Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी; सरकार लाखो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करणार
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Hot Newsमहाराष्ट्रसोलापूर

आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी; सरकार लाखो वारकऱ्यांची मोफत आरोग्य तपासणी करणार

Surajya Digital
Last updated: 2023/06/08 at 8:21 PM
Surajya Digital
Share
3 Min Read
SHARE

 

Contents
》’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ महाआरोग्य शिबीर राबविणारस्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)● वाखरी पालखी तळ, 65 एकरची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी

》’आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ महाआरोग्य शिबीर राबविणार

 

सोलापूर – यंदा 29 जून रोजी आषाढी एकादशी आहे. दरवर्षी आषाढी एकादशीनिमित्ताने लाखो वारकरी पंढरपुरमध्ये विठुरायाच्या दर्शनासाठी दाखल होतात. अनेक वारकरी हे पायी चालत आलेले असतात. Wari of Health, Door of Pandhari; The government will conduct free health check-up of lakhs of workers at the Maha Arogya Shibir Pandharpur त्यामुळे पंढरपुरमध्ये आल्यानंतर अनेकांना आरोग्याशी संबंधीत समस्यांचा सामना करावा लागतो. ही बाब लक्षात घेऊन यंदाच्या आषाढी वारीला राज्य सरकारकडून वारकऱ्यांची आरोग्य तपासणी करण्यात येणार आहे. यासाठी पंढरपूर येथील यात्रेत राज्य शासनाच्या वतीने ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ हे महाआरोग्य शिबीर राबवले जाणार आहे, अशी माहिती आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी दिली. 

 

आरोग्यमंत्री सावंत म्हणाले की, यंदाच्या आषाढी यात्रेमध्ये पंढरपुरात प्रथमच राज्याच्या आरोग्य विभागाच्या वतीने महाआरोग्य शिबिर घेण्यात येणार आहे. ‘आरोग्याची वारी, पंढरीच्या दारी’ ह्या संकल्पनेवर आधारित हे महाआरोग्य शिबीर २८ आणि २९ जून रोजी पंढरपुरात राबवण्यात येणार आहे.या शिबिरात सुमारे २० लाख भाविकांच्या आरोग्याची तपासणी करण्याचे उद्दिष्ट ठेवण्यात आले आहे. यासाठी राज्यातील वैद्यकीय कर्मचारी आणि डॉक्टर्स यांच्यासह परराज्यातून देखील वैद्यकीय पथकं बोलण्यात येणार आहे. पंढरपुरात ३ ठिकाणी हे आरोग्य शिबिर राबवले जाईल.

 

यामध्ये आरोग्य शिबिरासोबतच वारकरी भक्तांना सकस आहार देखील दिला जाणार आहे. याबाबत आरोग्यमंत्री तानाजी सावंत यांच्या अध्यक्षतेखाली पंढरपूर येथे बैठक घेण्यात आली. आषाढी यात्रेमध्ये राज्य शासनाचे विविध कार्यक्रम आजपर्यंत राबवले गेले. मात्र आरोग्य शिबिरसारखा लोकोपयोगी उपक्रम प्रथमच पंढरपूर येथे राबवला जाणार असल्याचे डॉ.तानाजी सावंत यांनी सांगितले.

 

 

स्थानिक, देशासह जगभरातल्या बातम्या वाचण्यासाठी ‘सुराज्य डिजिटल’ फेसबुक पेज, डेलिहंट, ट्विटर, कू ॲपवर आणि ‘टेलिग्राम’वर आवर्जून द्या भेट…(बातमीसाठी मोबाईल – 9881192310 व्हाटसअपवर संपर्क करा)

 

आषाढी यात्रा कालावधीत मोफत महाआरोग्य शिबिर आयोजनाबाबत पंढरपूर येथे आयोजित बैठकीत ते बोलत होते. बैठकीस प्र. जिल्हाधिकारी तुषार ठोंबरे, मुख्य कार्यकारी अधिकारी दिलीप स्वामी, जिल्हा पोलीस अधीक्षक शिरीष सरदेशपांडे, उपविभागीय अधिकारी गजानन गुरव, उपविभागीय पोलीस अधिकारी अर्जुन भोसले, आरोग्य उपसंचालक डॉ. राधाकृष्ण पवार, तहसिलदार सुशिल बेल्हेकर, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ. धनंजय पाटील, जिल्हा आरोग्य अधिकारी डॉ. सोनिया बागडे, गटविकास अधिकारी प्रशांत काळे, मुख्याधिकारी अरविंद माळी, तसेच संबंधित विभागाचे अधिकारी उपस्थित होते.

 

● वाखरी पालखी तळ, 65 एकरची आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी

 

आषाढी यात्रेनिमित्त पालखी सोहळ्याबरोबर येणाऱ्या वारकरी, भाविकांची संख्या मोठ्या प्रमाणात असते. त्या पार्श्वभूमिवर आरोग्यमंत्री डॉ. तानाजी सावंत यांनी पालखी तळची पाहणी करून प्रशासनाच्या वतीने देण्यात येणाऱ्या सुविधांबाबत माहिती घेतली. तसेच 65 एकरमध्ये मोठ्या प्रमाणात दिंड्या उतरतात. दिंड्यासोबत वारकरी, भाविक मोठ्या संख्येने असतात. या ठिकाणीही देण्यात येणाऱ्या सुविधांची माहिती घेवून आवश्यक सूचना त्यांनी यावेळी दिल्या.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

सोलापूर जिल्ह्यातील निवडणूक तयारीत भाजपचा ‘स्वबळ’ दावा; विरोधकांचा ‘फरक दिसत नाही’ प्रतिप्रहार

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

TAGGED: #WariofHealth #DoorofPandhari #government #conduct #free #healthcheck-up #lakhs #workers #MahaArogyaShibir #Pandharpur, #पंढरपूर #आरोग्याचीवारी #पंढरीच्यादारी #सरकार #लाखो #वारकरी #मोफत #आरोग्य #तपासणी #महाआरोग्यशिबिर
Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article घरावर दगडफेक : तीन महिलासह दहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल
Next Article मीरारोड मर्डर मिस्ट्री : त्याने आधी तुकडे केले, मग कुकरमध्ये शिजवले अन मिक्सरला बारीक केले

Latest News

По какой причине головной мозг откликается на случайные победы особенно ярко
Top News December 5, 2025
Почему мы лучше откладываем в памяти моменты риска, чем эпизоды умиротворения
Top News December 5, 2025
По какой причине мы ярче фиксируем в памяти эпизоды опасности, чем моменты спокойствия
Top News December 5, 2025
Зачем человек превозносят душевные подъемы
Top News December 5, 2025
По какой причине человеческий разум откликается на непредвиденные успехи чрезвычайно интенсивно
Top News December 5, 2025
Из-за чего человек дорожат эмоциональные пики
Top News December 5, 2025
Почему удовольствие связано с ощущением роста
Top News December 5, 2025
Зачем мы приходим к моментам везения мысленно
Top News December 5, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?