Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर व्हावे; संसदीय अधिवेशनात केली मागणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

श्री सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर व्हावे; संसदीय अधिवेशनात केली मागणी

Surajya Digital
Last updated: 2021/12/16 at 4:56 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर – ग्रामदैवत सिद्धेश्वर गड्डा यात्रेचे थेट प्रक्षेपण राष्ट्रीय वाहिनीवर व्हावे अशी मागणी खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली आहे. संसदीय संसदीय अधिवेशनात यांचे महत्त्व पटवून मागणी केली. तसे निवेदनही केंद्रीय सूचना, प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे दिले आहे.

जानेवारी महिन्यात सोलापूरचे ग्रामदैवत श्री सिद्धेश्वर महाराजांच्या गड्डा यात्रेतील साजरे होणारे धार्मिक, सांस्कृतिक वेगळेपण देशभरात प्रसारित होण्याची आवश्यकता आहे. जाती पंथ, भेदभाव विरहित साजरा होणाऱ्या सोलापूरच्या या गड्डा यात्रेचे देशातील सर्व इतर यात्रेपेक्षा वैशिष्ट्यपूर्ण, वेगळेपण आहे. हे वेगळेपण तसेच श्री सिद्धेश्वर महाराजांच्या दिव्य कार्याचा प्रसार करीत सांस्कृतिक, अध्यात्मिक महती देशभरात होण्यासाठी चार दिवसीय यात्रेचे थेट प्रक्षेपण डी.डी सह्याद्रीवर करण्याची मागणी  खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली.

संसदीय अधिवेशनात दरम्यान ३७७ अन्वये तसेच केंद्रीय सूचना व प्रसारण मंत्री अनुराग ठाकूर यांच्याकडे निवेदनाद्वारे खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी हि मागणी केली. यावेळी तत्परतेने केंद्रीय मंत्री अनुराग ठाकूर यांनी याबाबत दाखल घेत संबंधित अधिकाऱ्यांना निर्देश दिले. येणाऱ्या जानेवारी महिन्यातील गड्डा यात्रेचे चित्रीकरण, प्रसारण राष्ट्रीय डीडी वाहिनीवर करण्यात येण्याबाबत सकारात्मकता दर्शविली.

सोलापूर नगरी ही १२ व्या शतकात श्री सिद्धेश्वरांच्या वास्तव्याने पावन झालेली योगभूमी म्हणून प्रसिद्ध आहे. त्यांनी घेतलेल्या जिवंत समाधीमुळे सोलापूर हि योगभूमी, तपोभूमी म्हणून दक्षिण भारतात परिचित आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

सुमारे ९०० वर्षांपासून प्रतिवर्षी मकर संक्रांतीस जानेवारी महिन्याच्या १२ ते १५ जानेवारी दरम्यान चालणाऱ्या ४ दिवसीय काळात गड्डा यात्रा भरते.

शेकडो वर्षांची परंपरा असलेल्या या यात्रेत महाराष्ट्रासह कर्नाटक, आंध्र प्रदेश, मध्य प्रदेशातून लाखो भाविक सोलापुरात दाखल होतात. १२ व्या शतकात महात्मा बसवेश्वरांच्या समकालीन श्री सिद्धेश्वरांनी  ६८ हजार वचने लिहिली.  ४००० शिवशरण भक्तांसह तलावाची निर्मिती केली. या तलावाच्या मधोमध जिवंत समाधी घेतली.

ग्रामदैवत श्री सिद्धेश्वरांच्या यात्रा काळात सर्वाधिक आकर्षण म्हणजे सर्व संप्रदायांचे मानकरीसहित पांढरा शुभ्र बाराबंदी वेश परिधान करून श्री सिद्धेश्वरांच्या योगडांदाची प्रतिकृती असलेले सात नंदीध्वजांची मिरवणूक काढली जाते. जे पाहणे अविस्मरणीय अत्यंत विलक्षणीय असते. विशेष म्हणजे १२ व्या शतकात श्री सिद्धेश्वरांनी सर्वधर्मीय सामुदायिक विवाह सोहळा संपन्न करून आदर्श समाज निर्मितीसाठी महान कार्य केले.

त्यामुळे या महान संतांचे कार्य, विचार व अध्यात्मिक, सांस्कृतिक वारसा देशभरात प्रसारित व्हावा. हि गड्डा यात्रा देशभरात माहित व्हावी यासाठी चार दिवसीय यात्रेचे थेट प्रक्षेपण डी.डी सह्याद्रीवर करण्याची मागणी  खा. डॉ. जयसिद्धेश्वर महास्वामी यांनी केली. अभिमान वाटावा अशी देखणी अविस्मरणीय यात्रा यंदाच्या वर्षी राष्ट्रीय वाहिनीवर प्रसारित होणार असल्याने समस्त सोलापूरकरांना आनंदाची पर्वणी आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #ShriSiddheshwar #GaddaYatra #telecast #live #National #Channel #Demand #parliamentary #session, #श्रीसिद्धेश्वर #गड्डायात्रा #थेटप्रक्षेपण #राष्ट्रीयवाहिनी #संसदीय #अधिवेशन #मागणी
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पुण्याचे सुयश गरगटे व प्रियांका इंगळे महाराष्ट्र खो-खो संघाचे कर्णधार
Next Article शहरात चार चोऱ्या, मार्डीच्या युवकास पकडले; तर सोलापुरात गर्दी केल्याने ३८ जणांवर गुन्हे दाखल

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?