प्रतिनिधी
सांगोला: सांगोला महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीनं ‘चिमणी दिवस’ मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. यावेळी, पक्षीमित्र डॉ. विधीन कांबळे यांनी परिसरातील दुर्लक्षित पक्षी या विषयावर आपले अनुभव व्यक्त केले.
‘चिमणी दिन’ साजरा करण्याची कथा
जागतिक पर्यावरण संरक्षक आणि पर्यावरण प्रेमीकडून २० मार्च हा दिवस ‘जागतिक चिमणी दिवस’ म्हणून साजरा केला जातो. विकासाच्या नावाखाली निर्माण होत असलेली सिमेंटची जंगलं आणि मोठ्या प्रमाणावर केली गेलेली वृक्षतोड; या प्रमुख कारणांनी पर्यावरणाचं नुकसान तर होतच आहे. पण, त्याच बरोबर पर्यावरणीय परिसंस्थेमधील प्रजाती नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. यामध्ये प्रामुख्याने आपल्या सभोवताली असलेल्या विविध प्रकारच्या, विविध जातीच्या पक्षांचा समावेश असल्याचं पर्यावरणा प्रेमींच्या निदर्शनास आलं. यामध्ये, कोकीळ, पोपट, सुतारपक्षी, चिमणी यांसहित इतर पक्षांचा समावेश होता.
या समस्येवर उपाय करण्यासाठी, नाशिक शहरातील पक्षीमित्र मोहम्मद दिलावर यांच्या ‘नेचर् फॉरएव्हर सोसायटी ऑफ इंडिया’ NFS या संस्थेच्या माध्यमातून आणि ‘इको-सिस अॅक्शन फाऊंडेशन (फ्रान्स) यासह इतर आंतरराष्ट्रीय संस्था; ज्या, पर्यावरण संरक्षण आणि संवर्धनासाठी काम करतात. यांच्या सहकार्याने २०१० मध्ये ‘जागतिक चिमणी दिवस’ साजरा करण्याचा उपक्रम सुरू केला. तेव्हा पासून, दरवर्षी २० मार्च रोजी जागतिक स्तरावर ‘चिमणी दिवस’ साजरा केला जातो.
बातमीकडं फिरूया
पक्षीमित्र मोहम्मद दिलावर यांच्याप्रमाणेच, सांगोला महाविद्यालयातील जीवशास्त्र विभागाचे प्राध्यापक डॉ. विधीन कांबळे मागील १६ वर्षांपासून तालूका परिसरातील कायमस्वरूपी राहणारे पक्षी, स्थलांतरित पक्षी आणि पाहूणे पक्षी यांच्या संरक्षणासाठी विविध स्तरावर प्रयत्न करत आहेत.
यामध्ये निरीक्षण, पक्ष्यांच्या विविध जाती-जमातींचा आभ्यास, निरीक्षण आणि यातून मिळालेल्या अनुभवातून पक्षी संरक्षण करण्यासाठी जनजागृती करण्याचं काम डॉ. कांबळे करतात. त्यांच्या मदतीला शहरातील विविध सामाजिक संस्थेच्या माध्यमातून पर्यावरण प्रेमी असतात.
डॉ कांबळे यांच्या संकल्पनेतून सांगोला महाविद्यालय परिसरात चिमण्या आणि इतर पक्षांसाठी मानवनिर्मित घरटी तयार करून बसवण्यात आली होती. आणि डॉ. कांबळे यांचा हा प्रयोग यशस्वी झाला. आजही आपण महाविद्यालय परिसरात भेट दिली तर आपल्याला पक्षांनी गजबजलेली घरटी दिसतील आणि गजबजलेल्या घरट्यातून इवल्याशा चिमणंपाखरांचा आवाज नक्की ऐकायला मिळेल. हा अनुभव आपल्याला सुखद धक्का देणारा असेल हा ‘द न्यूज पॅटर्न’चा विश्वास आहे.
याचाच भाग म्हणून, गुरुवर दिनांक २० मार्च रोजी सांगोला महाविद्यालयातील प्राणिशास्त्र विभागाच्या वतीनं चिमणी दिवस साजरा करण्यात आला. आयोजित कार्यक्रमात शहरातील आपुलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष आणि जेष्ठ पत्रकार राजेंद्र यादव प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित होते. यावेळी, प्राध्यापक डॉ. प्रकाश बनसोडे, भाग प्रमुख डॉ. विजय गाडेकर, प्रभारी प्राचार्य डॉ. सुरेश भोसले आदी मान्यवर व्यासपीठावर उपस्थित होते.
“सांगोला तालुक्यात अनेक नागरिक विद्यार्थी पक्षी संवर्धनाचे कार्य करीत असल्यामुळे सांगोला तालुक्यात मोठ्या प्रमाणावर चिमण्यांचा वावर आढळून येतो प्राध्यापक डॉ. विधीना कांबळे यांच्या प्रयत्नामुळे व प्रेरणेने अनेक लोक पक्षी संवर्धनाच्या चळवळीत सहभागी होत आहेत. इतर युवकांनीही खऱ्या अर्थाने या चळवळीत सहभागी होण्याची गरज आहे. भविष्यासाठी पर्यावरण जतन करण्याची जबाबदारी आजच्या युवकांनी घेतली पाहिजे.
पक्षांची संवर्धन ही काळाची गरज असून ग दि माडगूळकर यांच्या कवितेतील ‘या चिमण्यांनो परत फिरा रे|घरा कडे अपुल्या जाहल्या तिनी सांजा.’ अशी सांज वेळ पक्षांच्या जीवनात येऊ नये त्यासाठी विद्यार्थी आणि सर्व नागरिकांनी पक्षी संवर्धनाचे कार्य केले पाहिजेत.”
-राजेंद्र यादव, अध्यक्ष, आपुलकी प्रतिष्ठान
“पक्षांची संख्या कमी झाल्यास कीटकांची संख्या वाढते व कीटकांच्या बंदोबस्त करण्यासाठी रासायनिक औषधांचा अथवा कीटकनाशकांचा मोठ्या प्रमाणात वापर केला जातो आणि ही रसायने मानवी शरीरात जातात ज्यामुळे असाध्य अशा कर्करोगाल लोक बळी पडत आहेत. आपले आरोग्य निरोगी आणि आरामदायी करायचे असेल तर पर्यावरणाचे आणि पक्षी संवर्धनाचे कार्य सर्वांनी हाती घेतली पाहिजे. पक्षी हे मानवी सुख-समृद्धीचे आणि आरोग्याचे प्रतिक आहे त्याचे जतन सर्वांनी केले पाहिजे.”
– डॉ. प्रकाश बनसोडे, प्राध्यापक, रसायनशास्त्र विभाग
“आपल्या घरादाराच्या किंवा परसदारात असंख्य पक्षी वावरत असतात मात्र आपल्याला या पक्षांची ओळख नसते आणि त्यामुळे अशा पक्षाचे महत्त्व आपल्याला समजत नाही. खरंतर, सर्वच पक्षी एक समान मानतो. पण, पर्यावरणात प्रत्येक पक्षाचे वेगळे स्थान आहे, ते स्थान ढळू न देता त्याचे संवर्धन झाले पाहिजे.
‘निसर्गाचा ऱ्हास करून विकास करणे’ म्हणजे शाश्वत विकास नसून, तो मानवी विनाशाची सुरुवात आहे. मानवी गरजा पूर्ण करत असताना, शाश्वत विकास झाला पाहिजे. त्यासाठी, आपण सर्वांनी पर्यावरण आणि पक्षी-प्राणी यांना मध्यवर्ती ठिकाणी ठेवून त्यांचे संवर्धन करण्याबरोबरच मानवी विकास साधण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत.”
– डॉ. विधीन कांबळे, (पक्षीमित्र) प्राध्यापक, जीवशास्त्र विभाग
“निसर्गात पक्षांकडून अनेक काही शिकण्यासारखे असते.’चिमणी’सारखा साधा वाटणारा पक्षी सुद्धा अत्यंत हुशार आहे. पक्ष्यांची घरे बांधण्याची कला ही स्थापत्यशास्त्राला लाजवण्यासारखी असते. पक्षी कीटकांचा बंदोबस्त करतात व पर्यायाने मानवाच्या मूलभूत गरजांचे ते जतन करत असतात हे सर्वांनी लक्षात घेतले पाहिजे.पक्षी, प्राणी आणि पर्यावरणाचे जतन विद्यार्थ्यांनी केले पाहिजे.”
-डॉ. सुरेश भोसले, प्रभारी प्राचार्य
या कार्यक्रमाचे नियोजन प्राणीशास्त्र विभागातील