Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: फ्रान्स आणि जर्मन विमान कंपन्यांचा पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास नकार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

फ्रान्स आणि जर्मन विमान कंपन्यांचा पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास नकार

admin
Last updated: 2025/05/06 at 1:59 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

लाहोर , 6 मे (हिं.स.)।पहलगाम हल्ल्यानंतर पाकिस्तानला आणखी एक मोठा धक्का बसला आहे. पाकिस्तानने भारतासाठी आपले हवाई क्षेत्र बंद केल्यानंतर आता फ्रेंच आणि जर्मन परदेशी विमान कंपन्यांनी पाकिस्तान मार्गे हवाई उड्डाणे स्थगित केले आहेत.तसेच त्यांनी या प्रदेशातील त्यांचे कामकाजही स्थगित केले आहे. भारत आणि पाकिस्तानमधील वाढत्या तणावाच्या पार्श्वभूमीवर या परदेशी विमान कंपन्यांनी हा निर्णय घेतला आहे.

मीडिया रिपोर्टनुसार, फ्रेंच आणि जर्मन विमान कंपन्या एअर फ्रान्स आणि लुफ्थांसाने पाकिस्तानी हवाई हद्दीतून उड्डाण करण्यास नकार दिला आहे. एअर फ्रान्सने एका निवेदनात म्हटले की, भारत आणि पाकिस्तानमधील तणावामुळे पुढील सूचना मिळेपर्यंत पाकिस्तानवरून उड्डाणे स्थगित करण्याचा निर्णय एअर फ्रान्सने घेतला आहे. दरम्यान, लुफ्थांसानेही अशाचप्रकारचे निवेदन जारी केले आहे.

परदेशी विमान कंपन्यांच्या मते, दोन्ही देशांमध्ये युद्धाची शक्यता आहे. यामुळे हवाई हल्ले होतील. म्हणून सुरक्षेच्या कारणास्तव पाकिस्तानच्या हवाई हद्दीपासून दूर राहण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जर्मनीच्या लुफ्थांसा विमान कंपनीने म्हटले आहे की, सध्या पाकिस्तानच्या हवाई हद्दीतून विमाने उड्डाण करणार नाहीत.दरम्यान, फ्लाइट ट्रॅकिंग डेटावरून असे दिसून आले की ब्रिटिश एअरवेज, स्विस इंटरनॅशनल एअरलाइन्स आणि एमिरेट्सची काही विमाने अरबी समुद्रावरुन गेल्यानंतर पाकिस्तानी हवाई हद्द टाळत आहेत. परंतु या विमान कंपन्यांनी अद्याप कोणतेही अधिकृत विधान जारी केलेले नाही. दरम्यान, विमान कंपन्यांच्या या निर्णयामुळे पाकिस्तानला ओव्हरफ्लाइट शुल्कातून मिळणारा महसूल कमी होईल. तसेच भारताने पाकिस्तानी विमान कंपन्यांसाठीही आपले हवाई क्षेत्र बंद केले आहे. यामुळे देखील पाकिस्तानला मोठे नुकसान झेलावे लागत आहे

You Might Also Like

मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले

अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान

भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी

मुंबई-पुण्यात कोरोनाचा पुन्हा उद्रेक; नागरिकांना मास्क वापरण्याचे आवाहन

शास्त्रज्ञ एम.आर. श्रीनिवासन यांचे निधन

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे चौंडी येथे आगमन व स्वागत
Next Article मुंबई इंडियन्सच्या माजी खेळाडूला तरुणीवरील अत्याचार प्रकरणी अटक

Latest News

आमदार देवेंद्र कोटी यांनी मानले सोलापूर महापालिकेचे आभार
सोलापूर May 20, 2025
उजनी सोलापूर दुहेरी जलवाहिनीच्या प्रकल्पाची चाचणी यशस्वी
सोलापूर May 20, 2025
सोलापुरातील उद्योजकांसाठी दुबईमध्ये प्लॅटफॉर्म तयार करणार- आ. सुभाष देशमुख
सोलापूर May 20, 2025
जयकुमार गोरे यांची सोलापूर विकास मंच शिष्टमंडळाची सविस्तर बैठक फलदायी
सोलापूर May 20, 2025
मेघालयात अवैध बांगलादेशी कुटुंब पकडले
देश - विदेश May 20, 2025
अमेरिकेमुळे भारतीय शेतकऱ्यांचे 4 कोटींचे नुकसान
देश - विदेश May 20, 2025
भाजपकडून राहुल गांधींची तुलना असिम मुनीरशी
देश - विदेश May 20, 2025
अक्षय कुमारने परेश रावल यांना पाठवली २५ कोटींचं नुकसान भरपाईची नोटीस
Hot News May 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?