गोंदिया, 30 मे (हिं.स.) – गोंदिया जिल्ह्याच्या रावणावाडी पोलिस ठाण्यांतर्गत येणाऱ्या मुरपार येथील विद्युत खांबावर लावण्यात आलेले इलेक्ट्रिक कंडक्टर व अॅल्युमिनियम तार चोरी करणाऱ्या टोळीच्या सदस्यांना गोंदिया स्थानिक गुन्हे शाखेच्या पोलिसांनी अटक केली आहे. प्रमोद मेहर (३४) रामा मेश्राम (२३), राजू मेश्राम (३१), अंकुश मेश्राम (२५) व महेंद्र कांबळे (१९) असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.
तक्रारदार सुमितसिंग बग्गा यांनी रावणवाडी येथे या संदर्भात तक्रार दाखल केली होती. त्यात गोंडीटोला ते हर्षवर्धन चौक मुरपार दरम्यान ६ इलेक्ट्रिक खांबावर लावण्यात आलेले इलेक्ट्रिक कंडक्टर तार किंमत १ लाख ४० हजार रुपयांचे १९ एप्रिल ते २० एप्रिलच्या चोरट्यानी चोरून नेले होते.
या प्रकरणात रावणवाडी पोलिसांनी अज्ञात आरोपीं विरुद्ध भारतीय न्याय गुन्हा दाखल केला होता. पोलिसांनी तपास करत पाच आरोपांना अटक केली आहे. आरोपींजवळून अॅल्युमिनियम कंडक्टर ताराचे तीन मोठे बंडल किंमत ४ लाख ५० हजार रुपये व इलेक्ट्रिक खांबास लावण्यात येणारे अर्थिग वायर, कब्जे, चॅनेल एक्सटेन्शन वायर अंदाजे किंमत २५ हजार असा एकूण किंमत ४ लाख ७५ रुपयांचा माल हस्तगत करून गुन्ह्यात जप्त करण्यात आला.