Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: ‘गो कोरोना, कोरोना गो’च्या घोषणा देणारे केंद्रीय मंत्री आठवलेंना कोरोनाची बाधा
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsदेश - विदेशमहाराष्ट्र

‘गो कोरोना, कोरोना गो’च्या घोषणा देणारे केंद्रीय मंत्री आठवलेंना कोरोनाची बाधा

Surajya Digital
Last updated: 2020/10/27 at 3:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : ‘गो करोना चा’ प्रसिध्द नारा देणारे केंद्रीय राज्यमंत्री रामदास आठवले यांना कोरोनाची बाधा झाली आहे.  सध्या त्यांना कोरोनाची कोणतीही लक्षणं नाहीत. खबरदारीचा उपाय म्हणून चार दिवस खासगी रुग्णालयात दाखल होण्याचा निर्णय त्यांनी घेतला आहे.

रामदास आठवले यांनी माझ्या संपर्कात जे लोक आले आहेत त्यांनी कोरोनाची चाचणी करुन घ्यावी, असं आवाहनही केलं आहे. कोरोनाची साथ नव्यानेच आली होती, तेव्हा ‘गो कोरोना कोरोना गो’ अशी घोषणा दिल्याने रामदास आठवले हे चांगलेच चर्चेत आले होते. मुंबईतील नरीमन पॉईंट या ठिकाणी त्यांनी या घोषणा त्यावेळी दिल्या होत्या. आता रामदास आठवलेंना कोरोनाने गाठलं आहे. खबरदारीचा उपाय म्हणून ते खासगी रुग्णालयात दाखल झाले आहेत.

कालच त्यांच्या उपस्थितीत आभिनेत्री पायल घोषने आरपीआयत प्रवेश केला.

तुमच्या हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वरही उपलब्ध

रामदास आठवले यांना कोरोनाची लक्षणे नाहीत. कार्यकर्त्यांनी व चाहत्यांनी काळजी करू नये असं आवाहन करण्यात आलं आहे.  वैद्यकीय सल्ल्यानुसार मुंबईत एका खासगी रुग्णालयात चार दिवसांसाठी दाखल होणार आहेत. रिपब्लिकन पक्षाचे आणि शासकीय बैठकांचे नियोजित सर्व कार्यक्रम रद्द करण्यात आले असल्याचे रिपाइंच्या वतीने अधिकृत प्रसिद्धी पत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे.

‘गो करोना चा’ प्रसिध्द नारा देणारे केंद्रिय राज्यमंत्री रामदास आठवले हे झुंझार लढाऊ संघर्ष नायक आहेत. ते करोनावर मात करून नक्की बरे होतील अशी प्रार्थना चाहत्यांची असून ना रामदास आठवले यांच्या पाठीशी पुण्यबळ आहेत. गरिबांचे आशीर्वाद त्यांचे रक्षण करतील. ते करोनावर मात करून पुन्हा गोरगरिबांच्या बहुजनांच्या देशाच्या सेवेत हसतमुखाने हजर राहतील अशी प्रार्थना लाखो चाहत्यांनी व्यक्त केली आहे.

You Might Also Like

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन

राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी

अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन

देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली

अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे

TAGGED: #गोकोरोनागो #घोषणा #रामदासआठवले #केंद्रीयमंत्री #कोरोना #बाधा
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article मी थकून गेलोय, सरकारने ताबडतोब पावलं उचलावीत; सरकारी वकिलावर पूर्ण विश्वास पण गैरहजर
Next Article मराठा आरक्षण स्थगितीवरील सुनावणी चार आठवड्यांसाठी पुढे ढकलली

Latest News

प्रधानमंत्री आवास योजना (ग्रामीण) अंतर्गत लाभार्थी मेळाव्याचे आयोजन
महाराष्ट्र May 31, 2025
राजधानीत अहिल्यादेवी होळकर यांची जयंती साजरी
देश - विदेश May 31, 2025
अहिल्यादेवी होळकर यांना जन्मत्रिशताब्दीनिमित्त राज्यपालांचे अभिवादन
महाराष्ट्र May 31, 2025
देशात कोरोना रुग्णांची संख्या 2710 झाली
देश - विदेश May 31, 2025
अतिवृष्टी बाधित गावे मदतीपासून वंचित राहणार नाहीत याची दक्षता घ्या – जयकुमार गोरे
महाराष्ट्र May 31, 2025
शेतकऱ्यांच्या सुचनांना प्राधान्य – कृषीमंत्री
महाराष्ट्र May 31, 2025
महिलांनो, एसटी प्रवासात मोबाइल व दागिन्यांची घ्या विशेष काळजी
महाराष्ट्र May 31, 2025
नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना तातडीने भरपाई देणार – पालकमंत्री बावनकुळे
महाराष्ट्र May 31, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?