गोंदिया, 6 एप्रिल (हिं.स.)।
गोंदिया जिल्ह्याच्या गोरेगाव तालुक्यातील बबई येथे लग्न सोहळ्यातील जेवणामुळे 25 लोकांवर विषबाधा झाल्याने त्यांना गोरेगाव येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले असून या पंचवीस रुग्णांपैकी आठ चिमुकले बालक असून यात एक गरोदर माता सुद्धा आहे.
बबई येथील केशवराव बिसेन यांच्या मुलाचे लग्न वळद या गावात होते. वरात घेऊन येथे लग्न समारंभा करता गेले असता, परत बबई येथे वर वधू आले असता पाहुण्यांच्या जेवणाकरता बबई येथे जेवण ठेवण्यात आले होते. वराळी मंडळीला विषबाधा झाली. उलट्या झाल्याने, त्यातील 25 रुग्णांची प्रकृती खालवल्याने त्यांना गोरेगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले. यात आठ चिमुकल्या बालकांचा आणि एक गरोदर मातेच्या सुद्धा समावेश आहे. सध्या त्यांच्यावर उपचार सुरू असून प्रकृती स्थिर असल्याचे डॉक्टर सांगतात.