अमरावती, 13 एप्रिल (हिं.स.)
नवीन शैक्षणिक सत्राच्या पार्श्वभूमीवर जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शिक्षण विभागाने शाळेच्या पहिल्याच दिवशी विद्यार्थ्यांना मोफत पाठ्यपुस्तके उपलब्ध करून देण्याच्या अनुषंगाने पाठ्यपुस्तकांचे समग्र शिक्षा अभियानाअंतर्गत नियोजन सुरू केले आहे.
समग्र शिक्षाअंतर्गत इयत्ता पहिली ते आठवीमध्ये शिक्षण घेत असलेल्या प्रत्येक विद्यार्थी मोफत पाठ्यपुस्तकांपासून वंचित राहू नये आणि त्याला पाठ्यपुस्तकांअभावी शिक्षणात अडथळा येऊ नये, शाळेतील सर्व दाखलपात्र मुलांची १०० टक्के उपस्थितीटिकविणे, गळतीचे प्रमाण शून्यावर आणणे यासाठी ‘मोफत पाठ्यपुस्तक’ ही योजना सुरू केली आहे. इयत्ता पहिली ते आठवीच्या शासकीय शाळा, स्थानिक स्वराज्य संस्थांच्या शाळा, खासगी अनुदानित आणि अंशतः अनुदानित शाळांमध्ये शिकत असलेल्या १ लाख ५० हजारांवर विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके शासनामार्फत मोफत रविण्यात येणार आहेत. पुस्तके प्राप्त होताच ालुकानिहाय पुस्तकांचे वितरण केले जाणार नसल्याची माहिती प्राथमिक शिक्षणाधिकारी नरविंद मोहरे यांनी दिली.
तालुकानिहाय विद्यार्थीसंख्या
अमरावती – ९६,८८२, भातकुली- ७,८६०, अचलपूर- १२,९७०, चांदूर बाजार- १६,४६७, चांदूर रेल्वे- १६,४६१, दर्यापूर- १२,५९०, अंजनगाव- १२,७००, धामणगाव – ८,७५७, तिवसा – ७,४०९, वरूड- १६,२३६, नांदगाव खंडेश्वर – ९,१७८, मोर्शी- १३,३४५, धारणी-२५,१२३, चिखलदरा- ११,५६४, एकूण- २,६७,३६२