Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: गाझियाबाद दुर्घटनेतील मृतांचा आकडा गेला 25 वर, तिघांना अटक
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीदेश - विदेश

गाझियाबाद दुर्घटनेतील मृतांचा आकडा गेला 25 वर, तिघांना अटक

Surajya Digital
Last updated: 2021/01/04 at 5:16 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

गाझियाबाद : उत्तर प्रदेशमधील गाझियाबादमध्ये काल एक मोठी दुर्घटना समोर आली. एका स्मशानभूमीमधील शेडचे छप्पर कोसळून झालेल्या अपघातात तब्बल 25 जणांचा मृत्यू झाला आहे. तर अनेक जण जखमी झाले असून उपचारासाठी त्यांना जवळच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. यात मृतांचा आकडा आठ, नंतर 18 तर आता 25 वर गेला आहे.

याप्रकरणी आतापर्यंत तीन जणांना अटक करण्यात आली आहे. तर या प्रकरणाची अधिक चौकशी करण्यासाठी दोन सदस्यांची चौकशी समिती गठीत केली गेली आहे. गाझियाबाद ग्रामीणचे पोलीस अधिक्षकांनी याबाबत माहिती दिली आहे.

गाझियाबादमधील मुरादनगर परिसरात ही दुर्घटना घडली. मिळालेल्या माहितीनुसार, मुरादनगर येथील स्मशानभूमीत काही जण एका व्यक्तीच्या अंत्यसंस्कारांसाठी आले होते. पाऊस पडत असल्याने लोकांनी स्मशानातील शेडचा आधार घेतला होता. मात्र त्याचदरम्यान या शेडचे छप्पर अचानक कोसळले आणि त्याखाली अनेकजण दबले गेले. 17 ते 18 जण जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, उखलारसी गावातील एका व्यक्तीचा मृतदेह अंत्यसंस्कारांसाठी आणण्यात आला होता. या मृतदेहावर अंत्यसंस्कार सुरू असताना उपस्थित लोकांनी छताखाली आश्रय घेतला होता. त्याचवेळी स्मशानमधील शेडचे छप्पर कोसळून सुमारे 20 ते 25 जण त्याखाली अडकले. यामधील 8 जणांचा घटनास्थळीच मृत्यू झाला. जखमींनी रुग्णालयात दाखल करण्यात आले असून मृतांची संख्या आता 25 वर पोहोचली आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

पंतप्रधान नरेंद्र मोदींनी या घटनेवर
दु:ख व्यक्त केलं आहे. उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दुर्घटनेस जबाबदार असलेल्यांवर कडक कारवाई करण्याचे आदेश दिलेले आहेत. तसेच उत्तर प्रदेश सरकारकडून या दुर्घटनेत मृत्यू झालेल्यांच्या कुटुंबास दोन लाख रुपये मदतीची घोषणा करण्यात आली आहे.

गाझियाबादला मेरठशी जोडणाऱ्या राष्ट्रीय महामार्गावर संतप्त झालेल्या मृतांच्या नातेवाईकांनी मृतदेह ठेवून रास्ता रोको केला आहे. यामुळे महामार्गाच्या दुतर्फा वाहनांच्या रांगा लागलेल्या आहेत. पोलीस प्रशासन नातेवाईकांची समजूत काढण्याचा प्रयत्न करत आहेत. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.

* एनडीआरएफटीने केला धक्कादायक खुलासा

धक्कादायक बाब म्हणजे स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर हे काही महिन्यांपूर्वीच नव्याने बांधण्यात आलं होतं. एनडीआरएफटीने याबाबत माहिती देताना धक्कादायक खुलासा केला आहे. स्मशानभूमीच्या शेडचे छप्पर कोसळण्यामागचं कारण सांगितलं आहे.  चार महिन्यांपूर्वीच नवीन छप्पर बांधण्यात आलं होतं. छत बांधण्यासाठी वापरण्यात आलेलं सामान हे अत्यंत निकृष्ट दर्जाचं होतं. त्यामुळे ही दुर्घटना घडल्याचं सांगितलं आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #गाझियाबाद #दुर्घटनेतील #मृतांचा #आकडा #गेला25वर #तिघांना #अटक
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शेतकरी मागणीला पाठिंबा, कृषी कायद्यांचा रिलायन्स कंपनीला फायदा नाही
Next Article काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदासाठी रस्सीखेच, सहा नेत्यांची नावे चर्चेत

Latest News

Κουλοχέρηδες και Καθιστικά Παιχνίδια στο Malina Casino: Ολοκληρωμένη Συλλογή Καζίνο
Top News November 3, 2025
Türkiye’deki Kraken Casino’da Ödeme Yöntemleri
Top News November 3, 2025
Vincispin Casino – Genießen Sie die top Online-Spiele zur Unterhaltung oder um Geld
Top News November 3, 2025
Wildfortune Casino – Trusted, Authorized, and Always Thrilling
Top News November 3, 2025
Test uw geluk en win enorme jackpots bij Kansino Casino
Top News November 3, 2025
Need for Spin Casino – Gut spielen, sich wohl fühlen, equitably gewinnen
Top News November 3, 2025
Is it Safe to Deposit at Weiss Casino?
Top News November 3, 2025
Παίξτε πιο έξυπνα, κερδίστε πιο και απολαύστε περισσότερα στο Corfu Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?