नवी दिल्ली : छत्तीसगडच्या अंबिकापूर नगर पालिकेने गार्बेज कॅफे सुरु केलं आहे. या कॅफेमध्ये पैसे दिल्यावर नव्हे तर एक किलो प्लास्टिक दिल्यावर जेवणाची थाळी मिळते. तर अर्धा किलो प्लास्टिक दिल्यावर नाश्ता मिळतो. नंतर या प्लास्टिकची रिसायकलिंग केली जाते. प्लास्टिकचा कचऱ्याने पावसाळ्यात अडचणी निर्माण होऊ नयेत, म्हणून प्लास्टिक गोळा करण्याचा नगर पालिकेने हा अभिनव मार्ग निवडला आहे.
'डोमिनोज' पिझ्झा कंपनीचा डेटा लिक, कोट्यवधी ग्राहकांचे कार्ड डिटेल्स उघड, जगभरातील २८५ शहरांमध्ये डोमिनोजचे आउटलेट्सhttps://t.co/SxqxrOjMez
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
अंबिकापूरमध्ये दोन वर्षापूर्वी एक ‘गार्बेज कॅफे’ सुरू झालं. विशेष म्हणजे अंबिकापूर नगर पालिकेने हे गार्बेज कॅफे सुरू केलं. या कॅफेमध्ये पैसे दिल्यावर नव्हे तर एक किलो प्लास्टिक दिल्यावर जेवणाची थाळी मिळते. तर अर्धा किलो प्लास्टिक दिल्यावर नाश्ता मिळतो. गोरगरीबांना जेवणाची सोय व्हावी म्हणून ही योजना राबवण्यात येत आहे.
या प्लास्टिकची रिसायकलिंग केली जाते. प्लास्टिकचा कचरा नष्ट व्हावा आणि त्यामुळे पावसाळ्यात अडचणी निर्माण होऊ नयेत म्हणून प्लास्टिक गोळा करण्याचा नगर पालिकेने हा अभिनव मार्ग निवडला आहे. तसेच गोळा केलेल्या प्लास्टिकचा उपयोग रस्ता बनविण्यासाठी करण्यात येत आहे. अंबिकारपूरचा हा प्रयोग अभ्यासाचा विषय झाला आहे. तसेच हा प्रयोग आता देशभर अनेक ठिकाणी राबवला जात आहे.
राजीव सातव यांच्या मृत्यूची चौकशी होणार ? https://t.co/O3PpI4L81X
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध
पर्यावरणाचं संरक्षण करण्यासाठी आणि शहराला प्लास्टिक मुक्त करण्यासाठी गार्बेज कॅफे सुरू करण्यात आलं आहे. या प्लास्टिकच्या माध्यमातून रोड बांधण्यात आला आहे. या योजनेमुळे शहर प्लास्टिक मुक्त करण्यात मोठी मदत मिळेल, असं अंबिकापूरचे महापौर अजय तिर्की यांनी सांगितलं.
" आम्ही राष्ट्रवाद गंगेत मुडद्याच्या रुपात तरंगताना पाहिलाय" https://t.co/HKY6ps1h4b
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021
* 8 लाख प्लास्टिकच्या माध्यमातून एक रस्ताही बनविला
राज्य सरकारने अंबिकापूरमध्ये ‘गार्बेज कॅफे’साठी सुरुवातीला पाच कोटींची तरतूद केली होती. जे लोक प्लास्टिक गोळा करतात, अशा बेघरांना राहण्यासाठी जागा देण्याचीही त्यात तरतूद आहे. तसेच गोळा केलेल्या प्लास्टिकपासून नगरपालिकेने रस्ते बनविण्याचे कामही हाती घेतले आहे. 8 लाख प्लास्टिकच्या माध्यमातून नगर पालिकेने एक रस्ताही बनविला आहे. प्लास्टिक आणि असल्फेटच्या मिश्रणातून हा रस्ता बनविण्यात आला आहे. इतर रस्त्यांपेक्षा प्लास्टिकपासून बनविण्यात आलेला हा रस्ता दीर्घकाळ टिकत असल्याचंही सूत्रांनी सांगितलं.
सोलापुरात 132 म्युकर मायकोसिस रुग्ण, 30 जणांनी केली मात, आठ मृत्यू https://t.co/YvFqIwfJnr
— Surajya Digital (@SurajyaDigital) May 23, 2021