Surajya DigitalSurajya DigitalSurajya Digital
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Search
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
Reading: नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन
Share
Font ResizerAa
Font ResizerAa
Surajya DigitalSurajya Digital
Search
  • सोलापूर
  • महाराष्ट्र
  • देश – विदेश
  • गुन्हेगारी
  • राजकारण
  • टॉलीवुड
  • खेळ
  • ई पेपर
Follow US
© 2022 Foxiz News Network. Ruby Design Company. All Rights Reserved.
महाराष्ट्र

नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करण्याचे राज्यपालांचे आवाहन

admin
Last updated: 2025/04/29 at 4:45 PM
admin
Share
2 Min Read
SHARE

मुंबई, 29 एप्रिल (हिं.स.)।

भारत जगातील सर्वाधिक लोकसंख्या असलेला देश झाला आहे. मात्र त्यासोबतच देशात अंध आणि दृष्टीबाधित लोकांची संख्या देखील फार मोठी आहे. सामाजिक व आर्थिक कारणांमुळे अंधत्वावर उपचार करू न शकणाऱ्या लोकांची संख्या देखील मोठी आहे. या सर्वांना दृष्टिलाभ करून देण्यासाठी आधुनिक नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण आणि आदिवासी भागात वेळोवेळी नेत्र तपासणी शिबिरे आयोजित करावी तसेच नेत्रदान वाढविण्यासाठी सर्व स्तरावर प्रयत्न करावे असे आवाहन राज्यपाल सी पी राधाकृष्णन यांनी आज येथे केले.

वडाळा मुंबई येथील अद्ययावतीकरण करण्यात आलेल्या आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाचा शुभारंभ राज्यपाल राधाकृष्णन यांच्या हस्ते मंगळवारी (दि. २९) संपन्न झाला, त्यावेळी ते बोलत होते. आदित्य ज्योत नेत्र रुग्णालय हे ३५ वर्षे जुने नेत्र रुग्णालय आता विविध देशांमध्ये नेत्र रुग्णालयांचे जाळे असलेल्या अगरवाल नेत्र रुग्णालय साखळीचा भाग झाले आहे.

आदिवासी भागांचे संविधानिक पालक या नात्याने आपण राज्यातील आदिवासी भागांमधील लोकांच्या आरोग्याबाबत चिंतीत आहोत. या दृष्टीने नेत्र रुग्णालयांनी ग्रामीण तसेच आदिवासी बहुल भागात नेत्र चिकित्सा शिबिरे आयोजित करण्यासाठी मदत करावी असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले. अगरवाल नेत्र रुग्णालयाने गोरगरीब रुग्णांच्या सेवेसाठी फिरते नेत्र रुग्णालय सुरु केल्यास ती भारतमातेची चांगली सेवा ठरेल असे राज्यपालांनी सांगितले.

आपण झारखंड येथे राज्यपाल असताना पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसाला अनेक लोकांकडून नेत्रदानाची प्रतिज्ञा करवून घेतली होती तसेच आपण आपल्या कुटुंबीयांसह नेत्रदान करण्याचा संकल्प केला होता असे सांगून यंदा पंतप्रधानांच्या ७५ व्या वाढदिवसानिमित्त ७५०० लोकांकडून नेत्रदानाचा संकल्प करवणार आहोत, या दृष्टीने अधिकाधिक लोकांनी नेत्रदानासाठी संकल्प करावा असे आवाहन राज्यपालांनी यावेळी केले.

सुरुवातीला राज्यपालांनी आधुनिकीकृत आदित्य ज्योत नेत्र रुग्णालयाची पाहणी केली. यावेळी हॉस्पिटलचे वैद्यकीय सेवा प्रमुख डॉ. एस. नटराजन यांनी राज्यपालांच्या दृष्टीची तपासणी केली.

उदघाटन सत्राला अगरवाल आय हॉस्पिटलचे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ. आदिल अगरवाल, डॉ. अगरवाल आय हॉस्पिटलच्या मुख्य नियोजन अधिकारी डॉ. वंदना जैन, राज्यपालांचे सचिव डॉ प्रशांत नारनवरे तसेच आदित्य ज्योत आय हॉस्पिटलचे डॉक्टर्स व कर्मचारी उपस्थित होते.

You Might Also Like

मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे

अन्न पदार्थांमध्ये भेसळ आढल्यास माहिती देण्याचे आवाहन

पुण्यातील जैन बोर्डिंग हाऊस जमीन विक्रीवादून मुरलीधर मोहोळ यांच्यावर हल्ला

शाळांमधील सुविधांसाठी सीएसआर निधीचा उपयोग व्हावा – दादाजी भुसे

भुजबळांच्या उपस्थितीत शुक्रवारी बीडमध्ये ओबीसींचा महा एल्गार मेळावा

Share This Article
Facebook Twitter Whatsapp Whatsapp Telegram Email Copy Link Print
Previous Article डॉ. आंबेडकर यांच्या जनता वृत्तपत्राच्या तीन खंडाचे मुख्यमंत्र्यांच्या हस्ते प्रकाशन
Next Article भारताने संयुक्त राष्ट्राच्या मंचावर पाकिस्तानला पुन्हा खडसावले

Latest News

तेजस्वी यादव यांना ‘महागठबंधन’चे मुख्यमंत्री उमेदवार; भाजपला आव्हान देत बदलाचे आश्वासन
राजकारण October 23, 2025
मुरलीधर मोहोळ केंद्र, राज्य सरकारच्या सत्तेचा वापर करतात; धंगेकरांच्या आरोपांची चौकशी व्हावी – अंबादास दानवे
महाराष्ट्र October 23, 2025
दिवाळीत रुबिना दिलैकवर ‘अँटी हिंदू’ असल्याचा आरोप; एका ट्विटमुळे झाला गदारोळ
देश - विदेश October 20, 2025
‘राज ठाकरेंनी मोहल्ल्यावर जाऊन मतदार याद्या तपासाव्यात’; नितेश राणेंचे जिव्हारी लागणारे शब्द
राजकारण October 20, 2025
INS विक्रांतवरून पीएम मोदींचा पाकिस्तानला कठोर संदेश; नौसैनिकांसोबत दिवाळी साजरी
देश - विदेश October 20, 2025
चीनवरील 100 टक्के टॅरिफ हटणार; ट्रम्प म्हणाले – करार झाला तर सर्व काही सुरळीत होईल
देश - विदेश October 20, 2025
बिहार निवडणुकीत महागठबंधनमध्ये तिढा; काँग्रेस-राजद आमने सामने, 11 जागांवर पेच
राजकारण October 20, 2025
शेतकऱ्यांनी आत्महत्या न करता हक्कासाठी लढा द्या – बच्चू कडूंचा संताप
राजकारण October 20, 2025
Surajya DigitalSurajya Digital
Follow US
© Website Design by Digital Buffalo - 9028927697
×

No WhatsApp Number Found!

WhatsApp us

WhatsApp Group
Welcome Back!

Sign in to your account

Lost your password?