Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ५२ हजारांवर; सरकारने आयात शुल्क वाढवले
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
अर्थाअर्थ

कमॉडिटी बाजारात सोन्याचा भाव ५२ हजारांवर; सरकारने आयात शुल्क वाढवले

Surajya Digital
Last updated: 2020/07/28 at 8:05 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

मुंबई : देशांतर्गत कमॉडिटी बाजारात आज मंगळवारी सोन्याच्या भावात ०.४ टक्के वाढ झाली आहे. सोने १३२ रुपयांनी वधारले आणि सोन्याचा भाव ५२ हजार ३३२ रुपयांवर गेला आहे. चांदी देखील महागली असून त्यात १.८ टक्के वाढ झाली आहे. सध्या चांदीचा एक किलोचा भाव ६६ हजार ७२६ रुपये झाला आहे. चांदीचा मागील आठ वर्षांत सर्वाधिक दर आहे.

(तुमचे हक्काचे ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, शेअरचॅट आणि टेलिग्रामवरही उपलब्ध)

कमॉडिटी विश्लेषकांच्या मते नजीकच्या काळात सोन्याचा भाव ५२६६० ते ५२९०० च्या दरम्यान राहील. सोमवारी सोन्यात मोठी वृद्धी झाली होती. Goodreturns या वेबसाईटनुसार मुंबईत २२ कॅरेट सोन्याचा भाव १० ग्रॅमला ५०६६० रुपये आहे. तर २४ कॅरेटचा भाव ५१६६० रुपये आहे. दिल्लीत २२ कॅरेट सोने ५०८१० रुपये असून २४ कॅरेट ५२०१० रुपये आहे. चेन्नईत २२ कॅरेटसाठी ४९७९० रुपये तर २४ कॅरेटसाठी ५४३१० रुपये भाव आहे. कोलकात्यात २२ कॅरेट सोन्याचा भाव ५१०६० रुपये असून २४ कॅरेट साठी ५२४६० रुपये आहे.

* आयात शुल्कात वाढ

सोन्याच्या किमतीत चालू वर्षात २८ टक्के वाढ झाली आहे. सोने खरेदीमध्ये भारत हा जगातील मोठा ग्राहक देश आहे. त्यामुळे देशात सोन्याची मोठ्या प्रमाणात आयात केली जाते. मात्र सोने आयातीने वित्तीय तूट वाढत असल्याने सरकारने सोन्यावर आयात शुल्क वाढवलं आहे. सोन्यावर १२.५ टक्के आयात शुल्क आकारले जाते. याशिवाय सोन्यावर ३ टक्के जीएसटी ग्राहकाला द्यावा लागतो. त्यामुळे सोन्याची प्रत्यक्ष किंमत ही बाजारभावापेक्षा जास्त असते. दरम्यान, सोन्याच्या उच्चांकी किमतींचा मागणीवर परिणाम झाला आहे. मागील काही दिवसांत सोन्याची मागणी कमी झाल्याचे दिसून आले आहे.

You Might Also Like

Budget 2024 | 5 वर्षांत ग्रामीण भागात 2 कोटी घरे बांधली जाणार

बजेट ब्रेकिंग – 7 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांना टॅक्स नाही

Ed action mobile company लोकप्रिय मोबाईल कंपनीवर ईडीची कारवाई; 5,551 कोटींची मालमत्ता जप्त

Corona / Reserve Bank कोरोना : आर्थिक नुकसानीवर मात करण्यासाठी भारताला २०३५ पर्यंत पहावी लागणार वाट

ठाकरे सरकार, मोदी सरकारची कर्मचाऱ्यांना भेट; महागाई भत्ता 3 टक्क्यांनी वाढवला

TAGGED: #कमोडिटी #सोने #आयात #शुल्क #सरकार
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article साथीदाराच्या मदतीने मुलानेच केला जन्मदात्या वडिलाचा खून; शिराळमधील संजय काळे खून प्रकरण
Next Article ‘रॅपिड अॅन्टीजन टेस्ट’चा निकाल चुकीचा येण्याची शक्यता; न्यायालयाने फटकारले

Latest News

विद्यार्थ्यांनी डॉ. आंबेडकरांचे विचार अंगीकारत ध्येय गाठावे – भूषण गवई
महाराष्ट्र August 2, 2025
शेतकरी क्रांती संघटनेचा उद्धव ठाकरे यांच्या शिवसेनेत विलय
देश - विदेश August 2, 2025
५२% सांडपाणी प्रक्रियाविनाच नदीपात्रात – पंकजा मुंडे
महाराष्ट्र August 2, 2025
दिलीप मालकांच्या उपस्थितीत जयकुमारांचा हिरवा झेंडा
सोलापूर August 2, 2025
सोलापुरात एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का; तब्बल 11 पदाधिकाऱ्यांचे राजीनामे
सोलापूर August 2, 2025
भारताच्या सहकार्याने नेपाळमध्ये पेट्रोलियम पाईपलाईनच्या विस्ताराचे काम सुरू
देश - विदेश August 2, 2025
नवीन वंदे मातरम रेल्वे सुरू करा – खा. भागवत कराड
देश - विदेश August 2, 2025
देवघरच्या बाबा बैद्यनाथ धाममध्ये ४४ लाखांहून अधिक भाविकांचे दर्शन
देश - विदेश August 2, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?