Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: 58 लाखाला लावला चुना, पण कुठे? प्रकरण काय ?
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
सोलापूर

58 लाखाला लावला चुना, पण कुठे? प्रकरण काय ?

admin
Last updated: 2025/03/23 at 10:51 AM
admin
Share
2 Min Read
SHARE

बनावट कागदपत्रे,शॉपॲक्ट लायसन तयार करून ५८ लाखांची फसवणूक

सोलापूर (प्रतिनिधी) काबरा अँड कंपनी या फर्मच्या नावाचे बनावट कागदपत्र शॉप ॲक्ट लायसन तयार करून त्यावर स्वतः मालक असल्याचे दर्शवून ऑफिस मधील शिक्के व लेटर पॅड चा वापर करून ५८ लाख ११ हजार ४२ रुपयांची फसवणूक केल्याची घटना उघडकीस आली आहे.ही घटना १६ जुलै २०२१ रोजी ते दि.४ एप्रिल २०२४ दरम्यान फलटण गल्ली निरगुडे कॉम्प्लेक्स पश्चिम मंगळवार पेठ सोलापूर येथे घडली.याप्रकरणी नंदकिशोर रामनिवासजी काबरा (वय-६२,रा.बुधवार पेठ,श्राविका शाळेजवळ,सोना हिरा चौक) यांनी जोडभावी पेठ पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली आहे.त्यांच्या फिर्यादीवरून लक्ष्मण भीमाशंकर कोनाळे (रा.मल्लिकार्जुन नगर,अक्कलकोट रोड) याच्याविरुद्ध गुन्हा दाखल झाला आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की,फिर्यादी यांच्या वरील फर्मच्या नावाचे बनावट कागदपत्र शॉप ॲक्ट लायसन तयार करून स्वतः मालक असल्याचे दर्शवून व ऑफिस मधील शिक्के व लेटर पॅड चा वापर करत कर्नाटक बँक शिवाजी चौक सोलापूर या बँक मध्ये दिनांक १६ जुलै २०२१ रोजी स्वतःच्या नावाचे चालू खाते उघडून फिर्यादी यांचे खातेदार यांनी फिर्यादीच्या कामाची फी म्हणून एन आर काबरा अँड कंपनी या नावाने दिलेला चेक रक्कम १३ लाख ४७ हजार ३३३ रुपये इतकी कर्नाटक बँक मधील खात्यामध्ये जमा करून ती काढून घेऊन फिर्यादींची फसवणूक केली आहे.

त्याचप्रमाणे १५ मार्च २०२३ ते ४ एप्रिल २०२४ पर्यंत फिर्यादींच्या खातेदारांनी इन्कम टॅक्स जीएसटी भरणा कामाकरिता वरील संशयित आरोपी यांना दिलेली रक्कम भरणा न करता खातेदारांना बनावट चलन भरणा केलेली पावती देऊन ती रक्कम स्वतःच्या फायदा करिता वापरून खातेदारांची देखील फसवणूक केली आहे.तसेच खाते रकमांच्या ठिकाणी परस्पर खाते क्रमांक बदलून त्या ठिकाणी स्वतःचे व मित्र श्रीकांत मसळे,आनंद म्हंता यांचे खाते क्रमांक जोडून त्या खात्यावर फिर्यादीच्या खाते क्रमांकचा खातेदारांचा येणारा आयकर परतावा स्वतःच्या फायदा करिता स्वतःच्या खात्यावर ४४ लाख ६३ हजार ७०४ रुपये ट्रान्सफर करून घेऊन फिर्यादी यांची व फिर्यादीच्या खातेदारांची एकूण ५८ लाख ११ हजार ४२ रुपये इतकी रक्कम काढून घेऊन फसवणूक केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.या घटनेचा पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक गायकवाड हे करित आहे.

You Might Also Like

पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article गतवर्षीच्या तुलनेत गुन्ह्यांमध्ये घट? शोधही जोरात? कोण म्हणाले असं ?
Next Article एटीएम मधून पैसे काढताना वृद्धास ‘असे’ गंडविले

Latest News

ग्रुपने लालपरी बुक करा; कमी तिकिटात विठ्ठल दर्शनाला जा
महाराष्ट्र June 20, 2025
राहुल गांधींना मिळाला नवा सरकारी बंगला
महाराष्ट्र June 20, 2025
आदिवासी समाजाच्या गावात १७ प्रकारच्या योजना राबविणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र June 20, 2025
मुख्यमंत्र्यांच्या हस्ते धरणगावात ५० खाटांच्या उपजिल्हा रुग्णालयाच्या नवीन इमारतीचे भूमिपूजन
महाराष्ट्र June 20, 2025
अफगाणिस्तानच्या पश्चिम भागात ४.६ रिश्टर स्केल तीव्रतेचा भूकंप
महाराष्ट्र June 20, 2025
शासकीय अधिकाऱ्यांनी मनात अपेक्षा न ठेवता काम करावे – हसन मुश्रीफ
देश - विदेश June 20, 2025
पंढरपूरातील चंद्रभागा नदीत बुडून एका तरुणाचा मृत्यू
सोलापूर June 20, 2025
स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांबाबत आघाडीचा लवकरच निर्णय – शरद पवार
राजकारण June 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?