Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: चिंचोळी पॉवरग्रेडजवळ दुचाकीच्या धडकेने आईसोबत थांबलेली ९ वर्षाची बालिका ठार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsगुन्हेगारीसोलापूर

चिंचोळी पॉवरग्रेडजवळ दुचाकीच्या धडकेने आईसोबत थांबलेली ९ वर्षाची बालिका ठार

Surajya Digital
Last updated: 2021/11/22 at 3:04 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

सोलापूर : वडिलांची दुचाकी पंक्चर झाल्यामुळे आईसोबत रस्त्यावर थांबलेली नऊ वर्षाची बालिका वेगाने जाणाऱ्या दुचाकीच्या धडकेने गंभीर जखमी होऊन मरण पावली. हा अपघात रविवारी (ता. २१) सकाळी ११ वाजेच्या सुमारास अक्कलकोट रोडवरील चिंचोळी पॉवरग्रेड जवळ घडला.

श्रुती मडोळप्पा माकणे (वय ९ वर्षें  रा. शेळगी, शिवगंगा नगर सोलापूर) असे मयत झालेल्या मुलीचे नाव आहे. ती आज सकाळी आई-वडील आणि लहान भावासोबत अक्कलकोट येथे आत्याच्या घरी कार्यक्रमासाठी निघाली होती. चिंचोळी जवळ वडिलांची दुचाकी पंक्चर झाली त्यामुळे वडिलांनी श्रुती तिची आई ( महादेवी) आणिभाऊ ( सोमनाथ) यांना पॉवर ग्रेड जवळ थांबवून पंक्चर काढण्यासाठी गेले होते.

त्यावेळी सोलापूरहून अक्कलकोटच्या दिशेने जाणारी दुचाकी वेगाने येऊन धडकल्याने  श्रुती माखणे ही गंभीर जखमी झाली. तिला त्वरीत अश्विनी त्यानंतर सोलापुरातील खाजगी रुग्णालयात दाखल केले असता ती दुपारच्या सुमारास मरण पावली. श्रुती माखणे ही तिसरी इयत्तेत शिकण्यास होती. तिचे वडील हे दर्शनाळ येथे शेती करतात.

मयत श्रुतीच्या पश्चात आई-वडील आणि एक भाऊ असा परिवार आहे. या अपघाताची प्राथमिक नोंद तालुका पोलिसात झाली. सहाय्यक फौजदार ज्योतिबा पवार हे करीत आहेत.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

* हिरज येथे तरुणाची गळफास घेऊन आत्महत्या

सोलापूर – हिरज ( ता.उत्तर सोलापूर) येथे राहणाऱ्या आकाश महादेव शिंदे (वय १९) या तरूणाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केली. ही घटना रविवारी (ता. २१) दुपारच्या सुमारास घडली.

रविवारी दुपारी दोन वाजेच्या सुमारास त्यांचा मृतदेह घरातील छताच्या लोखंडी अँगलला दोरीने गळफास घेतलेल्या अवस्थेत आढळून आला. त्याच्या पश्चात आई-वडील आणि एक बहीण असा परिवार आहे. तो मजुरी करीत होता. या घटनेची नोंद तालुका पोलिसात झाली असून या मागचे कारण समजले नाही. हवालदार सावळे पुढील तपास करीत आहेत.

* दर्गनहळळी येथे ट्रॅक्टरच्या धडकेने पादचारी ठार

सोलापूर – वेगाने जाणाऱ्या ऊस वाहतूक करणाऱ्या ट्रॅक्टरच्या धडकेने पादचारी इसम ठार झाला. हा अपघात दर्गनहळळी (ता. दक्षिण सोलापूर) येथे शनिवारी (ता. २०) रात्री दहा वाजेच्या सुमारास घडला.

प्रदीप धुळप्पा दुपारगुडे (वय ४२ रा. दर्गनहळ्ळी) असे मयताचे नाव आहे. ते काल रात्री गावात शौचासाठी गेले होते. तेथून परत येत असताना ट्रॅक्टरच्या धडकेने ते गंभीर जखमी झाले. त्यांना शासकीय रुग्णालयात दाखल केले असता ते उपचारापूर्वीच मयत झाले. या अपघाताची प्राथमिक  नोंद तालुका पोलिसात झाली आहे.

You Might Also Like

राष्ट्रवाद आणि राष्ट्रीय सुरक्षेचे मुद्दे राजकीय पक्ष व हितसंबंधांच्या पलीकडील – उपराष्ट्रपती

सोलापूर जिल्ह्यासाठी वरदायिनी असलेल्या उजनी धरणात 50 टक्के पाणीसाठा

सोलापूर-दिल्ली विमानसेवा नोव्हेंबरपासून सुरू होणार

मोहोळ तालुक्‍यातील लांबोटी येथे पोलिसांच्या चकमकीत सराईत गुन्हेगार ठार

सोलापूर – गाडीतून पडून भाजीपाला विक्रेत्याचा दुदैवी मृत्यू

TAGGED: #girl #killed #hit #bytwo-wheeler #Chincholi #Powergrade, #चिंचोळी #पॉवरग्रेड #दुचाकी #धडक #आई #९वर्षाची #बालिका #ठार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article आपला शेवटचा टी-20 सामना चेन्नईत व्हावा – धोनी
Next Article केंद्र सरकारचा नव्या वर्षात वस्त्रोद्योगाला हादरा, 5 वरुन थेट 12 टक्के जीएसटीत वाढ

Latest News

संत तुकाराम महाराजांच्या पालखी प्रस्थान सोहळ्याला मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रारंभ
महाराष्ट्र June 18, 2025
केदारनाथ मार्गांवर जंगलछट्टीजवळ दरड कोसळल्याने दोघांचा मृत्‍यू, तीन जखमी
देश - विदेश June 18, 2025
आंध्रप्रदेश : गजरला रवीसह 3 जहाल नक्षलवादी ठार
महाराष्ट्र June 18, 2025
अकोला : अल्पवयीन मुलीवर अत्याचार
महाराष्ट्र June 18, 2025
नाशिकरोड-द्वारका उड्डाणपुलाचा मार्ग होणार मोकळा, खासदार वाजेंच्या मागणीला यश
Top News June 18, 2025
हैदराबाद : विमानतळावर बॉम्ब स्फोटाची धमकी
देश - विदेश June 18, 2025
निराधार बालकांना मिळणार आधार; बेवारस मुलांना मिळणार सन्मानाची ओळख
महाराष्ट्र June 18, 2025
भारत सरकार शिष्यवृत्ती योजनेच्या शिष्यवृत्तीने दिलं स्वप्नांना बळ
महाराष्ट्र June 18, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?