नवी दिल्ली : आघाडीची सर्च इंजिन कंपनी गुगलने नुकतीच Verified Calls फीचरची घोषणा केली आहे. गुगलचं हे फीचर TrueCaller अॅपसाठी थेट टक्कर देणारं असेल. या नवीन फीचरद्वारे कोण कॉल करतंय, कॉल करणाऱ्याच्या प्रोफाइलचा लोगो याबाबत माहिती मिळेल. याशिवाय एखादा बिजनेस कॉल आल्यास तो कॉल का करण्यात आलाय, याचं कारणही युजर्सना कॉल उचलण्याआधीच कळेल.
भारतासह जगभरात फ्रॉड कॉल्सची समस्या वाढत असतानाच गुगलने Verified Calls फीचर आणलं आहे. हे फीचर भारत, स्पेन, ब्राझिल, मेक्सिको आणि अमेरिकासहीत जगभरात रोलआउट केलं जाणार आहे.
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
गुगलच्या पिक्सेल सीरिजच्या सर्व फोनमध्ये आणि अनेक अँड्रॉइड फोन्समध्ये Google Phone अॅप आधीपासूनच डायलर म्हणून काम करत असतं. त्या सर्व फोनमध्ये हे फीचर पुढील अपडेटपासून मिळेल. जर तुमच्या फोनमध्ये Google Phone अॅप इंस्टॉल नसेल तर तुम्ही हे अॅप गुगल प्ले स्टोअरमधून इंस्टॉल करु शकतात.
या पायलट प्रोग्रॅमची सुरूवात चांगली राहिली असून युजर्सना या फीचरचा नक्कीच फायदा होईल, असं गुगलने एका ब्लॉग पोस्टमध्ये म्हटलं आहे. या फीचरद्वारे कोण कॉल करतंय, कॉल करणाऱ्याच्या प्रोफाइलचा लोगो याची माहिती युजरला मिळेल. सध्या TrueCaller अॅपमध्ये अशाप्रकारचे फीचर्स युजर्सना मिळतात. पण सुरक्षेच्या कारणास्तव भारत सरकारने अनेक चिनी अॅप्सवर बंदी घातली आहे. त्यात TrueCaller चाही समावेश आहे.
Verified Calls फीचरद्वारे एखादा बिजनेस कॉल आल्यास तो कॉल का करण्यात आला आहे याचं कारणही युजर्सना कॉल उचलण्याआधीच कळेल. मात्र, कॉल करणाऱ्या बिजनेस कॉलरने Verified Calls साठी गुगलसोबत नोंदणी केली असेल तरच कॉल करण्याचं कारण युजर्सना समजणार आहे. हे फीचर आतापर्यंत TrueCaller अॅपमध्ये नव्हतं.