Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: जुना पुना नाक्यावर दोन मित्राचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक जखमी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

जुना पुना नाक्यावर दोन मित्राचा अपघात, एकाचा मृत्यू तर एक जखमी

Surajya Digital
Last updated: 2023/04/10 at 4:56 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

सोलापूर : जुना पुना येथे शनिवारी (ता. 8) रात्री ११ वाजता अज्ञात वाहनाच्या धडकेत आदर्श अमोल बनसोडे (वय १९, रा. रेणुगोपाल नगर) याचा मृत्यू झाला. यात त्याचा मित्र जखमी झाला आहे. मृत बनसोडे व त्याचा मित्र हे दोघे दुचाकीवरून जात होते. त्यावेळी रात्रीच्या वेळेस अज्ञात वाहनाने त्यांना धडक दिल्याने दोघे दुचाकीवरून खाली कोसळले. Accident of two friends on Juna Puna bridge, one dead and one injured in Solapur

 

हा अपघात इतका गंभीर होता की, यात बनसोडे यांच्या डोक्याचा चेंदामेंदा झाला. घटनेची माहिती कळताच फौजदार चावडी पोलिस ठाण्याचे पोलिस हे घटनास्थळी गेले. दरम्यान, रुग्णसेवक लादेन याने बनसोडे याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल केले असता डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे. दरम्यान, त्याचा मित्राच्या तब्येतीत सुधारणा होत असल्याची माहिती पोलिसांनी दिली.

 

○ जागेच्या वादातून लाथाबुक्क्यांनी मारहाण

सोलापूर : जागेच्या वादातून दोन जणांनी मिळून लोखंडी पाईप व लाथाबुक्क्यांनी मारहाण केल्यामुळे तरूण जखमी झाला आहे. ऋतिक देवेंद्र गोने ( वय २२, रा. भद्रावती पेठ) असे जखमी झालेल्या दोघांची नावे आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नाेंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.○ गोळ्या घेतल्याने इसम रुग्णालयात

सोलापूर : अज्ञात कारणातून इसमाने राहत्या घरात जादा प्रमाणात गोळ्या घेतल्याने त्यांना त्रास होऊ लागला. यामुळे संजय शशिकांत पोतदार (वय-४४, रा. आदित्य  नगर,विजापूर रोड) यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

○ अज्ञात वाहनाच्या धडकेत दुचाकीस्वार जखमी

सोलापूर : पेट्रोल भरून पंपातून जात असताना पाठीमागून येणार्या दुसर्‍या दुचाकीने धडक दिल्याने श्रीनिवास अंजय्या श्रीरामोज ( वय ४०, रा. जुना विडी घरकुल) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज सर्वोपचार शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
○ पाईपने मारहाण केल्याने इसम जखमी
सोलापूर : गैरसमजुतीतून चार जणांनी मिळून इसमाला गॅसच्या पाईपने मारहाण केल्यामुळे इसम जखमी झाला आहे. शंकर राम असादे (वय-४०,रा.अलकुंटे चौक) असे जखमी झालेल्या इसमाचे नाव आहे. त्याला उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.
○ चालत जात असताना वाहनाच्या धडकेत पादचारी जखमी
सोलापूर : जुना विडी घरकुल येथील सर्विस रोडवरून चालत जात असताना अज्ञात वाहनाने धडक दिल्याने श्रीनिवास पुंडलिक वंगरी ( वय ५३, रा. जुना विडी घरकुल) हे जखमी झाले आहेत. त्यांना उपचारासाठी छत्रपती शिवाजी महाराज शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. या घटनेची नोंद सिव्हिल पोलिस चौकीत झाली आहे.

You Might Also Like

सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी

सोलापूरचे महापालिका उपायुक्त लोकरेंना आ. देशमुख यांनी झापले

संजय राऊतांनाही गुवाहटीला यायचे होते; शहाजीबापूंचा मोठा गौप्यस्फोट

सोलापूर – करमाळ्यात कुंटणखाण्यावर छापा

सोलापूर – जिल्ह्यात अवकाळीने 64 कोटींच्या पिकांचे नुकसान

TAGGED: #Accident #two #friends #JunaPuna #bridge #onedead #oneinjured #Solapur, #जुनापुना #नाका #दोन #मित्र #अपघात #एक #मृत्यू #जखमी #डोके #चेंदामेंदा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहराला पाणीपुरवठा एक दिवस उशीरा होणार
Next Article पुष्पा 2 साठी अल्लू अर्जूनने आकारले पहिल्यापेक्षा दुप्पट मानधन

Latest News

crime
सोलापुरात वाहन जाण्यासाठी वाट न दिल्याने तुफान दगडफेक, तिघे जखमी
सोलापूर June 23, 2025
बांगलादेशात पाकिस्तानी आयएसआय हस्तकाची उपराष्ट्रीय सुरक्षा सल्लागारपदी नियुक्तीची शक्यता
देश - विदेश June 23, 2025
रोहित शर्माच्या कारकीर्दीला १८ वर्षे पूर्ण, सोशल मीडियावर भावूक पोस्ट
Top News June 23, 2025
आता लक्ष्य टोकीयो वर्ल्ड चॅम्पियनशीप – नीरज चोप्रा
देश - विदेश June 23, 2025
इराणी लष्कराची अमेरिकेला थेट धमकी
देश - विदेश June 23, 2025
राज्यात स्थानिक स्वराज्य संस्था निवडणूक ऑक्टोबरमध्ये
राजकारण June 23, 2025
पुण्यात 50 हजार कोटींचे पूल बनवणार – नितीन गडकरी
महाराष्ट्र June 23, 2025
भाकप हा आमचा मोठा भाऊ – शेकाप नेते जयंत पाटील
महाराष्ट्र June 23, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?