Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण – विखे पाटील
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
देश - विदेश

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण – विखे पाटील

admin
Last updated: 2025/05/16 at 4:31 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

सातारा, 16 मे (हिं.स.)।

दुष्काळमुक्त महाराष्ट्र करण्याचे शासनाचे धोरण असून जिहे कठापूर योजनेच्या उर्वरित कामासाठी निधी उपलब्ध करून दिला जाईल, ग्वाही जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांनी दिली.

गुरुवर्य लक्ष्मणरावजी इनामदार उपसा सिंचन योजना (जिहे- कठापूर) उपसा सिंचन योजना अंतर्गत आंधळी धरणातील पाणी राणंद येथील तलावात पोहोचले. याचे जलपूजन जलसंपदा मंत्री विखे- पाटील यांच्या हस्ते झाले.

जिहे कठापूर योजनेचे पाणी राणंद तलावात पोहोचले याचा शेतकऱ्यांना आनंद झाला असून त्यांचा आनंद पाहून मलाही आनंद झाला आहे, असे सांगून जलसंपदा मंत्री विखे पाटील म्हणाले, दुष्काळ मुक्त करण्यासाठी शासनाने नदीजोड प्रकल्प हाती घेतला आहे. तसेच कोकणातील पाणी समुद्राद्वारे वाया जाते ते पाणी गोदावरी खोऱ्यामध्ये वळविण्यात येणार आहे, ही योजना येत्या पाच वर्षात पूर्ण होईल.

जिहे कठापूर योजनेचे पाणी साठ हजार हेक्टर क्षेत्राला देण्यात येणार आहे. 2029 पर्यंत पाणी संपूर्ण माण व खटाव तालुक्याला मिळेल. ही योजना पूर्ण करण्यासाठी शासनाकडून निधीची कमतरता पडू दिली जाणार नाही व माण व खटाव तालुका दुष्काळ मुक्त करण्यात येईल, असेही जलसंपदा मंत्री विखे पाटील यांनी सांगितले.

ग्रामविकास मंत्री गोरे म्हणाले, 2009 साली आमदार झालो. त्यापासून माण खटाव पाणी मिळावे यासाठी उद्दिष्ट निश्चित करून पाठपुरावा केला. त्याचे फलित जिहे कठापूरचे पाणी आंधळी धरणातून राणंद तलावात आले. त्याचा आनंद येथील शेतकऱ्यांना होत आहे. माझ्या पाठीशी नेहमीच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस राहिले आहेत. त्यांनी पाण्याचे फेरवाटप करून पाणी माण खटावला दिले. त्याचे फलित म्हणून माण खटाव हिरवे गार झाले असून ऊसाचे क्षेत्र हे वाढले आहे. इतर गावांत पाण्याचा प्रश्न सोडवण्यासाठी सोळशी धरणाचा निर्णयही घेतला पाहिजे तसेच या धरणातून अडीच टीएमसी पाणी या भागाला दिले पाहिजे. तसेच जिहे कटापूर योजनेतील उर्वरित कामांचे टेंडर ही तीस दिवसात काढावे, असेही ग्रामविकास मंत्री गोरे यांनी सांगितले.

You Might Also Like

दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ

INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी

चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल

चीनला मागे टाकत हवाई दलाच्या क्रमवारीत भारत तिसऱ्या स्थानावर

सरन्यायाधीशांवर बूट फेकणाऱ्या वकिलाविरुद्ध अवमान खटल्याला ऍटर्नी जनरल यांची मंजुरी

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article शिक्षकांशी चर्चा करुनच निर्णय घेणार – बच्चू कडू
Next Article ऑपरेशन सिंदूर’वर काँग्रेस आमदाराने उपस्थित केली शंका

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?