Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कोरोना लस द्या – राकेश टिकैत
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेश

दिल्लीत आंदोलन करणाऱ्या शेतकऱ्यांनाही कोरोना लस द्या – राकेश टिकैत

Surajya Digital
Last updated: 2021/03/19 at 8:15 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

नवी दिल्ली : दिल्लीत नव्या कृषी कायद्यांविरोधात गेल्या शंभर दिवसांहून अधिक दिवस झाले आंदोलन सुरु आहे. तेथे हजारो आंदोलक एकत्र राहत आहेत. कोरोना पुन्हा वाढत आहे. यामुळे या आंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस द्यावी, अशी मागणी शेतकरी नेते राकेश टिकैत यांनी केली आहे. दरम्यान, पंतप्रधान मोदींसह देशातील अनेक नेत्यांनी कोरोना लस घेतली आहे.

We demand that those who are protesting here should be given the COVID19 vaccine. I will also take the vaccine shot:
Rakesh Tikait, spokesperson, BKU, at Gazipur border pic.twitter.com/AH2dSrWeEX

— ANI (@ANI) March 18, 2021

आताच्या घडीला देशात कोरोना लसीकरणाचा दुसरा टप्पा सुरू आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासह देशभरातील अनेक नेते, मंत्री यांनी कोरोना लस घेतली आहे. तर दुसरीकडे गेल्या १०० दिवसांपासून दिल्लीच्या सीमांवर वादग्रस्त कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. या पार्श्वभूमी शेतकरी आंदोलकांचे नेते आणि भारतीय किसान युनियनचे राष्ट्रीय प्रवक्ते राकेश टिकैत यांनी आंदोलक शेतकऱ्यांना कोरोना लस देण्याची मागणी केली आहे.

* मीही कोरोना लस घेईन

शेतकरी आंदोलन करत असलेल्या स्थळांवर करोनासंदर्भातील नियम, सोशल डिस्टन्सिंग, मास्क यांविषयी चिंता व्यक्त केली जात असताना आता थेट आंदोलक शेतकऱ्यांकडून कोरोना लस देण्याविषयी मागणी करण्यात आली आहे. आंदोलन स्थळावर असलेल्या शेतकऱ्यांना कोरोनाची लस देण्यात यावी. मीही कोरोना लस घेईन, असे राकेश टिकैत यांनी म्हटले आहे.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

हजारोंच्या संख्येने शेतकरी आंदोलक एकाच ठिकाणी असल्यामुळे या आंदोलकांना कोरोनाची लस देण्याची मागणी राकेश टिकैत यांनी केली आहे. करोना पुन्हा वाढू लागला आहे. कोरोना त्यासंदर्भात देण्यात आलेल्या मार्गदर्शक सूचना पाळल्या गेल्या पाहिजेत. जी लोकं आंदोलनस्थळी बसले आहेत, त्यांनाही कोरोना लस दिली गेली पाहिजे. मी स्वत:देखील कोरोना लस घेईन. आंदोलन स्थळावर आम्ही सोशल डिस्टन्सिंगचं पालन करत आहोत. आंदोलक शेतकऱ्यांप्रमाणे कारागृहात बंद असलेल्या कैद्यांनाही कोरोनाची लस दिली गेली पाहिजे, असे राकेश टिकैत यांनी सांगितले.

* कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे नाही

वादग्रस्त कृषी कायद्यासंदर्भात शेतकरी नेते, प्रतिनिधी आणि सरकार यांच्यातील चर्चेच्या अनेक फेऱ्या निष्फळ ठरल्या असून, केंद्र सरकारने पारित केलेले कृषी कायदे रद्द केल्याशिवाय आंदोलन मागे न घेण्याच्या निर्णयावर शेतकरी ठाम आहेत. कृषी कायदे मागे घेतले जाणार नाही. शेतकऱ्यांनी सुधारणा सूचवाव्यात. त्यानुसार कायद्यात दुरुस्ती केली जाईल, यावर केंद्र सरकार ठाम आहे. सरकारकडून चर्चेची द्वारे अद्यापही खुली आहेत. शेतकरी नेते, प्रतिनिधींनी चर्चेसाठी यावे, असे आवाहनही अनेकदा करण्यात आले आहे.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

TAGGED: #Givecorona #vaccine #agitating #farmers #inDelhi #RakeshTikait, #दिल्लीत #आंदोलन #करणाऱ्या #शेतकऱ्यांनाही #कोरोना #लसद्या #राकेशटिकैत
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article रोहित पवार, प्रवीण दरेकरांच्या भेटीने चर्चांना उधाण; नवे समीकरण?
Next Article एलआयसीचा मोठा निर्णय! कोट्यावधी ग्राहकांना दिलासा

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?