Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: सरकार बदलताच शरद पवारांना मोठा धक्का, आली आयकराची नोटीस
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रराजकारण

सरकार बदलताच शरद पवारांना मोठा धक्का, आली आयकराची नोटीस

Surajya Digital
Last updated: 2022/07/01 at 10:11 AM
Surajya Digital
Share
4 Min Read
SHARE

 

मुंबई : एकनाथ शिंदे यांनी केलेल्या बंडामुळे राज्यातील महाविकास आघाडीचं सरकार कोसळलं आहे. राज्यात आता शिंदे सरकार सुरू झालं आहे. हे सरकार आल्यानंतर लगेच राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. राष्ट्रवादीचे प्रवक्ते महेश तपासे यांनी याची माहिती दिली. 2004, 2009, 2014 आणि 2020 च्या निवडणूक शपथपत्राबद्दल आयकर विभागाने नोटीस पाठवली आहे.  As soon as the Dhakatantra government was changed, Sharad Pawar got a big shock

 

राज्यात सत्ता परिवर्तन होताच अगोदरच्या सरकारचे नेते म्हणजेत महाविकास आघाडीचे प्रमुख आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली आहे. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे प्रवक्ते महेश तापसे यांनी ट्विट करुन माहिती दिली आहे. एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस यांच्या अनुक्रमे मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री पदाच्या शपथेनंतर काही वेळातच राष्ट्रवादीचे नेते शरद पवार यांना आयकर विभागाची नोटीस आली असल्याचे महेश तपासेंनी सांगितले.

2004, 2009, 2014 आणि 2020 च्या निवडणूक शपथपत्रा बद्दल आयकर विभागाने ही नोटीस पाठवली आहे. सत्ताबदलानंतर आलेली ही नोटीस हा फक्त योगायोग आहे का आणखी काही?” असे ट्वीट महेश तपासे यांनी केले आहे.

एकनाथ शिंदे यांच्या बंडापासून सुरू झालेले धक्कातंत्राची मालिका त्यांच्या मुख्यमंत्री पदाची आणि देवेंद्र फडणवीस यांनी उपमुख्यमंत्रीपदाची शपथ घेण्यापर्यंत चालूच आहे. देवेंद्र फडणवीस यांच्या उपमुख्यमंत्रीपदाविषयी शरद पवारांनी प्रतिक्रिया व्यक्त केली आहे.

 

फडणवीस यांनी नंबर दोनची जागा आनंदाने स्वीकारली आहे असं वाटत नाही. त्यांचा चेहरा तसं सांगत नाही. पण ते नागपुरचे आहेत. एकदा आदेश आला की तो पाळायचा असतो, हे कारण असावे दुसरे कारण नसावे अशा खोचक शब्दात पवारांनी आपले मत सांगितले. फडणवीस यांचा चेहराच नाराज असल्याचे सांगत होता. लोकांमधून निवडून आले असते तर फडणवीसांना शाबासकी दिली असती. भाजपने एकनाथ शिंदे यांना मदत करण्याची जी भूमिका आत्ता घेतली ती अडीच वर्षांपूर्वी घेतली असती तर गेल्या अडीच वर्षात घडलं ते घडलंच नसतं, असं पवार म्हणाले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…

 

शिवसेना नेते संजय राऊत आज ईडीच्या प्रश्नांना सामोरे जाणार आहेत. अंमलबजावणी संचालनालयाने राऊत यांना दुसरे समन्स बजावले असून त्यांना चौकशीसाठी हजर राहण्याचे आदेश दिले आहेत. शिवसेना नेते संजय राऊत यांच्यावर पत्रा चाळ जमीन घोटाळ्यात सुमारे १०३४ कोटींचा घोटाळा केल्याचा आरोप आहे.

शिवसेना खासदार संजय राऊत यांनी नुकतंच एक ट्विट केलं आहे. ‘मी आज दुपारी 12 वाजता ईडीसमोर हजर होणार आहे. मला बजावलेल्या समन्सचा मी आदर करतो आणि तपास यंत्रणांना सहकार्य करणे हे माझे कर्तव्य आहे, असं ते म्हणाले. तसेच मी शिवसेना कार्यकर्त्यांना ईडी कार्यालयात जमू नये असे आवाहन करतो, असंही त्यांनी म्हटलं. शिवाय शरद पवार, उद्धव ठाकरे, राहुल गांधी आणि ममता बॅनर्जी यांना हॅशटॅग केलंय.

 

I will be appearing bfore the ED tody at 12 noon. I respect the Summons issued to me and it's my duty to co-operate with the Investigation agencies

I appeal Shivsena workers not to gather at the ED office

Don't worry !@PawarSpeaks @OfficeofUT @MamataOfficial @RahulGandhi pic.twitter.com/Vn6SeedAoU

— Sanjay Raut (@rautsanjay61) July 1, 2022

यापूर्वी संजय राऊत हे 28 जूनला ईडीसमोर हजर होणार होते. मात्र, राऊत यांनी ईडीला पत्र लिहून हजर राहण्यासाठी आणखी वेळ मागितला होता. त्यांना चौकशीतून सूट देण्यात आली होती. मात्र, ईडीने त्यांना दुसरे समन्स बजावून आज १ जुलै रोजी हजर राहण्यास सांगितले. राऊत यांनी ७ जुलैपर्यंत मुदत मागितली होती. पण ईडीने आणखी वेळ देण्यास नकार दिला आहे.

संजय राऊत यांनी ट्विट करून म्हटले आहे – मी अंमलबजावणी संचालनालयाच्या कार्यालयात जाईन, काही लोकांना आम्हाला तुरुंगात पाठवून राज्य चालवायचे आहे, जसे आणीबाणीच्या काळात घडले होते. माझे काम पूर्ण करून मी ईडीसमोर हजर होणार आहे. मी खासदार आहे. मला कायदा माहीत आहे. कायद्याची अंमलबजावणी करणाऱ्या एजन्सी चुकीच्या पद्धतीने काम करत असल्या तरी मी कायद्याचे पालन करणारी व्यक्ती आहे.

 

 

You Might Also Like

लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार

देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?

उद्धव ठाकरेंचा दानवे यांना सल्ला – “पुन्हा या, पण आपल्या पक्षातूनच या”

उद्धव ठाकरे यांना सत्तेत सहभागी होण्याचा प्रस्ताव; देवेंद्र फडणवीस यांची चर्चेला उघड दार

मुंबई आणि उपनगरांना मुसळधार पावसाचा तडाखा; ऑरेंज अलर्ट जारी

TAGGED: #Dhakatantra #government #changed #SharadPawar #got #bigshock #edofficr #sanjayraut, #सरकार #बदलताच #शरदपवार #मोठाधक्का #आयकर #नोटीस #संजयराऊत #ईडी #कार्यालय #हजर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article oaths ceremony एकनाथ शिंदेंनी मुख्यमंत्री तर उपमुख्यमंत्री म्हणून फडणवीसांनी घेतली शपथ
Next Article गौरवशाली बहुमान… सामान्य कार्यकर्ताही मुख्यमंत्री होऊ शकतो

Latest News

Massive fire at shopping mall in Iraq; 60 people killed, many missing
इराकमधील शॉपिंग मॉलमध्ये भीषण आग; ६० लोकांचा मृत्यू, अनेक बेपत्ता
देश - विदेश July 17, 2025
IndiGo's Delhi-Goa flight makes emergency landing in Mumbai; all passengers safe
इंडिगोच्या दिल्ली-गोवा विमानाचे मुंबईत आपत्कालीन लँडींग; सर्व प्रवासी सुरक्षित
Top News July 17, 2025
हरियाणा : रोहतकमध्ये पुन्हा भूकंपाचे सौम्य धक्के, नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण
देश - विदेश July 17, 2025
Army jawan arrested for spying for Pakistan
पाकिस्तानसाठी हेरगिरी करणाऱ्या सैन्य जवानाला अटक
देश - विदेश July 17, 2025
Electricity will be free in Bihar; Chief Minister Nitish Kumar's big announcement before elections
बिहारमध्ये वीज मोफत होणार; निवडणुकीपूर्वी मुख्यमंत्री नितीश कुमारांची मोठी घोषणा
देश - विदेश July 17, 2025
लोकमान्य टिळकांचे पणतू डॉ. दीपक टिळक यांचे निधन; पुण्यात अंत्यसंस्कार
महाराष्ट्र July 16, 2025
फौजा सिंग यांचा हिट अँड रन प्रकरणात एनआरआय अमृतपाल सिंग ढिल्लनला अटक
Top News July 16, 2025
देशात पहिली टेस्ला कार दाखल; प्रताप सरनाईक बनणार पहिले ग्राहक?
महाराष्ट्र July 16, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?