Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘आगे बडो, मराठा आरक्षण मिळेपर्यंत मागे हटायचं नाही’
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

‘आगे बडो, मराठा आरक्षण मिळेपर्यंत मागे हटायचं नाही’

Surajya Digital
Last updated: 2021/07/21 at 10:54 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

सोलापूर  : पोलिसांचा विरोध दडपशाही ,  राज्य शासनाचे दडपण असतानादेखील सोलापुरातील मोर्चा तुम्ही यशस्वी केलात. यापुढे घटना दुरुस्ती विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण   मिळवण्यासाठी लढाईला तयार राहा, असे  सूचक वक्तव्य मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक अनंत जाधव यांना माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणीस यांनी केले.

लोकसभेच्या अधिवेशनात 102 व्या घटना दुरूस्तीचे विधेयक आणून मराठा समाजाला आरक्षण मिळवण्यासाठी केंद्र सरकारकडे पाठ पुरावा करा, अशी मागणी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयक राम जाधव, किरण पवार यांच्याकडून माजी मुख्यमंत्री तथा विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडे निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी  जाधव यांच्याकडे पाहून  सूचक वक्तव्य केले.

मराठा क्रांती मोर्चाच्या वतीने सोलापूरमध्ये मराठा आक्रोश मोर्चा काढण्यात आला. या मोर्चाचे फलित म्हणून सरकारने मराठा आरक्षणासाठी प्रयत्न करावेत, यासाठी मराठा क्रांती मोर्चाचे समन्वयकांना देवेंद्र फडणवीस यांनी मुंबईत बोलावून चर्चा केली. या चर्चेत केंद्रातील मोदी सरकारने सध्या सुरू असलेल्या संसदीय अधिवेशनात 102 वी घटना दुरूस्तीचा विषय घ्यावा,

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

केंद्रीय कायदा मंत्र्यांनी घटनादुरूस्तीबाबत स्पष्टीकरण देवून मराठा समाजाच्या आरक्षणासाठीचा मार्ग मोकळा करावा तसेच पंजाबराव देशमुख वसतीगृह योजनेबाबत संपूर्ण महाराष्ट्रात मराठा विद्यार्थ्यांसाठीचे वसतीगृह जिल्हाधिकारी किंवा तत्सम अधिकाऱ्यांच्या माध्यमातून चालवण्याबाबत येत्या अधिवेशनात मागणी करावी, आंदोलनादरम्यान मराठा युवकांवर दाखल झालेले गुन्हे रद्द व्हावेत याबाबत चर्चा झाली.

अण्णासाहेब पाटील महामंडळाचे माजी अध्यक्ष नरेंद्र पाटील यांच्या नेतृत्वाखाली झालेल्या सोलापूरमधील मराठा आक्रोश मोर्चा सरकार आणि पोलीसांनी हाणून पाडण्याचा प्रयत्न केला, परंतु नरेंद्र पाटील, शहाजी पवार, अनंत जाधव आणि मोर्चाच्या समन्वयकांनी अत्यंत कौशल्याने मराठा आक्रोश मोर्चा यशस्वी करून दाखवला, याबद्दल देवेंद्र फडणवीस यांनी कौतुक केले. अनंत जाधव यांना म्हणाले, लढायला तयार रहा, आगामी निवडणुकीत सोलापूर महानगर पालिका आपल्याला ताब्यात ठेवायची आहे. त्याप्रमाणे काम केले पाहिजे असेही देवेंद्र फडणवीस म्हणाले.

माजी नगरसेवक अनंत जाधव यांनी मराठा समाजाला आरक्षण मिळावे याबाबत तसेच सोलापूरमधील विविध विकास कामांच्या बाबत आणि आगामी सोलापूर महानगर पालिकेच्या निवडणुकीबाबत देवेंद्र फडणवीस यांच्याशी चर्चा केली. कोरोनावर नियंत्रण मिळवण्यासाठी सोलापूरला मोठ्या प्रमाणात लस उपलब्ध करून देण्यासाठी केंद्र तसेच राज्य शासनाकडे मागणी करावी, अशा मागण्या जाधव यांनी केल्या.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #Goahead #don'tback #down #Maratha #reservation, #आगेबडो #मराठाआरक्षण #मिळेपर्यंत #मागेहटायचं
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article उजनीत ८ हजार ४०० क्युसेक्सने पाणी येण्यास सुरुवात
Next Article चिपळूणमध्ये पावसाचा कहर, 5 हजार लोक अडकले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?