Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गडकरींचा मनोहर जोशींना वाकून नमस्कार, राजकीय चर्चांना उधाण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

गडकरींचा मनोहर जोशींना वाकून नमस्कार, राजकीय चर्चांना उधाण

Surajya Digital
Last updated: 2021/01/07 at 10:50 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : महाराष्ट्रात भाजप-शिवसेना हे सध्या एकमेकांच्या विरोधात आहेत. त्यातच केंद्रीय मंत्री नितीन गडकरींनी आज माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशींची मुंबईत त्यांच्या निवासस्थानी जाऊन भेट घेतली. त्यामुळे राजकीय चर्चांना उधाण आलंय. या भेटीचा फोटो गडकरींनी ट्विट केलाय. यात गडकरी मनोहर जोशींना वाकून नमस्कार करताना दिसत आहेत. पण, या बैठकीत नक्की काय चर्चा झाली? हे अद्याप समोर आलेलं नाही.

केंद्रीय परिवहन मंत्री नितीन गडकरी यांनी आज गुरुवारी राज्याचे माजी मुख्यमंत्री व शिवसेना नेते मनोहर जोशी यांच्या निवासस्थानी जाऊन त्यांची भेट घेतली. भाजप-शिवसेना युती इतिहासजमा होऊन महाविकास आघाडी हे नवं समीकरण राज्यात आकाराला आलं असताना दोन्ही पक्षाच्या दिग्गज नेत्यांची झालेली ही भेट महत्त्वाची मानली जात आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

राज्यातील विविध प्रकल्पांचा आढावा घेण्यासाठी सह्याद्री शासकीय अतिथीगृहावर मुख्यमंत्री व उपमुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत आज महत्त्वाची बैठक होत आहे. या बैठकीच्या निमित्तानं मुंबईत असलेले गडकरी हे सकाळी जोशी सरांच्या निवासस्थानी पोहोचले. तिथं पोहोचताच गडकरी यांनी सरांना वाकून नमस्कार केला. त्यांच्या प्रकृतीची विचारपूस करून त्यांच्याशी गप्पाही मारल्या.

१९९५ साली राज्यात पहिल्यांदा शिवसेना-भाजप युतीचे सरकार आले होते. मनोहर जोशी यांच्याकडं या सरकारचं नेतृत्व होतं. शिवसेनेचे ते पहिले मुख्यमंत्री होते. या सरकारमध्ये नितीन गडकरी हे सार्वजनिक बांधकाम मंत्री होते. याच काळात मुंबईत ५५ उड्डाणपूल व मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे उभारण्यात आला होता. राज्यातील उल्लेखनीय कामांमध्ये आजही या सगळ्याचा उल्लेख होतो.

युतीचे सरकार गेल्यानंतर मनोहर जोशी बरीच वर्षे खासदार होते. लोकसभेचं अध्यक्षपद भूषवण्याची संधीही त्यांना मिळाली. मात्र, वयपरत्वे ते आता राजकारणात सक्रिय नाहीत. तर, नितीन गडकरी हे दिल्लीच्या राजकारणात आहेत. क्वचित प्रसंगी कामानिमित्त ते मुंबईत येतात. मात्र, जुन्या नेत्यांशी असलेला त्यांचा स्नेह आजही कायम आहे, हेच या भेटीतून दिसून आले.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #गडकरींचा #मनोहरजोशींना #वाकून #नमस्कार #राजकीय #चर्चांना #उधाण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article देशभरात बर्ड फ्लूचे थैमान, नव्या संकटाचा धोका 8 राज्यांत बर्ड फ्लूचा धोका
Next Article पाण्याच्या टाकीत आढळला 7 वर्षांच्या मुलाचा सांगाडा

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?