फिर्यादीने तपासले असता खात्यावर दोनशे रुपये जमा झाले असे सांगताच फिर्यादीच्या एचडीएफसी बँक खात्यातून १ लाख ३० हजार रुपये अज्ञात व्यक्तीस कोणतीही ओटीपी व कन्फर्मेशन दिलेले नसताना देखील कट झाले. त्यावर फिर्यादीने अनेक वेळा कॉल केला असता,फोन बंद लागत होता. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच. डॉ तोष्णीवाल यांनी सदर बाजार पोलीस ठाण्यात अज्ञात व्यक्तीच्या विरोधात गुन्हा दाखल केला आहे. घटनेचा अधिक तपास पोलीस निरीक्षक पोपट दहातोंडे हे करीत आहेत.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

 

□ तू इथे बस का थांबवली असे म्हणत बसचालकाला मारहाण

सोलापूर : कन्ना चौकातील भू.म.पुल्ली प्रशालेतील मुलींना घेऊन जाताना ‘तू इथे बस का थांबवली, मी कोण आहे, तुम्ही ओळखत नाही का’ असे म्हणून दमदाटी केली. तसेच बसमधून मुलींना घेऊन जाताना दगड मारून जखमी केल्याची फिर्याद बाळू विठोबा भोसले (रा. खडकी, ता.तुळजापूर) यांनी जेलरोड पोलिसांत दिली.

याप्रकरणी अंबादास भगवान शिंदे (रा.भुलाभाई चौकाजवळ,सोलापूर) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे. शासकीय कामात अडथळा करून अंबादास पळून गेल्याचेही फिर्यादीत नमूद आहे. सहाय्यक पोलिस निरीक्षक रमेश चिंताकिंदी तपास करीत आहेत.

 

□ थांबलेल्या ट्रकला मागून येणाऱ्या ट्रकने दिली जोरात धडक

 

सोलापूर : विजयपूर महामार्गावरील ब्रीज उतरून मंगळवेढ्याकडे जाण्यासाठी थांबलेल्या ट्रकला (एमएच ४०, बीएल ९८६६) मागून येणाऱ्या ट्रकने (एमएच १३, सीजे ९०८५) जोरात धडक दिली. चालकाने भरधाव वेगाने व हयगयीने, निष्काळजीपणे ट्रक चालविल्याने हा अपघात झाला. यात तो ट्रकचालक स्वत:च जखमी होण्यास कारणीभूत असल्याची फिर्याद गोरख प्रल्हाद सूर्यवंशी (रा. भांडवली, ता.माण, जि. सातारा) यांनी सलगर वस्ती पोलिसांत दिली. सहाय्यक फौजदार जाधव तपास करीत आहेत.

□ ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात दागिन्यांची चोरी

सोलापूर : ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर मंदिरात श्रावण सोमवार निमित्त दर्शनासाठी गेल्यानंतर दुपारी दीडच्या सुमारास शुभांगी संजय माळगे (रा.बसवेश्वरनगर, मित्रनगर, शेळगी) यांच्या गळ्यातील ३२ हजार रुपयांचे गंठण चोरीला गेले.

तसेच रात्री आठच्या सुमारास त्रिवेणी संजय लोकर्ती यांची पर्स, दागिने व रोकड चोरट्यांनी चोरून नेल्याची फिर्याद शुभांगी माळगे यांनी फौजदार चावडी पोलिसांत दिली. पोलिस नाईक डोके तपास करीत आहेत.

 

 

You Might Also Like

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

पोलिसांनी न्यायालयाला दिला डॉ. वळसंगकरांच्या मोबाईलचा ‘सीडीआर

मध्य रेल्वेच्या आषाढीनिमित्त ८३ विशेष गाड्या

TAGGED: #Solapur #limit #reached #Fraud #halflakh #doctor #OTP #confirmation, #सोलापूर #डॉक्टर #ओटीपी #सव्वा #लाख #फसवणूक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article ‘पहिले लग्न लपवून दुसऱ्या लग्नासाठी शरीरसंबंधाची परवानगी घेणे हा बलात्कार’
Next Article मुलीचे खोटे लग्न लावून लुटणारी टोळी उघडकीस, सोलापुरातील मायलेकीसह पाचजणांवर गुन्हा

Latest News

ठाकरे बंधूंच्या मेळाव्यासाठी मोदी आणि एकनाथ शिंदेंना निमंत्रण
Top News July 1, 2025
उद्धव राज यांचे ५ जुलैच्या मेळाव्यासाठी संयुक्त आवाहन
Top News July 1, 2025
भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर
सोलापूर July 1, 2025
भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत
सोलापूर July 1, 2025
केंद्रीय मंत्रिमंडळाची खेलो भारत नीतीला मंजुरी
Top News July 1, 2025
‘महिंद्रा’च्या ‘स्कॉर्पिओ-एन’मध्ये आता ‘अॅडव्हान्स्ड ड्रायव्हर असिस्टन्स सिस्टीम’ ची सुविधा
Top News July 1, 2025
शेतीमध्ये कमी खर्चात नाविन्यपूर्ण तंत्रज्ञान वापरून शेतकऱ्याचे आयुष्य समृद्ध करणार – कृषीमंत्री
महाराष्ट्र July 1, 2025
भारत विरुद्ध इंग्लंड महिला टी-२० :  भारतीय संघाला सलग दुसरा विजय मिळवण्याची संधी
देश - विदेश July 1, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?