Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: मार्कंडेय, गंगामाई, वळसंगकर हॉस्पिटलला जिल्हाधिकारी, आयुक्तांच्या भेटी; जिल्हा समितीने केली पाहणी
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

मार्कंडेय, गंगामाई, वळसंगकर हॉस्पिटलला जिल्हाधिकारी, आयुक्तांच्या भेटी; जिल्हा समितीने केली पाहणी

Surajya Digital
Last updated: 2020/07/22 at 7:57 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर : सोलापूर शहरामध्ये कोरोना रूग्णांसाठी खाजगी दवाखाने अधिग्रहित केले असून 80 टक्के बेड कोविड रूग्णांच्या उपचारासाठी ठेवण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. याची अंमलबजावणी व्यवस्थित होते की नाही यासाठी आज बुधवारी जिल्हाधिकारी मिलिंद शंभरकर, महापालिका आयुक्त पी. शिवशंकर यांनी शहरातील मार्कंडेय सोलापूर सहकारी रूग्णालय आणि संशोधन केंद्र, गंगामाई हॉस्पिटल आणि वळसंगकर हॉस्पिटलला भेट देऊन व्यवस्थेची पाहणी केली.

यावेळी समितीमधील सदस्य डॉ. वैशंपायन स्मृती शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाचे अधिष्ठाता डॉ. संजीव ठाकूर, श्री छत्रपती सर्वोपचार रूग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. प्रदीप ढेले, आयएमएचे डॉ. हरिष रायचूर उपस्थित होते.

मार्कंडेय रूग्णालयात 105 बेड कोविड रूग्णांसाठी ठेवले असून 116 पर्यंत रूग्णांची सोय होत असल्याचे चेअरमन डॉ. माणिक गुर्रम यांनी सांगितले. यावेळी जिल्हाधिकारी शंभरकर आणि आयुक्त शिवशंकर यांनी रूग्णालयांच्या अडचणी जाणून घेतल्या. कोविड हॉस्पिटलमध्ये केवळ गंभीर रूग्णांना दाखल करून उपचार करा, बाकी पॉझिटिव्ह रूग्णांवर कोविड केअर सेंटरमध्ये उपचारासाठी पाठवून देण्याच्या सूचना जिल्हाधिकारी यांनी दिल्या.

शासनाच्या निर्देशानुसार असलेल्या सोयी-सुविधा, व्यवस्था, कोविड वॉर्ड, ऑक्सिजन सुविधा, सीसीटीव्हीची सुविधा आणि संख्या, ते व्यवस्थित कार्यान्वित आहेत का, आयसोलेशन वॉर्डातील सुविधा कशा आहेत, आयसीयुची व्यवस्था, नातेवाईकांच्या राहण्याची व्यवस्था, पार्किंग व्यवस्था, महात्मा जोतिबा फुले जनआरोग्य योजनेतील लाभार्थ्यांच्या सोयी-सुविधा, मनुष्यबळ याबाबत त्यांनी प्रत्यक्ष पाहणी करून सूचना केल्या. तसेच केस पेपर आणि इतर नोंदीची माहिती, दाखल आणि डिस्चार्ज पॉलिसी, रूग्णांसाठी फोनची सुविधा, डॅशबोर्ड, पल्स ऑक्सिमिटर यांचीही माहिती घेऊन सुधारण्या करण्याबाबत सूचना दिल्या.

जिल्हाधिकारी शंभरकर यांनी समुपदेशनासाठी वेगळी जागा उपलब्ध करून द्या, गंगामाई हॉस्पिटलमध्ये कोविड रूग्णांसाठी 15 आयसीयु बेडची व्यवस्था आणि आवश्यक रूग्णांना ऑक्सिजनची व्यवस्था करण्याच्या सूचना हॉस्पिटल प्रशासनाला दिल्या. वळसंगकर हॉस्पिटलमध्ये 30 पैकी 10 बेड कोविडसाठी आहेत. याठिकाणी 10 व्हेंटिलेटरची सुविधाही आहे. काही त्रुटी आढळल्यास त्याची पूर्तता करण्याचे निर्देश जिल्हाधिकारी शंभरकर यांनी दिले असून जिल्ह्यातील इतर ठिकाणीही जिल्हास्तरीय समिती पाहणी करणार असल्याचे त्यांनी सांगितले.

* जिल्हास्तरीय समिती नियुक्त

कोविड-19 रूग्णालयांची नियमित तपासणी व देखरेखीसाठी जिल्हाधिकाऱ्यांच्या अध्यक्षतेखाली जिल्हास्तरीय समिती नियुक्त केली आहे. यामध्ये सदस्य म्हणून मनपा आयुक्त, अधिष्ठाता, जनरल मेडिसिनचे विभागप्रमुख, जिल्हा सर्व्हेक्षण अधिकारी, मनपा आरोग्य अधिकारी, इंडियन मेडिकल असोसिएशनचे अध्यक्ष, सदस्य सचिव म्हणून जिल्हा शल्यचिकित्सक हे आहेत.

You Might Also Like

सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड

मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत सोमवारी सोलापुरातून गोव्याच्या दिशेने उडणार विमान

पंढरपूर वारीसाठी ड्रोन, एआयचा वापर

ब्रिक्स सदस्य राष्ट्र संसदांकडून दहशतवादाविरोधात सहयोगासाठी सहमती

सोलापूर शहर-जिल्ह्यातील भाजप कार्यकर्त्यांत सरकार विरोधात खदखद

TAGGED: #जिल्हासमिती #जिल्हाधिकारी #आयुक्त #शंभरकर #शिवशंकर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापूर शहरात कोरोनाबाधित रुग्ण चार हजाराच्यावर; नव्याने चार मृत्यू तर 64 रुग्ण
Next Article सोलापूर ग्रामीणमध्ये आज 134 कोरोना बाधित; सर्व तालुक्यास बार्शीने टाकले मागे

Latest News

राहुल गांधींना रोज खोटं बोलायची सवय लागली – फडणवीस
राजकारण June 7, 2025
खलिस्तानी दहशतवादी गोल्डी ब्रारसह ५ आरोपींविरुद्ध आरोपपत्र दाखल
देश - विदेश June 7, 2025
छत्तीसगड : चकमकीत 7 नक्षलवाद्यांचा खात्मा
महाराष्ट्र June 7, 2025
लाडकी बहिण योजना कधीही बंद पडणार नाही – उपमुख्यमंत्री शिंदे
महाराष्ट्र June 7, 2025
भारताच्या अत्याधिक गरीबी दरात सुधारणा- जागतिक बँक
देश - विदेश June 7, 2025
आपले युवक हे विकसित भारताचे सारथी – उपराष्ट्रपती धनखड
महाराष्ट्र June 7, 2025
सुनील तटकरेंनी आधी राजीनामा द्यावा, मग मी देतो – महेंद्र थोरवे
महाराष्ट्र June 7, 2025
सोलापूर जिप प्राथमिक शाळेतील रिक्त शिक्षकांची माहिती पोर्टलवर अपलोड
सोलापूर June 7, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?