Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सोलापुरातील जवान गोरख चव्हाण यांना उत्तराखंडमध्ये  वीरमरण
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsसोलापूर

सोलापुरातील जवान गोरख चव्हाण यांना उत्तराखंडमध्ये  वीरमरण

Surajya Digital
Last updated: 2022/04/19 at 10:41 PM
Surajya Digital
Share
2 Min Read
SHARE

 

□ बारा वर्ष सैन्यदलामध्ये सेवा बजावली, गृहप्रवेशाचे स्वप्न अधुरे राहिले

बार्शी : मूळचे बार्शी तालुक्यातील रातंजन येथील असलेले व सध्या उत्तराखंड राज्यामध्ये कार्यरत असलेले जवान गोरख हरीदास चव्हाण यांना अपघातात वीर मरण आले. त्यांच्या पश्चात आई-वडील, पत्नी, 8 वर्षाचा मुलगा,  3 वर्षाची मुलगी, भाऊ, भावजय असा परिवार आहे. त्यांच्या निधनाचे वृत्त येथे पोहचताच रातंजनमध्ये शोककळा पसरली.

गोरख चव्हाण हे बॉर्डर रोड ऑर्गनायजेशनमध्ये चालक या पदावर कार्यरत होते. उत्तराखंडमध्ये बीआरओच्या  ताफ्यातील गाडी दरीत कोसळली आणि त्यात त्यांना वीर मरण आले. त्यांचे प्राथमिक व माध्यमिक शिक्षण रातंजन (ता .बार्शी )  येथे मूळ गावी झाले तर उच्च माध्यमिक शिक्षण वैराग येथे झाले होते.

Gorakh Chavan from Solapur died in Uttarakhand

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

लहानपणापासूनच त्यांना भारतीय सैन्यदल याबद्दलची आत्मीयता आणि आवड होती. त्यातूनच त्यांनी आपल्या मित्राबरोबर  सैन्य भर्तीसाठी प्रयत्न सुरु केले.  जुलै 2009 मध्ये  गोरख चव्हाण हे जनरल रिझर्व इंजिनिअरिंग फोर्स ( बी. आर.ओ.) मध्ये चालक म्हणून हिमाचल प्रदेश मधील मनाली येथे रुजू झाले होते.  मिझोराम, कुपवाडा, लेह, उत्तराखंड आदी भागात त्यांनी कर्तव्य बजावले आहे.

मंगळवारी संध्याकाळी पितरागड येथे कर्तव्य बजावत असताना वाहन  दरीत कोसळल्याने झालेल्या अपघातात गंभीर जखमी होऊन त्यांना वीरमरण आले. त्यांनी बारा वर्ष सैन्यदलामध्ये सेवा बजावली आहे. घरची आर्थिक परिस्थिती बेताची होती. नुकतेच  नवीन घराचे बांधकाम पूर्ण झाले असून मे महिन्यात सुट्टीवर आल्यावर गृहप्रवेश करणार होते. पण त्यापूर्वीच काळाने घाला घातला व त्यांचे गृहप्रवेशाचे स्वप्न अधुरे राहिले.
बुधवारी दुपारी  चव्हाण यांचे पार्थिव त्यांच्या मूळगावी रातंजन येथे आणण्यात येणार आहे, अशी माहिती मिळाली असून संध्याकाळी त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार होण्याची शक्यता आहे.

You Might Also Like

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

पूरग्रस्तांना रेशन कीट वाटप करण्यात येणार – सीईओ जंगम

सोलापूर – अतिवृष्टीत 230 पुलांचा अप्रोच भराव गेला वाहून

सोलापूर – शिवसेनेचे सरकारविरोधात हंबरडा आंदोलन

सोलापूर – हेक्टरच्या मर्यादेमुळे थांबले पंचनामे

TAGGED: #GorakhChavan #Solapur #died #Uttarakhand, #सोलापूर #जवान #गोरखचव्हाण #उत्तराखंड  #वीरमरण
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article सोलापुरातील लॉजमध्ये गळफास घेऊन पुण्याच्या तरुणाची आत्महत्या
Next Article पुन्हा निर्बंध ? महाराष्ट्रासह 5 राज्यांना केंद्राचे पत्र, मास्कसक्तीची शक्यता

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?