Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गोव्याच्या राज्यपालांची उचलबांगडी का केली, राजकारण आणि अर्थकारणातून सत्यपाल मलिकांना हटविले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेशराजकारण

गोव्याच्या राज्यपालांची उचलबांगडी का केली, राजकारण आणि अर्थकारणातून सत्यपाल मलिकांना हटविले

Surajya Digital
Last updated: 2020/08/19 at 8:47 AM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

गोवा : मुख्यमंत्री व गोव्यातील भाजप नेत्यांशी झालेल्या तीव्र मतभेदांमुळे सत्यपाल मलिक यांची अचानकपणे गोव्याच्या राज्यपाल पदावरून उचलबांगडी करून त्यांची नेमणूक मेघालयात करण्यात आली आहे. दरम्यान, गोव्याच्या राज्यापल पदाचा अतिरिक्त कार्यभार महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्याकडे सोपविण्यात आला आहे.

गोव्यातील राजभवन एका कॅसेनो लॉबीला विकण्याच्या हालचाली गोव्यातील मुख्यमंत्री प्रमोद सावंत सरकारने सुरू केल्या होत्या. जुन्या राजभवनाच्या विक्रीस आणि नव्या राजभवनाच्या निर्मितीस कडाडून विरोध करणे गोव्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांना चांगलेच महागात पडले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

मेघालयाचे विद्यमान राज्यपाल तथागत राय यांचा पाच वर्षाचा कार्यकाल संपल्यामुळे त्यांच्या जागी सत्यपाल मलिक यांची मेघालयाचे राज्यपाल म्हणून नेमणूक करण्यात आली असल्याचे राष्ट्रपती भवनाकडून अधिकृतरित्या जाहीर करण्यात आले. मात्र या नेमणुकीमागे राजकारण व अर्थकारण दडले असल्याची माहिती सूत्रांनी दिली.

गोव्याचे राज्यपालांचे सध्याचे निवासस्थान एका कॅसिनो कंपनीच्या घशात घालण्याचा गोव्यातील भाजप सरकारचा प्रयत्न आहे. विशेषतः मुख्यमंत्री प्रमोद सावंत त्यासाठी खूपच आग्रही दिसत आहेत. मात्र मी आहे तिथेच ठीक आहे मला नवीन राजभवन नको. कोरोनामुळे राज्याची आर्थिक स्थिती खालावली आहे. त्यामुळे अनावश्यक खर्च नको, अशी बाणेदार भूमिका सत्यपाल मलिक यांनी घेतल्यामुळे गोवा सरकारची चांगलीच गोची झाली होती.

तशातच गोव्यातील कोरोनाची स्थिती हाताळण्यात मुख्यमंत्री प्रमोद सावंत कुचकामी ठरत असल्याबद्दलही राज्यपालांनी त्यांना चांगल्याच कानपिचक्या दिल्या होत्या. राज्यपाल व मुख्यमंत्री वादाचे पर्यवसान अखेर मलिकांच्या उचलबांगडीमध्ये झाले आहे. सत्यपाल मलिक जम्मू-कश्मीरचे राज्यपाल असतानाच कलम 370 रद्द करण्याचा ऐतिहासिक निर्णय घेण्यात आला होता. त्याची काटेकोर अंमलबजावणीही मलिक यांच्या राज्यपालपदाच्या कार्यकाळातच झाली होती.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

TAGGED: #गोवा #राज्यपाल #उचलबांगडी #कसिनो #राजकारण #आर्थकारण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सांगलीत तब्बल 19 कोरोनाबळी तर 311रुग्ण; मृत्यू 249 तर कोरोनाग्रस्तांनी ओलांडला 7 हजाराचा आकडा
Next Article प्रत्येक जिल्ह्यात होणार ‘महिला बाल विकास भवन’; सामाजिक न्याय भवनासारखी प्राथमिक सुरूवात सांगलीत

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?