मुंबई, २ सप्टेंबर. देशांतर्गत सराफा बाजारात आज प्रचंड भाववाढ दिसून आली आहे. सोने आणि चांदी या दोन्ही चमकदार धातूंनी आज विक्रमी दर गाठले आहेत. किंमतींमध्ये झालेल्या या वाढीमुळे देशातील बहुतांश सराफा बाजारात २४ कॅरेट सोने आज प्रति १० ग्रॅम १,०६,०९० रुपये ते १,०६,२४० रुपयांच्या दरम्यान व्यवहारात आहे. तर २२ कॅरेट सोने ९७,२५० रुपये ते ९७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम या दरम्यान विकले जात आहे. सोनेप्रमाणेच चांदीच्या भावातही उसळी आल्याने सराफा बाजारात आज चांदीचा दर १,२६,१०० रुपये प्रति किलो इतका झाला आहे.
मुंबईत २४ कॅरेट सोन्याचा दर १,०६,०९० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोने ९७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम विकले जात आहे. तर दिल्लीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोने आज प्रति १० ग्रॅम १,०६,२४० रुपयांवर व्यवहारात असून, २२ कॅरेट सोन्याचा दर ९७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम इतका नोंदवला गेला आहे. अहमदाबादमध्ये २४ कॅरेट सोन्याची किरकोळ किंमत १,०६,१४० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोन्याची किंमत ९७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम इतकी आहे. चेन्नईत २४ कॅरेट सोने १,०६,०९० रुपये प्रति १० ग्रॅम आणि २२ कॅरेट सोने ९७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम इतक्या दराने विकले जात आहे. कोलकात्यातही २४ कॅरेट सोने १,०६,०९० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोने ९७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम इतक्या दराने व्यवहारात आहे.
लखनऊच्या सर्राफा बाजारात आज २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०६,२४० रुपयांवर आणि २२ कॅरेट सोने ९७,४०० रुपयांवर विकले जात आहे. पटना येथे २४ कॅरेट सोने १,०६,१४० रुपये प्रति १० ग्रॅम दराने उपलब्ध असून २२ कॅरेट सोन्याचा दर ९७,३०० रुपये प्रति १० ग्रॅम आहे. जयपूरमध्ये २४ कॅरेट सोन्याचा दर १,०६,२४० रुपये प्रति १० ग्रॅम, तर २२ कॅरेट सोने ९७,४०० रुपये प्रति १० ग्रॅम इतके आहे.
देशातील इतर राज्यांप्रमाणेच कर्नाटक, तेलंगणा आणि ओडिशाच्या सराफा बाजारातही आज सोन्याच्या भावात तेजी आहे. बेंगळुरू, हैदराबाद आणि भुवनेश्वर या तीनही राज्यांच्या राजधानीतील सराफा बाजारात २४ कॅरेट सोने प्रति १० ग्रॅम १,०६,०९० रुपये या दराने व्यवहारात असून, २२ कॅरेट सोने ९७,२५० रुपये प्रति १० ग्रॅम या दराने विकले जात आहे.