Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: अपहरण, खंडणीप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजनांसह २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्रगुन्हेगारीराजकारण

अपहरण, खंडणीप्रकरणी माजी मंत्री गिरीश महाजनांसह २९ जणांविरुद्ध गुन्हा दाखल

Surajya Digital
Last updated: 2021/01/06 at 12:08 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

पुणे : जळगावमधील एक शैक्षणिक संस्था ताब्यात घेण्यासाठी संबंधित संस्थेच्या संचालकाचे अपहरण करून त्यास डांबून ठेवत मारहाण करीत पाच लाखांची खंडणी घेण्यात आली. याप्रकरणी भाजप नेते व माजी मंत्री गिरीश महाजन यांच्यासह जळगावमधील २९ जणांविरुद्ध कोथरूड पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. संबंधित प्रकरणात महाजन यांची भूमिका तपासणार असल्याचे पोलिसांनी स्पष्ट केले.

संस्थेचे राजीनामे देण्यासाठी हा प्रकार घडला असल्याचे तक्रारीत नमूद केले आहे. गिरीश महाजन, तानाजी भोईटे, निलेश भोईटे, वीरेंद्र भोईटे यांच्यासह २८ जणांवर गुन्हा दाखल झाला आहे. अ‍ॅड. विजय पाटील (वय ५२) यांनी फिर्याद दिली आहे.

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, अ‍ॅड. विजय हे वकिल असून जळगाव मराठा विद्याप्रसारक सहकारी समाज मर्यादित संस्थेचे संचालक आहेत. जानेवारी २०१८ पासून अ‍ॅड. पाटील आणि गिरीश महाजनांसह या सर्वांसोबत वादविवाद सुरू आहेत. काही महिन्यांपूर्वी या सर्वांनी संस्थेची कागदपत्रे देण्याच्या बहाण्याने अ‍ॅड. पाटील यांना पुण्यात बोलावून घेतले. त्यानंतर त्यांना शिवीगाळ करत दमदाटी करून जबरदस्तीने मोटारीत बसवून सदाशिव पेठेतील एका फ्लॅटवर नेले.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

त्याठिकाणी आरोपींनी त्यांचे हात-पाय बांधून डांबून ठेवले. त्यांना मारहाण करत पोटाला चाकू लावला. अ‍ॅड. पाटील यांच्यासोबत असलेल्यांना आरोपींनी डांबून ठेवले. त्यानंतर सर्व संचालकांचे राजीनामे आणले नाही तर एमपीडीएच्या गुन्ह्यात अडकवण्याची धमकी देत आरोपींनी त्यांच्याकडून ५ लाख रुपयांची खंडणी घेतली.

त्यानंतर आरोपींनी जळगाव येथे जाऊन त्यांच्या संस्थेत शिरून तोडफोड केली. त्यांच्या खिश्यातील पैसे आणि सोन्याचे दागिने लुटल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणाचा तपास सहायक पोलीस आयुक्त चव्हाण करीत आहेत.

* गिरीश महाजनांची प्रतिक्रिया

राजकीय आकसातून आपल्यावर गुन्हा दाखल करण्यात आला असून त्याचा बोलविता धनी कोण ? हे सर्वांना माहिती असल्याची प्रतिक्रिया माजी मंत्री गिरीश महाजन यांनी दिली आहे. गिरीश महाजन यांनी आरोपांचा साफ इन्कार केला आहे. याप्रसंगी आ. महाजन म्हणाले की, तीन वर्षांपूर्वीची ही घटना आहे. तीन वर्षांमध्ये अ‍ॅड. विजय भास्कर पाटील यांना माझ्याविरोधात गुन्हा दाखल करावा वाटला नाही. ते स्वत: मोठे वकील आहेत. तरीही त्यांनी माझ्यासह ३० जणांविरोधात गुन्हा दाखल केला आहे. त्यामुळे हा गुन्हा दाखल करण्यामागचा त्यांचा हेतू स्पष्ट होतो. या घटनेची सखोल चौकशी व्हावी म्हणून मी स्वत: उच्च न्यायालयात धाव घेतली आहे. हा गुन्हा कुठे घडला? कधी घडला? ज्यांना मारहाण करण्यात आली ते लोक त्यावेळी कुठे होते? त्यांचे फोन ट्रॅक करा, अशी मागणी मी कोर्टाकडे केली आहे. त्यामुळे सत्य बाहेर पडेल.

You Might Also Like

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द

बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच

शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप

TAGGED: #अपहरण #खंडणीप्रकरणी #माजीमंत्री #गिरीशमहाजनांसह #२९जणांविरुद्ध #गुन्हा #दाखल
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article पंचगंगा प्रदूषित करणा-या कंपन्यांना ठोका टाळे, ठाकरे सरकारचा निर्णय
Next Article थकित एफआरपीमुळे सांगलीत साखर कारखान्याचे कार्यालय पेटवले

Latest News

Как чувство риска помогает почувствовать себя энергичным
Top News December 16, 2025
Почему мы нравится мониторить за чартами
Top News December 16, 2025
По какой причине человекам приятно следить за процессом чужим опасностью
Top News December 16, 2025
Genießen Sie die handheld App von Spingranny Casino für Casino-Spiele in Deutschland
Top News November 3, 2025
Lemon Casino – Word nu lid en spin voor levensveranderende prijzen
Top News November 3, 2025
Kifizetések és befizetések a Shuffle Játékteremben Magyarországon
Top News November 3, 2025
Kraken Casino – Türkiye Oyuncuları İçin Premium Bir Çevrimiçi Casino
Top News November 3, 2025
Spielen Sie Live-Spiele und erzielen Sie sofort über das Spingranny Casino
Top News November 3, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?