Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोन्याच्या बांगड्या कट करून चोरी; सराफासह सातजणांची टोळी जेरबंद
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

सोन्याच्या बांगड्या कट करून चोरी; सराफासह सातजणांची टोळी जेरबंद

Surajya Digital
Last updated: 2023/01/24 at 10:53 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
□ सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरीस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)□ वळसंग पोलीस ठाण्याची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी स्वीकारली

□ सोलापूर लोहमार्ग पोलिसांची कामगिरी

 

सोलापूर : सोन्याच्या बांगड्या कट करून चोरी करणारी सराफासह सातजणांची टोळी लोहमार्ग पोलिसांनी जेरबंद केली आहे. त्यांच्याकडून सुमारे सव्वातीन लाखांचा ऐवज जप्त करण्यात आला आहे. The theft of gold bangles by cutting; Gang of seven including Sarafa jailed by Solapur Lohmarg Police

 

अजय सोमा जाधव (वय 29, रा. क्रांतीनगर झोपडपटटी, दमाणीनगर), लखन अशोक गायकवाड (वय 28, रा. सेटलमेंट फ्री कॉलनी नं 4), नीलेश शंकर जाधव (वय 33, रा. सलगर वस्ती पोलीस ठाण्यासमोर, सोलापूर सध्या रा. हाउसिंग बोर्ड, शास्त्रीनगर अंबरनाथ) व सोनार कुशलसिंह जोधसिंह राव (वय 38, रा. रावमादडा झाडोली, उदयपूर राजस्थान सध्या रा. कोहोचगांव, अंबरनाथ पश्चिम), शुभम सुर्यवंशी, राहुल शिंदे (दोघे रा. हाउसिंग बोर्ड, शास्त्रीनगर, अंबरनाथ जि. ठाणे), अमर शंकर जाधव (वय 35 रा. सलगरवस्ती सध्या रा. पिंगळेवस्ती, मुंडवा पासपोर्ट ऑफीसजवळ, पुणे) अशी अटक करण्यात आलेल्या सातजणांची नावे आहेत.

फिर्यादी संतोष सौदागर नारायणकर (वय 42, रा. न्यू संजय नगर कुमठा नाका सध्या रा. विंग तोडमल अंगण, येवलेवाडी, कोंढवा पुणे) यांची आई सोलापूर ते गुलबर्गा प्रवास करण्याकरीता विशाखापट्टणम एक्सप्रेसमध्ये जनरल बोगीत चढत असताना चोरट्यांनी गर्दीचा फायदा घेवून हातातील सोन्याची बांगडी कट करून चोरून नेली होती. याप्रकरणी अज्ञात चोरट्यांविरुध्द लोहमार्ग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला होता.

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

लोहमार्गचे पोलीस अधीक्षक श्रीकांत धिवरे यांनी या गुन्ह्यांवर निर्बंध घालण्याचे आदेश दिले होते. पोलिसांनी दोन गुन्ह्यात सातजणांना जेरबंद केले असून त्यांच्याकडून पावणेतीन लाखांचे 10 तोळ्याची सोन्याची लगड व गुन्ह्यात वापरलेली मोटारसायकल असा एकूण तीन लाख 23 हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आले आहे. आरोपींकडून चार गुन्हे उघड करण्यात यश आले आहे.

 

ही कारवाई लोहमार्गचे पोलीस निरीक्षक संतोष गायकवाड, सहायक फौजदार संजय जाधव, प्रमोद सुरवसे, यशवंत जमादार, प्रसाद गायकवाड यांनी केली आहे.

 

 

□ वळसंग पोलीस ठाण्याची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी स्वीकारली

सोलापूर  : दक्षिण सोलापूर तालुक्यातील वळसंग पोलीस ठाण्याची सूत्रे सहायक पोलीस निरीक्षक अनिल सनगले यांनी मंगळवारी स्वीकारली.

गेल्या दोन वर्षांपासून वळंसग पोलीस ठाण्याचा पदभार उत्तमरित्या सांभाळलेले सहायक पोलीस निरीक्षक अतुल भोसले यांची बदली पोलीस अधीक्षक कार्यालयातील पोलीस कल्याण शाखेत झाली असून त्यांच्या जागी स्थानिक गुन्हे शाखेतील सहायक पोलीस निरीक्षक सनगले यांच्या नियुक्तीचे आदेश पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे यांनी दिले.

सनगले यांनी यापूर्वी परभणी, नांदेड या ठिकाणी सेवा बजावून नऊ महिन्यांपूर्वी ते सोलापूर ग्रामीण पोलीस दलात रुजू झाले होते. सुरुवारतीला त्यांची वर्णी स्थानिक गुन्हे शाखेत लागली होती. त्यानंतर त्यांच्याकडे आता वळसंग पोलीस ठाण्याचा स्वतंत्र कारभार देण्यात आला आहे.

You Might Also Like

उजनीतून ३७ लाख युनिट वीजनिर्मिती

सोलापूर विमानतळ परिसराची संयुक्त पाहणी

भारताने हल्ला केल्यास चोख प्रत्युत्तर देऊ – असीम मुनीर

भाविकांसाठी भाकरी पिठलं लोणचं, ठेच्याचा बेत

सोलापूर : हजारो तरूणांना 36 कोटींचा गंडा, ४,९८३ पानांचे दोषारोपपत्र दाखल

TAGGED: #theft #gold #bangles #bycutting #Gangofseven #Sarafa #jailed #Solapur #Lohmarg #Police, #सोन्याच्या #बांगड्या #कट #चोरी #सराफ #सातजण #टोळी #जेरबंद #सोलापूर #लोहमार्ग #पोलीस
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article कंटेनरचे हेड तुटल्याने बाळे पुलाजवळ घडला विचित्र अपघात
Next Article महापालिकेचे यंदाचे अंदाजपत्रक वास्तववादी राहणार : आयुक्त तेली – उगले

Latest News

कडूंच्या कार्यकर्त्यांनी शेतात रोवले चक्क भाजपचे झेंडे..!
राजकारण July 8, 2025
संसदीय राजभाषा समिती सदस्यांनी घेतली राज्यपालांची भेट
महाराष्ट्र July 8, 2025
देशव्यापी भारत बंदची हाक; 25 कोटी कामगार सहभागी, अत्यावश्यक सेवा ठप्प होण्याची शक्यता
देश - विदेश July 8, 2025
“मी मंत्री, आमदार नंतर… मराठी आधी!” – प्रताप सरनाईक
महाराष्ट्र July 8, 2025
विरोधी पक्षनेत्यावरून विरोधकांचा सभात्याग
महाराष्ट्र July 8, 2025
महाराष्ट्रातील सहा औ‌द्योगिक प्रशिक्षण संस्थांचे आधुनिकीकरण होणार – मुख्यमंत्री
महाराष्ट्र July 8, 2025
या गोंधळाला केवळ गृहविभाग जबाबदार — सुप्रिया सुळे
महाराष्ट्र July 8, 2025
न्यायाधीश भूषण गवई सरन्यायाधीश होणे म्हणजे सामाजिक समतेचा विजय – एकनाथ शिंदे
महाराष्ट्र July 8, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?